वायदे बाजारातील हळदीचा व्यापार बंद करा

मराठवाडा, विदर्भ हळद व्यापारी असोसिएशनची मागणी
Turmeric
TurmericAgrowon


हिंगोली ः मागील तीन ते चार वर्षांपासून हळदीच्या वायदे बाजारातील दर आणि चालू बाजारपेठांतील दर यामध्ये खूप मोठी तफावत निर्माण करून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. त्यामुळे एनसीडीईएक्स आणि बीएसई (वायदे बाजार) Future Trading मधील हळदीचा Turmeric व्यापार Trading रद्द करावा, अशी मागणी मराठवाडा, विदर्भ हळद व्यापारी असोसिएशनतर्फे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे करण्यात आली आहे.

Turmeric
Turmeric Market : सततच्या पावसाने हळद पिकाला फटका | Agrowon

भारत सरकारने शेतकऱ्यांकरिता पुढील सहा महिन्यांचे (फ्यूचर प्राइस) पिकाच्या दरांची माहिती होण्याकरिता एनसीडीईएक्स आणि बीएसईमध्ये वायदे बाजार सुरू केले. परंतु काही मोजके व्यापारी कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये काम करत आहेत. सोयीनुसार मालाचे दर निश्‍चित करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सद्यःस्थितीत भारतातील हळदीचे एकूण उत्पादन एक कोटी पोते आहे. त्यापैकी ४५ ते ५० टक्के उत्पादन हे केवळ मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, विदर्भातील वाशीम या जिल्ह्यांत होते. या भागातील हळदीची आवक एप्रिल महिन्यात सुरू होते. त्या वेळी भारतातील नामांकित मसाला कंपन्या पावडरकरिता हळद खरेदी करतात. निर्यातदारसुद्धा येथे खरेदी केलेला माल विदेशात पाठवतात. या भागातील बाजारपेठांमध्ये वर्षातील १२ महिने हळदीचा मोठा व्यापार चालतो. काही मोजके व्यापारी आणि कंपन्या भारतातील हळदीच्या उत्पादनाच्या २ ते ३ टक्के माल वायदे बाजारातील गोदामात साठवणूक करतात. त्यावरून ९७ टक्के मालाचे दर ठरवतात. परंतु उत्पादनाच्या ६० टक्के माल मार्चनंतर बाजारपेठेत यायला सुरुवात होते. वायदे बाजारात २०२३ मधील एप्रिलचा व्यापार नोव्हेंबर २०२२ ला सुरू करतात. त्या वेळेस भारतातील कुठल्याही बाजार पेठेत २०२३ च्या नवीन मालाची आवक सुरू होत नाही. एप्रिलचा वायदा हे काही मोजके व्यापारी त्यांच्या सोयीनुसार हळदीचे दर ठरवून त्याचा व्यापार सुरू करतात. वायदे बाजारात कुठल्याही शेतकऱ्याने खरेदी-विक्री करिता नोंदणी केलेली नाही. त्यामुळे शेतकरी या वायदे बाजारामध्ये खरेदी-विक्रीचा व्यापार करत नाहीत. त्यामुळे हळदीचे दर हे काही मोजके व्यापारीच ठरवतात. त्याचा फायदा एक विशिष्ट वर्गाला होतो.
वायदे बाजारातील हळदीचे दर तेलगंणातील निजामाबाद येथील बाजारपेठेवर अवलंबून असतात. तेथे मे महिन्यानंतर हळदीचा व्यापार फार किरकोळ प्रमाणात होतो. परंतु वर्षभराचे हळदीचे दर येथील बाजारपेठेवर अवलंबून असतात. या दरातील तफावतीमुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वायदे बाजारातील हळदीचे वायदे बंद करून शेतकऱ्यांचे नुकसान थांबवावे, अशी मागणी मराठवाडा, विदर्भ हळद व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गजाननराव घुगे यांनी केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com