Soybean Market : सोयाबीन दर ६ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात

जानेवारी महिन्यात देशातील सोयाबीन दर वाढतील, असा अंदाज डिसेंबरच्या शेवटी व्यक्त केला जात होता. त्यामुळं दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनीही सोयाबीन ठेवलं. मात्र जानेवारी निम्मा संपला तरी दरपातळी जागची हालेना.
Soybean Market News
Soybean Market NewsAgrowon

जानेवारी महिन्यात देशातील सोयाबीन दर (Soybean Rate) वाढतील, असा अंदाज डिसेंबरच्या शेवटी व्यक्त केला जात होता. त्यामुळं दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनीही सोयाबीन ठेवलं. मात्र जानेवारी निम्मा संपला तरी दरपातळी जागची हालेना.

त्यामुळं सोयाबीन ठेवावं की विकावं? सोयाबीनचे भाव नेमके कधी वाढतील? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. नेमकं याच प्रश्नांवर आता आपण चर्चा करणार आहोत.

तसंच सोयाबीन दरावर कशाचा परिणाम होऊ शकतो? देशातील दर आता का वाढतील? याचाही आढावा घेऊ…

सर्वप्रथम आपण सध्या सोयाबीन बाजारात (Soybean Market) काय चाललंय ते पाहू… तर मागील आठवडाभरापासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर तेजीत आहेत.

सोयाबीन दरानं मागील सहा महिन्यांतील उच्चांकी दर गाठला. आज सोयाबीनचे वायदे बंद होते. मात्र शुक्रवारी सोयाबीनच्या वायद्यांनी उच्चांकी १५.२७ डाॅलर प्रतिबुशेल्सचा टप्पा गाठला होता.

रुपयात हा दर ४ हजार ५५३ रुपये क्विंटल होतो. तसंच सोयापेंडचे दरही ४७५ डाॅलरवर पोचले. याचाच अर्थ अशा की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर तेजीत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील दरपातळी

४५५३ रुपये
शुक्रवारचे वायदे

४७५ डाॅलर
सोयापेंडचे दर

Soybean Market News
Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर सुधारले

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत असूनही देशात मात्र भावपातळी स्थिर आहे. सोयाबीनला ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळतोय.

सोयाबीनचे हे दर मागील दीड महिन्यापासून कायम आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना अद्यापही भाववाढीची अपेक्षा आहे.

चांगल्या दराच्या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी सोयाबीन राखून ठेवलं. पण दर वाढत नसल्यानं शेतकऱ्यांचा काहीसा हिरमोड होतोय.

Soybean Market News
Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर सुधारले

५२०० ते ५५०० रुपये
देशातील दरपातळी

मात्र जाणकारांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंड तेजीत असल्यानं देशातही दरवाढ होणं गरजेचं आहे.

पण देशातील सोयाबीन दर जास्त दिवस दबावात म्हणजेच सध्याच्या दरपातळीवर राहणार नाहीत.

दरात वाढ होईल, असा अंदाज शेतीमाल बाजार अभ्यासक राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केला. ते नेमकं काय म्हणतात ते पाहू…

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीन आणि सोयापेंड तेजीत आहे. तसंच अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त होतोय.

चीनकडूनही सोयाबीनला मागणी वाढण्याची शक्यता आहे. याचा देशातील सोयाबीन दराला आधार मिळेल.

त्यामुळं शेतकऱ्यांनी ५ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी दरात सोयाबीन विक्री करू नये. जानेवारीतच सोयाबीनचे दर वाढण्याचा अंदाज आहे.
- राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार अभ्यासक

अर्जेंटीना सोयापेंड आणि सोयाबीन निर्यातीत आघाडीवर असतो. पण यंदा अर्जेंटीनातच उत्पादन घटणार आहे. चीनमधील कोरोना निर्बंधही आता शिथिल होत आहेत.

चीनमध्ये पोल्ट्री आणि वराहपालन व्यवसायातून सोयापेंडला मागणी वाढतेय. त्यामुळं चीन यंदा सोयाबीन आयात वाढवणार आहे.

चीनच्या या मागणीमुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर तेजीत राहू शकतात.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर तेजीत आहेत. त्यामुळं देशातून सोयापेंड निर्यात वाढली. तसंच निर्यातीचे सौदेही वेगाने होत आहेत.

सोयापेंड निर्यात आणि सौद्यांची माहिती किंवा आकडेवारी लेगच बाहेर येत नाही. त्यामुळं याचा बाजारावर लगेच परिणाम दिसत नाही.

मात्र पुढील आठवडाभरानंतर निर्यातीची माहिती पुढे येऊन बाजार उभारी घेऊ शकतो. तसंच सोयापेंड निर्यातीची गतीही वाढण्याचा अंदाज आहे.

शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीनची मर्यादीत विक्री केली. त्यामुळं स्टाॅकिस्ट आणि प्रक्रिया प्लांट्सकडे साठा कमी असू शकतो. त्यांना बाजारात खरेदीत उतरावं लागेल.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर तेजीत राहील्यास देशातही दर वाढतील. सोयाबीन दरात जानेवारीतच वाढ होण्यास पूरक स्थिती आहे.

त्यामुळं शेतकऱ्यांनी ५ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी दरात सोयाबीन विक्री करू नये, असं आवाहनही जाणकारांनी केलंय

सोयाबीन ५५०० रुपयांपेक्षा कमी दरात विकू नये. तर पुढील तीन महिन्यांच्या काळात सोयाबीनला ५ हजार ५०० ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळू शकतो. म्हणजेच शेतकऱ्यांना हा दर मिळू शकतो.

मात्र अर्जेंटीनात आणखी उत्पादन घटल्यास, सोयाबीन भाव मार्च महिन्यापर्यंत ६ हजार रुपयांच्याही पुढे जाऊ शकतात.

सोयाबीन ६ हजार ५०० रुपयांचाही टप्पा गाठू शकते, असाही अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. Text plate ५५०० ते ६००० रुपये दर मिळू शकतो

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com