रशियाच्या धान्य निर्यातीला अमेरिकेचा पाठिंबा

रशियाच्या धान्य आणि खतांच्या शिपमेंटवर अमेरिकेचे कोणतेही निर्बंध नाहीत, परंतु निर्यातीसंदर्भात कंपन्या थोड्या चिंताग्रस्त आहेत.
Russia Export
Russia ExportAgrowon

जिनेवा ः रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) जगात धोक्यात आलेल्या अन्न सुरक्षेच्या (Food Security) पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्या प्रशासनाने रशियाच्या अन्नधान्य आणि खत निर्यातीला पाठिंबा दिला असल्याचे अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्र संघातील राजदूत लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांनी मंगळवारी (ता. ३१) सांगितले.

लिंडा यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पत्रकारांना सांगितले, की रशियाच्या धान्य आणि खतांच्या शिपमेंटवर अमेरिकेचे कोणतेही निर्बंध नाहीत, परंतु निर्यातीसंदर्भात कंपन्या थोड्या चिंताग्रस्त आहेत. अमेरिका रशियामधून अत्यंत आवश्यक असलेली कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी धान्य आणि खत निर्यातदार आणि विमा कंपन्यांना त्यासंबंधी पत्र देण्यास तयार आहे. युक्रेनमधून रेल्वे आणि काळ्या समुद्रातून धान्य निर्यात करण्यास तसेच रशियन खाद्यपदार्थ आणि खतांना जागतिक बाजारपेठेत अप्रतिबंधित प्रवेश मिळावा यासाठी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या प्रयत्नांना बायडेन प्रशासनाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

संयुक्त राष्ट्र संघाचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी सांगितले, की संयुक्त राष्ट्र परिषदेच्या व्यापार आणि विकास विभागाचे सरचिटणीस रेबेका ग्रिनस्पॅन यांनी सोमवारी मॉस्कोला भेट दिली आणि पहिले उपपंतप्रधान आंद्रेई बेलोसोव्ह यांच्याशी रशियन धान्य आणि खतांची निर्यात सुलभ करण्यासाठी रचनात्मक चर्चा केली. ग्रीनस्पॅन यांनी मंगळवारी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन अधिकाऱ्यांची भेट घेतली, असे असे दुजारिक यांनी सांगितले.

जागतिक भूक पातळी नवीन उच्च पातळीवर आहे, असे गुटेरेस म्हणाले. ते म्हणाले, की युक्रेन आणि रशिया मिळून जगातील जवळजवळ एक तृतीयांश गहू आणि बार्ली आणि निम्म्या सूर्यफूल तेलाचे उत्पादन करतात. तर रशिया आणि त्याचे मित्र बेलारूस हे खताचा मुख्य घटक असलेल्या पोटॅशचे जगातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे उत्पादक आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com