जादा दराने खते विक्री केल्यास कठोर कारवाई

परवाना अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे यांचा इशारा
Fertilizer
Fertilizer Agrowon

पुणे : रासायनिक खतांच्या (Chemical Fertilizer) अंतिम खत विक्री दरात (Fertilizer Rate) एक एप्रिलपासून सुधारणा करण्यात आलेली आहे. निश्‍चित दरापेक्षा अधिक दराने विक्री (Excess Fertilizer Rate) करत असल्याचे आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परवाना अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे (Dnyaneshwar Bothe) यांनी कळविले.

युरिया खताची किंमत प्रतिबॅग २६६.५० रुपये निश्‍चित आहे. डीएपी खताची प्रतिबॅग किंमत इफ्को, जीएसएफसी, आरसीएफ, कृभको, आयपीएल, झुआरी पीपीएल, एमसीएफएल, कारोमंडल, स्पीक, चंबळ या नाममुद्रेची १ हजार ३५० रुपये, तर एनएफएल कंपनीच्या खताची किंमत प्रतिबॅग १ हजार २०० रुपये निश्‍चित करण्यात आलेली आहे.

एमओपी खताची किंमत जीएसफसी, आरसीएफ, आयपीएल, चंबळ या कंपनीच्या प्रतिबॅगची विक्री किंमत एक हजार ७००, एनएफएल १ हजार १००, तर कोरोमंडलची १ हजार रुपये निश्‍चित करण्यात आली आहे. दीपक फर्टिलायझर्सच्या २४:२४:०० खताची किंमत १ हजार ९०० रुपये, कोरोमंडलच्या २४:२४:०:८५ खताची किंमत १ हजार ९०० रुपये निश्‍चित करण्यात आली आहे.

२०:२०:०:१३ या खताची इफ्को कंपनीच्या खताची प्रतिबॅग किंमत १ हजार ४००, दीपक फर्टिलायझर्स, कोरोमंडल- १ हजार ४५० रुपये, जीएसएफसी- १ हजार ३२५ रुपये, आरसीएफ १ हजार १५० रुपये, कृभको- १ हजार ३०० रुपये, आयपीएल- १ हजार ३२०, झुआरी पीपीएल, एमसीएफएल, चंबळ, एनएफएल- १ हजार ४७० रुपये, स्पीक-१ हजार ४७५ रुपये यापेक्षा अधिक दराने एका बॅगेची विक्री करता येणार नाही.

झुआरी पीपीएल/ एमसीएफएल कंपनीच्या १९:१९:१९ या खताची प्रतिबॅग किंमत एक हजार ५७५ रुपये, १०:२६:२६ या खताची इफ्को, दीपक फर्टिलायझर्स, कृभको, झुआरी पीपीएल, एमसीएफएल, कोरोमंडल, चंबळ आणि एनएफएल कंपनीच्या खतांची किंमत प्रतिबॅग १ हजार ४७० रुपये, तर जीएसएफसी- १ हजार ४४० रुपये प्रतिबॅग, १२:३२:१६ या रासायनिक खताची जीएसएफसी कंपनीच्या खताची १ हजार ४५० रुपये तर इतर कंपन्यांच्या खताची १ हजार ४७० रुपये, १४:३५:१४ या कोरोमंडलच्या खताची किंमत प्रतिबॅग १ हजार ९०० रुपये आहे.

जादा दराने खत विक्री करताना आढळल्यास जिल्हा स्तरावरील संनियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. ०२०- २५५३७७१८,२५५३८३१०, भ्रमणध्वनी क्र. ९१५८४७९३०६ ई-मेल आयडी dsaopune@gmail.com, adozppune@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन बोटे (भ्र. क्र. ९४२२३८४३८४) यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com