हे जीवन सुंदर आहे

‘जिधर जाते हैं सब जाना उधर अच्छा नहीं लगता मुझे पामाल रस्तों का सफ़र अच्छा नहीं लगता’ जावेद अख्तर यांच्या या ओळी आहेत, ज्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्याचे संकेत देतात.
Life
LifeAgrowon

‘जिधर जाते हैं सब जाना उधर अच्छा नहीं लगता

मुझे पामाल रस्तों का सफ़र अच्छा नहीं लगता’

जावेद अख्तर यांच्या या ओळी आहेत, ज्या प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्याचे संकेत देतात. सरधोपट वहिवाट सोडून स्वतःची अशी वेगळी वाट निर्माण करण्याची प्रेरणा देतात. पण काहींच्या नशिबातच एक वेगळेपण येते, हे जगापासून तोडणारे असते. ही वेगळी वाट सुखावह नक्कीच नसते तरीही ती चालावी मात्र लागते.

Life
Fertilizer Price Hike: खते महागल्यामुळे भात लागवड घटली?

स्वप्रतिमेवर प्रत्येकाचं अतोनात प्रेम असतं. तिच्यात निसर्गाने अनावश्यक लुडबुड केली तर जगच काय पण आपण स्वतःही नकारात्मकतेने भरून जातो. मग आपल्या आवडीनिवडी, तत्त्वांशी तडजोड करणे म्हणजे स्वत्वाचाच बळी देणे त्यांना अपरिहार्य असते. तरीही कुठंतरी नेणिवेच्या तळातून येणारे सूर डोक्यात वाजत असतात, हे जीवन सुंदर आहे. त्यातलं सौंदर्य वेचण्यासाठी दृष्टी मात्र बदलायला हवी. स्वतःचा आधी स्वतःच स्वीकार करायला हवा.

Life
Kharip Sowing: मराठवाड्यात ४१ लाख ४३ हजार हेक्टरवर पेरणी

१८७४ मध्ये लंडनमधील न्यूहॅम येथे जन्मलेल्या मेरी ॲन बेवनची ही वेदनादायी कहाणी. तिचे नाव जगातील सर्वांत कुरूप महिला म्हणून इतिहासात नोंदवले गेले आहे. मेरी जन्माला आली तेव्हा सुंदरच होती. कुठल्याही मुलीप्रमाणे तिची भविष्यातील स्वप्ने होती. वयाच्या २९ व्या वर्षी तिचे थॉमस बिव्हन नामक युवकाशी लग्न झाले. तिला चार मुलेही झाली. परंतु नियतीला हे सुख मान्य नव्हते. तिला हार्मोन्स संबंधित अँक्रोमेगॅली डिसऑर्डर नावाच्या एका विचित्र आजाराने गाठले, त्यामध्ये शरीर अनियंत्रित पद्धतीने वाढते. यात तिच्या चेहऱ्याचा आकारही जरा जास्तच वाढून तो पुरुषी, कुरूप दिसू लागला. बाह्यसौंदर्यालाच भाळणाऱ्या जगात आंतरिक सौंदर्य कोण बघते. मेरीची थट्टा केली जाऊ लागली. त्यातच तिच्या पतीचे लग्नानंतर ११ वर्षांनी निधन झाले. मेरी कोलमडून गेली.

तिच्या भयप्रद रूपामुळे तिला कुणी नोकरीही देईना. तिच्या मुलांच्या भवितव्याचा गहन प्रश्‍न तिच्यापुढे होता. एक दिवस अचानक तिने पेपरमध्ये एक जाहिरात वाचली, जगातील सर्वांत कुरूप महिलांची ती स्पर्धा होती. ती स्पर्धा जिंकली. त्यातून तिने उत्तम कमाई केली. प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने तिच्या आजारालाच तिची शक्ती बनवले. शापाला वरदान बनवले. सतत होत असलेल्या अपमानाचा स्वतःच्या मनावर परिणाम होऊ दिला नाही. आपल्यातील न्यूनतेलाच आपलं बलस्थान बनवलं. कुरूपतेचा बाजार मांडावा लागला. लोकांना हसवण्याचेही तिने काम केले. आणि आपल्या मुलांचे उत्तम पालनपोषण, शिक्षण केले. तिच्यातली सुकुमार, कोमल स्त्री घनघोर अंधारातही पणती होऊन जळत राहिली, उजळत राहिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com