बिगर शेतसारा आकारणीबाबत दि पूना मर्चंट्स चेंबरकडून निवेदन

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून गेल्या ११ वर्षांतील बिगर शेतसारा फरकाची रक्कम भरणा करण्याबाबत व्यापाऱ्यांना कळवले आहे.
बिगर शेतसारा आकारणीबाबत दि पूना मर्चंट्स चेंबरकडून निवेदन
Poona Merchants ChamberAgrowon

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून (Pune APMC) गेल्या ११ वर्षांतील बिगर शेतसारा (Non Farm Lavy) फरकाची रक्कम भरणा करण्याबाबत व्यापाऱ्यांना कळवले आहे. पूर्वलक्षी प्रभावाने केलेल्या अकृषिक कराची वाढीव आकारणी अवाजवी आणि अयोग्य आहे. बाजार समितीच्या आवारात शेतीमाल विक्रीबाबत दैनंदिन व्यवहार होत असल्याने अकृषिक कराची आकारणी करण्यात येऊ नये, अशी मागणी दि पूना मर्चंट्स चेंबरकडून (The Poona Merchants Chamber) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बाजार समिती शेतीमाल खरेदी विक्री व्यवहारासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था आहे. शासनाने अकृषिक कराच्या फेररचनेसाठी महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती ही कृषी उत्पन्नाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी स्थापन केलेली व्यवस्था आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतीमालासंबंधी दैनंदिन व्यवहार होतात. सबब येथील आस्थापनावर अकृषिक कराची आकारणी होऊ नये, अशी आमची मागणी आहे. वाढीव करावर फेरविचार करण्यात यावा, याबाबत अतिरिक्त मुख्य सचिव आणि महसूल विभागाला बाजार समितीमधील भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दि पूना मर्चंट्स चेंबरकडून पत्र देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पणन संचालक सुनील पवार यांना निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com