Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची तेजी कायम

देशातील सोयाबीन उत्पादक मागील काही दिवसांपासून दरवाढीची वाट पाहत आहेत. मात्र आजही सोयाबीनचे दर स्थिर होते. पण आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर तेजीत होते.
Soyabean Market News
Soyabean Market Newsagrowon

अनिल जाधव
पुणेः देशातील सोयाबीन उत्पादक (Soybean Producer) मागील काही दिवसांपासून दरवाढीची वाट पाहत आहेत.

मात्र आजही सोयाबीनचे दर (Soybean Rate) स्थिर होते. पण आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर (Soyacake Rate) तेजीत होते.

तर देशातील बाजारातही सोयाबीन दर वाढीची शक्यता आहे. 

Soyabean Market News
Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत

युएसडीएनं आपला जानेवारीचा सोयाबीन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला. या अहवालात युएसडीएनं जागतिक सोयाबीन उत्पादनाचा अंदाज काहीसा कमी केला.

अर्जेंटीनातील उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज आहे. मागील महिन्यातील अहवालात अर्जेंटीनात ४९५ लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता.

मात्र मागील काही दिवसांपासून अर्जेंटीनातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक भागांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळं यंदा अर्जेंटीनात विक्रमी सोयाबीन उत्पादनाचा अंदाज फोल ठरला.

Soyabean Market News
Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; देशात काय स्थिती?

युएसडीएनं आताच्या अहवालात अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन ४५५ लाख टनांवरच स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला.

पण जाणकारांच्या मते अर्जेंटीनातील उत्पादनात यापेक्षा जास्त घट येऊ शकते.

युएसडीए फेब्रुवारीच्या अंदाजात अर्जेंटीनातील उत्पादन आणखी करेल, असाही अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज युएसडीएनं व्यक्त केला. याचा परिणाम कालपासून आंतरराष्ट्रीय बाजारावर पाहयाला मिळाला.

सीबाॅटवर सोयाबीनच्या वायद्यांमध्ये काल बाजारात बंद होताना मोठी वाढ झाली. कालच सोयाबीन वायद्यांनी १५.२० डाॅलर प्रतिबुशेल्सचा टप्पा गाठला होता.

तर आज दुपारी ४ वाजेपर्यंत १५.२६ डाॅलरवर दर पोचले. सोयापेंडच्या दरही ४८३ डाॅलर प्रतिटनांवर पोचेल.

देशात मात्र सोयाबीनचे दर आजही स्थिर होते. देशात आज सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळाला.

तर प्रक्रिया प्लांट्सचे दर आजही ५ हजार ६०० ते ५ हजार ७०० रुपयांवर स्थिर होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात मोठे चढ उतार होत होते. मात्र आता सोयाबीन आणि सोयापेंडचे दर तेजीत आहेत.

याचा फायदा देशातील सोयाबीनलाही मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com