पाम तेलाच्या मूळ आयात किमतीत कपात

देशात खाद्यतेलाच्या किमती भडकल्या आहेत. त्याला लगाम घालण्यासाठी सरकारने उपायांचा धडाका लावला आहे.
पाम तेलाच्या मूळ आयात किमतीत कपात
Soyabeen OilAgrowon

केंद्र सरकारने कच्च्या आणि रिइफाइंड पाम तेलाच्या मूळ आयात किमतीत (बेस इम्पोर्ट प्राईस) कपात केली आहे. पामतेलाची आयात वाढून देशात खाद्यतेलाचे दर कमी व्हावेत, यासाठी सरकारचा हा प्रयत्न आहे.

देशात खाद्यतेलाच्या किमती भडकल्या आहेत. त्याला लगाम घालण्यासाठी सरकारने उपायांचा धडाका लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने गेल्या आठवड्यात २० लाख टन सोयाबीन तेलाची शुल्कमुक्त आयात करायला परवानगी दिली. सरकारने मंगळवारी (ता. ३१) रात्री खाद्यतेलाच्या मूळ आयात किमतींमध्ये बदल केला. त्यानुसार पामतेलाच्या आयात किमतीत कपात केली असली तरी कच्च्या सोयबीन तेलाच्या आयात किमतीत मात्र वाढ केली आहे.

भारताला खाद्यतेलाची गरज भागवण्यासाठी आयातीवर अवलंबून राहावं लागतं. जगातील सर्वात मोठा खाद्यतेल आयातदार देश म्हणून भारताची ओळख आहे. भारत आपल्या गरजेच्या एकूण सुमारे ६० टक्के खाद्यतेल आयात करतो.

मंगळवारी केंद्र सरकारने पाम तेल आयात दरामध्ये कपात केली आहे. तर कच्च्या सोयाबीन तेलावरचे आयात दर वाढवले आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे कच्चे सोयाबीन तेल आयात करण्यासाठी प्रति टन १८६६ डॉलर मोजावे लागणार आहे. यापूर्वी त्यासाठी १८२७ डॉलर मोजावे लागत होते. तर कच्चे पाम तेल आता प्रति टन १६२५ डॉलरला उपलब्ध होईल. त्यासाठी पूर्वी १७०३ डॉलर मोजावे लागत होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com