Tur Rate : कळमना बाजार समितीत तुरीच्या दरात सुधारणा

मागणी वाढल्याचे परिणामी गेल्या आठवड्याच्या तुलनेत तुरीच्या दरात सुधारणा नोंदविण्यात आली आहे.
Tur Rate
Tur RateAgrowon

नागपूर : मागणी वाढल्याचे परिणामी गेल्या आठवड्याच्या तुलनेत तुरीच्या दरात सुधारणा (Tur Rate Improve) नोंदविण्यात आली आहे. कळमना बाजार समितीत (Kalmana Market Committee) गेल्या आठवड्यात तुरीचे दर ६००० ते ६७०० रुपयांवर होते. तुरीची आवक (Tur Arriveal) गेल्या आठवड्यात ४५५ क्विंटल असताना या आठवड्यात तुरीचे दर (Tur Market Rate) ६६४० ते ७००१ रुपयांवर पोहोचले. या पुढील काळात दरात आणखी तेजीच्या अपेक्षेने आवक मात्र कमी होत २३० क्विंटलवर पोहोचल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

Tur Rate
तूर, कापूस एकत्र का घेऊ नये ?

प्रक्रिया उद्योजकांकडून तुरीची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत बाजारातील आवक कमी असल्याने या शेतमालाच्या दरात वाढ होत असल्याचे कळमना बाजार समितीमधील व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

Tur Rate
Tur Rate : तूर दरवाढीचा लाभ कुणाला?

बाजारात हरभऱ्याची आवक १०७३ क्विंटलची आहे. गेल्या आठवड्यात हरभरा दर ४००० ते ४८०० रुपयांवर होते. या आठवड्यात मात्र हरभरा दरात घसरण नोंदविण्यात आली आहे. ४३२५ ते ४७४१ रुपये प्रति क्विंटल दराने हरभऱ्याचे व्यवहार झाले. बाजारातील हरभऱ्याची आवक २५० क्विंटल असल्याचे सांगण्यात आले. तांदूळ आवक १५ क्विंटल तर दर २४०० ते २६०० असा होता. गेल्या आठवड्यात सोयाबीनचे व्यवहार ५४०० ते ६४७२ रुपयांनी झाले. सोयाबीनची बाजारातील आवक १६३ क्विंटलची होती. या आठवड्यात सोयाबीनचे दरदेखील घसरले ते ५२०० ते ६०६० रुपयांवर आले आहेत.

भुईमूग शेंगांची आवक ६० क्विंटल असून या आठवड्यात ४५०० ते ५००० रुपयांचा दर शेंगांना मिळाला. गेल्या आठवड्यात भुईमूग शेंगांचे दर ४००० ते ४५०० रुपयांवर होते. शेंगांची आवक १०० क्विंटलची होती. मागणी वाढल्याने शेंगांच्या दरात वाढ नोंदविण्यात आली आहे. गव्हाची आवक पाचशे क्विंटलची असून दर २१२५ ते २२६४ रुपये होते. बाजारात बटाटा आवक चांगलीच वाढली आहे. ती ३४१३ क्विंटलवर पोहोचल्याचे व्यापारी सूत्राने सांगितले. मध्य प्रदेशातूनदेखील मोठ्या प्रमाणावर बटाटा कळमना बाजारात दाखल होत आहे. १४०० ते १८०० रुपये असा दर बटाट्याला आहे. वाळलेल्या मिरचीची आवक १५७५ क्विंटल असून दर चांगलेच तेजीत आले आहेत. आठ हजार ते १७ हजार रुपये असा दर मिरचीला मिळत आहे. हिरव्या मिरचीची आवक ५४० क्विंटल तर दर २२०० ते २५०० असा होता. ढोबळी मिरचीला ४००० ते ४५०० रुपयांचा दर मिळत असून तिची आवक २८० क्विंटलची आहे. लसुन आवक ८०० क्विंटलची असून दर ५०० ते ३५०० रुपयांवर होते.

कोथिंबीरचे दरही तेजित आले आहेत. ४००० ते ७००० रुपये प्रति क्विंटल या दराने कोथिंबीरीचे व्यवहार होत असून आवक ३२० क्विंटलची आहे. गाजराचे दर २५०० ते २७०० याप्रमाणे असून आवक २५० क्विंटलची आहे. काकडीची आवक ३५० क्विंटल तर दर १५०० ते १७०० होते. कारल्याची आवक १४० क्विंटल तर दर २५०० ते ३००० रुपये याप्रमाणे होते. बाजारात कच्च्या आंब्याची आवक अद्यापही सुरू आहे. ती २२० क्विंटलचे असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले आंब्याचे व्यवहार ६००० ते ६५०० रुपये याप्रमाणे होत आहेत. पालक ३५०० ते ४००० रुपये क्विंटल असून आवक ४० क्विंटलची आहे.

लिंबूवर्गीय फळ पिकांचा आढावा

बाजारात मोसंबी फळांची आवक नियमित होत आहे. चांगल्या प्रतीच्या आणि मोठ्या आकारांच्या फळांची आवक ४० क्विंटलच्या घरात असून चार हजार ते पाच हजार रुपये क्विंटलचा दर मोसंबीला मिळत आहे. दोन नंबर प्रतिच्या मोसंबी फळांची आवक दहा क्विंटल तर दर २५०० ते ३००० रुपये होता. लहान आकाराच्या मोसंबी फळांची आवक सहा क्विंटलची आणि दर १५०० ते २००० रुपये असा होता. मागणी घटल्याच्या परिणामी बाजारातील लिंबाची आवकही कमी झाली आहे. ती ३० क्विंटल वर पोहोचली असून २५०० ते ३००० रुपयांचा दर याला मिळत आहे. उन्हाळ्यात लिंबाचे दर ११००० रुपये क्विंटलवर पोहोचले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com