Chana Rate : हरभऱ्याचा पेरा खरंच वाढणार का?

देशातील रब्बी पेरणीनं चांगलाच वेग धरलाय. सध्या गव्हासोबत हरभरा पेरणीचाही वेग जास्त दिसतोय. मात्र गेले वर्षभर हरभरा दर दबावात राहीले होते.
Chana Rate
Chana RateAgrowon

पुणेः देशातील रब्बी पेरणीनं (Rabbi Sowing) चांगलाच वेग धरलाय. सध्या गव्हासोबत हरभरा पेरणीचाही वेग जास्त दिसतोय. मात्र गेले वर्षभर हरभरा दर (Chana Rate) दबावात राहीले होते. त्यामुळं शेतकरी हरभरा पेरणी कमी करतील, असा अंदाज होता. 

Chana Rate
Chana Sowing : हरभऱ्याचा पेरा खरंच वाढला का?

देशातील रब्बी पेरा सध्या जोमाने सुरु आहे. आजपर्यंत म्हणजेच १६ डिसेंबरपर्यंत देशात ५६५ लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत ५५३ लाख हेक्टर क्षेत्र रब्बीखाली आलं होतं. म्हणजेच यंदा २.२४ टक्क्यांनी रब्बी पेरणीचा वेग अधिक आहे. त्यातही कडधान्य पेरणी क्षेत्र ४.२३ टक्क्यांनी अधिक दिसतंय. आजपर्यंत १४० लाख हेक्टरवर कडधान्याचा पेरा झाला होता.

कडधान्यामध्ये हरभरा क्षेत्र जास्त असते. आजपर्यंत देशातील हरभरा लागवडीचा वेग ३ टक्क्यांनी अधिक होता. हरभरा लागवडीचा वेग आठवड्यागणिक कमी जास्त होताना दिसतोय. आतापर्यंत देशात ९८ लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला. गेल्यावर्षी याच काळात ९५ लाख हेक्टरवर हरभरा पीक होतं.

देशात सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक हरभरा लागवड क्षेत्र दिसतंय. एरवी, राजस्थानमध्ये लागवड अधिक असते. राज्यात २२ लाख ४६ हजार हेक्टरवर हरभरा लागवड झाली. यंदा राज्यात परतीचा पाऊस चांगला झाला. तसेच पावसानं उघडीप दिल्यामुळं पेरण्या वेगानं झाल्या. त्यामुळं सध्या हरभरा लागवड जास्त दिसतेय. गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत १८ लाख हेक्टरवर हरभरा पीक होतं.

महाराष्ट्रासोबतच राजस्थान, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात हरभरा पेरणीचा वेग जास्त दिसतोय. तर मध्य प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशात वेग कमी होता. राजस्थानमध्ये आजपर्यंत २१ लाख हेक्टर, कर्नाटकात ११ लाख ४९ हजार हेक्टर आणि उत्तर प्रदेश ६ लाख हेक्टरवर हरभरा पेरा झाला.

सध्या देशात आणि राज्यात हरभरा पेरणीचा वेग जास्त दिसतोय. मात्र लागवडीच्या शेवटी हरभरा क्षेत्र कमी होऊ शकतं, असा अंदाज हरभरा बाजारातील जाणकार व्यक्त करत आहेत. मागील वर्षभर हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला. सध्याही हरभरा ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपये दर मिळतोय. त्यामुळं शेतकरी यंदा हरभऱ्याचा पेरा कमी करतील, असा अंदाज आहे.

Chana Rate
Cotton Rate : देशातील कापूस उत्पादन खरंच वाढणार का ?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com