देशात सोयाबीनखालील क्षेत्रात दोन टक्के वाढ

सोयाबीनचे दर सहा हजार रुपयांपर्यंत राहण्याचा अंदाज
Soybean
SoybeanAgrowon


नागपूर : सोयाबीनला मिळालेला चांगला दर पाहता यंदा देशभरात सोयाबीन लागवड क्षेत्रात दोन टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. देशात गेल्या वर्षी ११५.२० लाख हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड असताना हे क्षेत्र यंदा ११७.५० लाख हेक्टरवर पोहोचल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

Soybean
Crop Damage: सोयाबीन , कपाशी , तूर या पिकांना सर्वाधिक फटका | ॲग्रोवन

सोयाबीनला गेल्या हंगामात दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला होता. त्यामुळेच देशात यंदा सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात वाढ होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या ५ ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात यंदा सोयाबीन लागवड क्षेत्रात दोन टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. देशात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये सोयाबीन उत्पादनात लागवड क्षेत्रात आघाडीवर आहेत. देशातील एकूण लागवड क्षेत्रापैकी ८० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र या दोन राज्यांमध्येच आहे. मध्य प्रदेशात ४९.८० लाख हेक्टर तर महाराष्ट्रात ४० लाख हेक्टरवर सोयाबीन असते. २०२०-२१ हे वर्ष सोयाबीन उत्पादनाला पोषक राहिले. त्यामुळे देशात १३७ लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले. त्या आधीच्या वर्षात सोयाबीनची उत्पादकता ११२ लाख टन होती, असेही कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यंदादेखील देशात सोयाबीनची चांगली उत्पादकता होण्याचा अंदाज होता. अतिवृष्टी व पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनचे उत्पादन घटेल, अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रामध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यात संततधार पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीनमध्ये कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. फुलधारणेच्या अवस्थेत हा पाऊस होत असल्याने त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादकतेवर होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतसुद्धा हे पीक पावसामुळे प्रभावित झाले आहे. परंतु लागवड क्षेत्रात वाढ झाल्याने उत्पादकतेवर फारसा परिणाम होणार नाही, असाही सूर दुसऱ्या बाजूने उमटत आहे. हंगामाअखेरीस सोयाबीनच्या उत्पादनाआधारेच सोयाबीनचे दर बाजारात कमी-जास्त होतील. तरीसुद्धा येत्या हंगामात सोयाबीन दर सहा हजार रुपयांच्या पुढे राहतील, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.

Soybean
Soybean Disease: सोयाबीन पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव कसा टाळाल ? | ॲग्रोवन

दर सहा हजार रुपयांपर्यंत खाली येणार
सरकारने मार्च २०२४ पर्यंत वार्षिक २० दशलक्ष टन कच्चे सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील सीमाशुल्क आणि कृषी पायाभूत सुविधा उपकर रद्द केले आहेत. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षांमध्ये वार्षिक २० लाख टन क्रूड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावर आयात शुल्क लावले जाणार नाही. या निर्णयामुळे, ५ टक्के प्रभावी सीमाशुल्क आणि उपकर शून्यावर आणले जाईल आणि २०२२-२३ आणि २०२३ या आर्थिक वर्षांत एकूण ८ दशलक्ष टन कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफुल तेलाच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली जाईल. त्यामुळे नव्या सोयाबीनची आवक होईस्तोवर सोयाबीनचे दर ६००० ते ७३०० रुपयांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. नव्या सोयाबीनची आवक झाल्यानंतर हे दर सहा हजार रुपयांपर्यंत खाली येतील, असे कृषी विपणन क्षेत्रातील जाणकार सांगतात. सोयाबीनचा हमीभाव ३९५० रुपये आहे.
--
आतापर्यंत सोयाबीनची स्थिती समाधानकारक राहिली आहे. त्यामुळे सोयाबीनचा हंगाम चांगला राहील असा अंदाज आहे. या पुढील काळात मात्र वातावरणातील बदलाचा फटका बसल्यास त्यात घटदेखील होऊ शकते. शेतीमाल उत्पादकतेबाबत स्पष्टपणे काही सांगणे अशक्य आहे.
-डी. एन. पाठक, कार्यकारी संचालक, सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया
--
ब्राझील हा सोयाबीनचा मुख्य उत्पादक देश आहे. त्या भागातील परिस्थितीनुरूप जागतिक पातळीवर सोयाबीनचे दर कमी-जास्त होतात. असे असले तरी भारतात पशुखाद्यामध्ये सोयाडीओसीचा वापर होतो. त्याकरिता छोटे प्रक्रिया उद्योजक देशांतर्गत खरेदी करतात. त्यामुळे भारतात उत्पादन घटल्यास दर उच्चांकी राहतील, यात शंका नाही.
- अतुल सेनाड, माजी अध्यक्ष, धान्य व्यापारी संघटना, नागपूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com