Soybean Vayade : सोयाबीन वायदे गरजेचे

देशातील सोयाबीन वायदे सुरु झाल्यास सोयाबीन बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
उन्हाळी सोयाबीन लागवडीस गती Accelerate summer soybean cultivation
उन्हाळी सोयाबीन लागवडीस गती Accelerate summer soybean cultivationAgrowon


अनिल जाधव
पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन (Soybean) आणि सोयातेलाच्या (Soyaoil) दरात सुधाऱणा पाहायला मिळाली. मात्र सोयापेंडचे (Soyacake) दर काहीसे नरमले होते. तर देशातील बाजार स्थिर होता. देशातील सोयाबीन वायदे सुरु झाल्यास सोयाबीन बाजाराला (Soybean Market) आधार मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

उन्हाळी सोयाबीन लागवडीस गती Accelerate summer soybean cultivation
Soybean Rate : सोयाबीन, मोहरीचे वायदे तातडीने सुरु करा

सरकारने सोयाबीनसह सात शेतीमालाच्या वायद्यांवरील बंदी पुढील एक वर्षासाठी कायम ठेवली. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबतच, व्यापारी आणि उद्योगांचाही हिरमोड झाला. खाद्यतेल रिफायनरिंची संघटना असलेल्या साॅल्वेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियानं सरकारकडे पामतेल आणि सायातेलाच्या वायद्यांवरील बंदी मागे घेण्याची मागणी केली. ही मागणी पुढे रेटण्यासाठी उद्योग पातळीवर हालचालीही सुरु आहेत.

सरकारनं सोयाबीनचे वायदे सुरु केल्यास सोयाबीन बाजारालाही आधार मिळू शकतो. वायदे सुरु झाल्यास दरात क्विंटमागं २०० ते ३०० रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. कारण वायद्यांमुळं बाजारात पारदर्शकता येते. छोटे व्यापारी, प्रक्रियादार आणि गुंतवणूकदारांना जोखीम व्यवस्थापन करत येते. त्यामुळं बाजारात गुंतवणूकही वाढते. ही स्थिती शेतकऱ्यांच्या शेतीमाल बाजाराला पूरक असते. यामुळं सोयाबीनचे वायदे सुरु होणं गरजेचं आहे. 

उन्हाळी सोयाबीन लागवडीस गती Accelerate summer soybean cultivation
Soybean Market : सोयाबीन बाजार आज कसा राहीला?


पाठपुरावा आवश्यक
सरकारनं सोयाबीनचे वायदे सुरु करावेत, यासाठी पाठपुरावा करावा लागेल. शेतकऱ्यांनाच त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. शेतकऱ्यांनी आपल्या भागातील शेतकरी नेते, आमदार, खासदार आणि राजकीय पक्षांकडे वायदे सुरु करण्याची मागणी लावून धरावी. यामुळं सरकारवर दबाव वाढू शकतो, असंही काहीजण सांगत आहेत.


देशातील बाजार
सरकारनं वायदेबंदी कायम ठेवली तरी अपेक्षेप्रमाणं सोयाबीन बाजारावर त्याचा परिणाम जाणवला नाही. देशातील सोयाबीन दर आजही कायम होते. देशात सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला.


आंतरराष्ट्रीय बाजार
तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयातेलाच्या दरात काहीशी सुधारणा झाली. मात्र सोयापेंडचे दर किंचित नरमले होते. आज सोयाबीनचे वायदे १४.८२ डाॅलर प्रतिटनांवर बंद झाले. भारतीय रुपयात हा दर ४ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल होतो.


दरातील फरक
म्हणजेच देशातील सोयाबीन दर सध्या ८ ते १ हजार रुपयांनी जास्त आहेत. मात्र अमेरिकेचं सोयाबीन जीएम असतं, तर आपलं सोयाबीन नाॅन जीएम. त्यामुळं भारतीय सोयाबीनचे दर जास्त असतात.


काय राहील दरपातळी
देशातील सोयाबीन बाजार टिकून राहू शकतो. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना सरासरी किमान ५ हजार ते ६ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com