भारतीय गव्हाची निर्यात न करण्याचे संयुक्त अरब अमिरातीचे आदेश

संयुक्त अरब अमिरातीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे धान्य उत्पादक देश असलेल्या भारतातून आयात केलेल्या गहू आणि गव्हाच्या पिठाची चार महिन्यांसाठी निर्यात न करण्याचे आदेश दिले असल्याचे बुधवारी (ता. १५) सांगण्यात आले.
भारतीय गव्हाची निर्यात न करण्याचे संयुक्त अरब अमिरातीचे आदेश
Wheat ExportAgrowon

अबुधाबी ः संयुक्त अरब अमिरातीने (UAE) जगातील दुसऱ्या क्रमांकाचे धान्य उत्पादक (Wheat Producer) देश असलेल्या भारतातून आयात केलेल्या गहू (Wheat Import) आणि गव्हाच्या पिठाची (Wheat Flour) चार महिन्यांसाठी निर्यात (Wheat Export) न करण्याचे आदेश दिले असल्याचे बुधवारी (ता. १५) सांगण्यात आले.

या आदेशाच्या हालचालीचे कारण जागतिक व्यापार प्रवाहातील व्यत्यय असल्याचे आखाती देशाच्या अर्थ मंत्रालयाने नमूद केले. परंतु भारताने देशांतर्गत वापरासाठी यूएईला गव्हाच्या निर्यातीस मान्यता दिली असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

आधीच जारी केलेल्या पतपत्राद्वारे ज्यांना पाठबळ दिले गेले आहे आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करू इच्छित असलेल्या देशांना वगळता भारताने १४ मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर अचानक बंदी घातली. तेव्हापासून ४ लाख ६९ हजार २०२ टन गहू पाठवण्याची परवानगी भारताने दिली आहे. भारताची गहू निर्यातबंदी सुरू झाल्यानंतर १३ मे पूर्वी अमिरातीमध्ये आणलेला भारतीय गहू निर्यात किंवा पुन्हा निर्यात करू इच्छिणाऱ्या कंपन्यांनी प्रथम अर्थ मंत्रालयाकडे अर्ज करणे आवश्यक असल्याचे एका निवेदनात म्हटले आहे.

संयुक्त अरब अमिराती आणि भारताने फेब्रुवारीमध्ये एका व्यापक व्यापार आणि गुंतवणूक करारावर स्वाक्षरी केली. ज्यामध्ये एकमेकांच्या वस्तूंवरील सर्व शुल्कात कपात करण्याचा प्रयत्न केला गेला आणि पाच वर्षांत त्यांचा वार्षिक व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी व्यापार करार (सीईपीए) म्हणून ओळखला जाणारा हा करार १ मे रोजी लागू झाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com