साखरेला ३५०० रुपये भाव मिळाला तरच उसाला दर

चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक साखर कारखान्यातर्फे गळीत हंगाम २०२१-२२ साठी रोलर पूजन आमदार नाईक यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १४) पार पडले, त्या वेळी ते बोलत होते.
साखरेला ३५०० रुपये भाव मिळाला तरच उसाला दर
SugarcaneAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
शिराळा, जि. सांगली : ‘साखरेला (Sugar) ३ हजार ५०० रुपये भाव मिळाला तरच सहकारी साखर कारखाने उसाची (Sugarcane) आधारभूत किंमत (FRP) देऊ शकतील,’ असा पुनरुच्चार विश्वासराव नाईक (Vishwasrao Naik) कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक केला.

चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक साखर कारखान्यातर्फे गळीत हंगाम २०२१-२२ साठी रोलर पूजन आमदार नाईक यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १४) पार पडले, त्या वेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते. या वेळी संचालक विराज नाईक, दिनकरराव पाटील, सुरेश पाटील, विजयराव नलवडे, बाबासाहेब पाटील, सुरेश चव्हाण, डॉ. राजाराम पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक दीपक पाटील, सचिव सचिन पाटील उपस्थित होते.

आमदार नाईक म्हणाले, ‘सहकारी साखर कारखानदारी प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत आहे. सहकारी कारखानदारी टिकवायची असेल, तर उसाला जशी आधारभूत किंमत निश्चित केली आहे, त्याप्रमाणे साखरेसाठीही करणे काळाची गरज बनली आहे. साखरेबाबतचे निर्यात धोरण निश्चित करायला हवे. सध्या देशातील बाजारपेठेत साखरेला म्हणावा तसा उठाव नाही. केंद्र सरकारचे निर्यात धोरण कचखाऊ आहे. सध्या निर्यात होणाऱ्या साखरेला चांगला दर येत असताना केंद्राने निर्यातबंदी केली आहे. त्यामुळे पुन्हा कारखानदारीपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. यातून कारखान्यांची मुस्कटदाबी होत आहे. साखरेला किमान ३ हजार ५०० रुपये दर मिळाला तरच कारखाने उसाची आधारभूत देऊ शकतील; अन्यथा अडचणी निर्माण होणार आहेत.’

ते म्हणाले, ‘गेल्या गळीत हंगामात कारखान्याने ५ लाख ८२ हजार ८८२ टन उसाचे गाळप केले. त्यातून ६ लाख ५७ हजार ५०० क्विंटल साखर पोती उत्पादन झाले. या गळीत हंगामातील आधारभूत किंमत २ हजार ९७२ रुपये होती. पहिल्या हप्त्यापोटी २ हजार ६०० रुपये, तर दुसऱ्या हप्त्यापोटी २०० रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केले आहेत. २०२२-२३ च्या हंगामात संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जोरावर कारखाना यापेक्षा उठावदार कामगिरी करेल.’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com