Soybean Rate : सोयाबीन दर सुधारण्याची शक्यता

देशातील सोयाबीन दर मागील काही दिवसांपुर्वी क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयाने नरमले. ते आजपर्यंत दबावात आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. मात्र आता सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Soybean Rate
Soybean Rate Agrowon


अनिल जाधव
पुणेः देशातील सोयाबीन दर (Soybean Rate) मागील काही दिवसांपुर्वी क्विंटलमागे ३०० ते ५०० रुपयाने नरमले. ते आजपर्यंत दबावात आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. मात्र आता सोयाबीन उत्पादकांना (Soybean Producer) दिलासा मिळण्याची शक्यता आहे. इंडोनेशियाने जैवइंधनामध्ये पामतेलाचा वापर वाढविण्याची तयारी सुरु केली. त्यामुळे सोयाबीनचे दर क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांनी सुधारतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Soybean Rate
Moong Rate : मुगाचे दर सुधारण्याची शक्यता !

आंतररराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनचे वायदे जवळपास १ टक्क्याने सुधारून १४.४८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयातेलाच्या वायद्यांमध्ये जवळपास दीड टक्क्याने वाढ झाली होती. आज सोयातेलाचे वायदे ६३.४३ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. मागील आठवड्यात सोयातेल जवळपास ११ टक्क्यांनी पडले होते. मात्र किमान पातळीवरून सोयातेलाच्या दरात आता सुधारणा दिसून येत आहे.

सोयापेंडचे दरही आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारले आहेत. सोयापेंडचे दर जवळपास सव्वा टक्क्याने वाढले. आज सोयापेंडचे वायदे ४३३.३५ डाॅलर प्रतिटनाने पार पडले. देशात सध्या सोयाबीन नरमल्याने सोयापेंडचे दरही कमी झाले आहेत. म्हणजेच एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर वाढत आहेत. तर देशात दर कमी झाले. त्यामुळे देशातून सोयापेंड निर्यातही वाढली आहे.


Soybean Rate
Soya Oil Rate : सोयातेलाचे दर वाढण्याची शक्यता

इंडोनेशियाचे बी ३५ धोरण
इंडोनेशिया सध्या जैवइंधनामध्ये ३० टक्के पामतेलाचा वापर करत आहे. यापुढे जाऊन इंडोनेशियाने ३५ टक्के तेल वापरण्याचे उद्दीष्ट जाहीर केले होते. त्याला बी ३५ असे नाव देण्यात आले होते. आता इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी ३५ टक्के पामतेल वापरासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. म्हणजेच इंडोनेशिया जैवइंधनात पामतेलाचा वापर जास्त करणार आहे. त्यामुळे पामतेलाची उपलब्धता कमी होईल.

बाजारात सुधारणा
या बातमीनंतर पामतेलाच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली. दुसरीकडे पामतेलाच्या दरातही आज  सुधारणा पाहायला मिळाली. पामतेलाचे वायदे आज ३ हजार ९२७ रिंगीट प्रतिटनावर बंद झाले. रिंगीट हे मलेशियाचे चलन आहे. बाजारातील अनेक विश्लेषक पामतेल यंदा दबावात राहील असा अंदाज व्यक्त करत होते. मात्र महत्वाच्या पामतेल उत्पादक देशांमध्ये उत्पादन घटीची शक्यता आहे. इंडोनेशियाने हे धोरण राबविल्यास पामतेलाच्या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. असे झाल्यास सोयातेलाचे दरही सुधारु शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

देशातील सोयाबीन दर
देशात आज सोयाबीनचे दर काहीसे स्थिर होते. बाजारात आज जवळपास अडीच लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. तर सोयाबीनला आजही ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये सरासरी दर मिळाला. काही बाजारांमध्ये दर यापेक्षा जास्त होता. मात्र अशा बाजारांची संख्या नगण्य आहे. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर आजही ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते.

सोयाबीन दर किती वाढतील?
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयातेलाचे दर वाढीसाठी काही घटक अनुकूल दिसत आहेत. त्याला इंडोनेशियाच्या  त्यामुळे देशातील सोयाबीन बाजारालाही आधार मिळू शकतो. त्यामुळे सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com