Soybean Market: अर्जेंटीनातील दुष्काळ सोयाबीनला आधार देईल का? 

अर्जेंटीनातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक भागांमध्ये सध्या कमी पाऊस आहे. मागील १५ दिवसांपासून येथील पिकाला पावसाची गरज होती. पाऊस झाला पण पण तो पुरेसा नाही.
Sotybean Rate
Sotybean Rate Agrowon

………………
अनिल जाधव

पुणेः देशातील शेतकरी सोयाबीन बाजारावर (Soybean Market) बारिक लक्ष ठेऊन आहेत. जवळपास दोन महीन्यांपासून सोयाबीन दर (Soybean Rate) कायम आहेत. मात्र शेतकरी सध्याच्या दरात जास्त माल बाजारात आणत नाहीत. शेतकऱ्यांना दरवाढीची (Price Hike) प्रतिक्षा आहे. तर दुसरीकडं आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) सोयाबीनच्या दरात चढ उतार होत आहेत. मात्र आता आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारातही सोयाबीन दर सुधारण्याची शक्यता निर्माण झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात चालू आठवड्यात चढ उतार सुरु आहेत. सोयाबीन दरात दिवसभरात ४ ते ५ टक्क्यांपर्यंत तेजी मंदी पाहायला मिळत आहे. सोयाबीनचे दर उच्चांकाहू कमी झाल्यानंतर दराला आधार मिळतोय. त्यामुळं दरात पुन्हा सुधारणा होतेय. चीनमधून वाढलेली मागणी आणि अर्जेंटीनात सोयाबीन पिकाला कमी पावसाचा बसणारा फटका, यामुळं सोयाबीन दराला आधार मिळतोय.

अर्जेंटीनातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक भागांमध्ये सध्या कमी पाऊस आहे. मागील १५ दिवसांपासून येथील पिकाला पावसाची गरज होती. पाऊस झाला पण पण तो पुरेसा नाही. पिकाला तग धरण्यासाठी आणखी पाऊस गरजेचा आहे. पण शेतकऱ्यांना अपेक्षित पाऊस पडला नाही. 

Sotybean Rate
Soybean Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत


त्यामुळं यंदा अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. अर्जेंटीनात हंगामाच्या सुरुवातील ५१० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज होता. मात्र आता काही जाणकार येथील उत्पादन ४२० लाख टनांवरच स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

अर्जेंटीनातील उत्पादन कमी होण्याच्या अंदजामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दराला आधार मिळतोय. मात्र दरात तेजीमंदी पाहायला मिळत आहे. काल बाजार १४.८७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाला होता. रुपयात सांगायचं झालं तर हा दर ४ हजार ४८९ रुपये क्विंटल होतो. तर आज दुपारी चार वाजेपर्यंत सोयाबीनचे वायदे १४.९३ डाॅलरवर पोचला. म्हणजेच आज ४ हजार ५०७ रुपये क्विंटलने सोयाबीनचे व्यवहार झाले.

……………
आजची आवक
देशातील बाजारात आज ४ लाख ४५ हजार क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलं होतं. आज मध्य प्रदेशपेक्षा महाराष्ट्रातील बाजारात आवक जास्त होती. आज महाराष्ट्रात २ लाख क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आलं होतं. तर मध्य प्रदेशात १ लाख ७५ हजार क्विंटल आणि राजस्थानमध्ये ३५ हजार टन तसचं इतर राज्यात ३५ हजार टन सोयाबीन विक्रीसाठी आलं होतं.

…………….
देशातील दरपातळी
दराचा विचार करता, आजही देशातील सोयाबीनची सरासरी दरपातळी कायम होती. आज सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळाला. तर प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ६०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होते.

……………
दर किती वाढू शकतात?
देशातील शेतकरी मागील काही दीड महिन्यापासून दरवाढीची वाट पाहत आहेत. मात्र दरात केवळ १०० ते २०० रुपयांची तेजी मंंदी पाहायला मिळतेय. मात्र अर्जेंटीनातील दुष्काळी स्थितीमुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढण्याचा अंदाज आहे. याचा फायदा देशातील सोयाबीनलाही मिळू शकतो. या महिन्यात सोयाबीनचे दर २०० ते ३०० रुपयाने वाढू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com