Soybean Market : सोयाबीनची दरपातळी कायम

देशातील बाजारात सव्वाचार लाख टन सोयाबीनची आवक झाली
Soybean Market
Soybean Market Agrowon

पुणेः सोयाबीन बाजारात (Soybean Market) आज  संमिश्र चित्र पाहायला मिळालं. आंतरराष्ट्रीय बाजारात (Soybean Rate) आज सोयाबीन दरानं सकारात्मक चाल केली. पण काल तुटलेल्या दराची (Soybean Bajarbhav) भरपाई आजही होऊ शकली नाही. तर देशातील बाजारात सोयाबीनची दरपातळी कायम आहे.

वर्ष २०२२ मधील शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे १५.३४ डाॅलर प्रतिबुशेल्सने पार पडले होते. रुपयात हा दर ४ हजार ७०० रुपये होतो. म्हणजेच ३१ डिसेंबरला सोयाबीन दरानं मागील सहा महिन्यांतील उच्चांकी दर गाठला होता. सोयाबीनचा दर उच्चांकी पातळीवर पोचल्यानं सहाजिकच नफावसुली होण्याची शक्यता नाकरता येत नव्हती आणि झालंही तसंच.

Soybean Market
Kabuli Chana Market: काबुली हरभरा तेजीत राहणार ?

दोन दिवस व्यवहार बंद राहील्यानंतर मंगळवारी म्हणजेच ३ जानेवारीला बाजार सुरु झाला. पण बाजारात विक्रीचं वर्चस्व होतं. त्यामुळं काल सोयाबीनचे दर २ टक्क्यांनी कमी होऊन १४.९६ डाॅलरपर्यंत घसरला. रुपयात हा दर ४ हजार ५८३ रुपये होते. म्हणजेच दरात क्विंटलमागं ११७ रुपयांची घट झाली होती.

पण आज सोयाबीनच्या दरात अपेक्षेप्रमाणं पुन्हा सुधारणा झाली. सोयाबीनचे दर जवळपास एक टक्क्याने वाढून १५ डाॅलरवर पोचले. रुपयात हा भाव ४ हजार ५९५ रुपये होतो. आज सोयाबीनचे भाव वाढले तरी ३१ डिसेंबरच्या तुलनेत कमीच आहेत.

तर सोयातेलाच्या भावात आज किंचित घट झाली होती. पामतेलाचे वायदे कमी झाल्याचा परिणाम सोयातेलाच्या दरावरही जाणवला. तर सोयापेंडचे दर मात्र कालच्या तुलनेत आज जवळपास एक टक्क्याने वाढले होते. आज सोयापेंडचे वायदे ४६९ डाॅलरवर बंद झाले होते. रुपयात हा दर जवळपास ३९ हजार रुपये होतो.

देशातील सोयाबीन दरपातळी
देशातील बाजाराचा विचार करता आज सोयाबीनचे भाव स्थिर होते. आठवड्याच्या सुरुवातीला सोयाबीनचे दर काहीसे सुधारले होते. पण दोन दिवसांपासून भाव स्थिर आहेत. सोयाबीनची दरपातळी आज देशात सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होती. तर राज्यातील काही बाजारांमध्ये सोयाबीनची आवक वाढली होती.

Soybean Market
Financial Management: शेतीचे आर्थिक नियोजन करा विचारपूर्वक

आज बाजारात किती आवक झाली?
देशात आज सोयाबीनची ४ लाख २५ हजार क्विंटलपर्यंत आवक झाली होती. आज सर्वाधिक आवक मध्य प्रदेशात झाली. मध्य प्रदेशातील बाजारात आज सरासरी २ लाख क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आलं होतं. तर महाराष्ट्रात दीड लाख क्विंटल आणि राजस्थानमध्ये ४० हजार क्विंटल आवक झाली होती. इतर राज्यांमध्ये जवळपास ३५ हजार क्विंटल सोयाबीन आलं होतं.

दर वाढतील का?
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर वाढण्यास पोषक स्थिती आहे. चीनमधून सोयाबीनला मागणी वाढत आहे. तर जगातील सर्वात मोठा सोयातेल आणि सोयापेंड निर्यातदार अर्जेंटीनात कमी पाऊस आहे. अर्जेंटीनात मागील आठवड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. मात्र तो पुरेसा नाही. तसंच पुढील काही दिवस अर्जेंटीनातील बहुतांशी भागात पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं आज आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा पाहायला मिळाली होती. तसंच पुढील काळात सोयाबीन दरवाढ कायम राहण्याचा अंदाज असल्याचं जाणकारांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com