Tur Market : शेतकरी तुरीची विक्री सोयाबीनप्रमाणंच करणार?

देशातील बाजारात सध्या तुरीची आवक काहीशी वाढली. मात्र यंदा शेतकरी कापूस आणि सोयाबीनप्रमाणं तुरीचीही टप्प्याटप्प्याने विक्री करतील, अशी चर्चा बाजारात सुरु आहे. त्यामुळे तुरीचे दर टिकून राहतील, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.
Tur Market
Tur MarketAgrowon


अनिल जाधव
पुणेः देशातील बाजारात सध्या तुरीची आवक काहीशी वाढली. मात्र यंदा शेतकरी कापूस आणि सोयाबीनप्रमाणं तुरीचीही टप्प्याटप्प्याने विक्री करतील, अशी चर्चा बाजारात सुरु आहे. त्यामुळे तुरीचे दर टिकून राहतील, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

Tur Market
Tur Market: देशात तुरीची टंचाई कायम राहण्याचा अंदाज |ॲग्रोवन

आफ्रिकेतील देशांमधील तुरीची आयात वाढली आहे. नोव्हेंबरमध्ये आफ्रिकेतील देशांमधून जवळपास २ लाख टन आयात झाली. यापैकी सर्वाधिक आयात मोझांबिकमधून झाली. मोझांबिकने नोव्हेंबरमध्ये जवळपास दीड लाख टन तूर भारताला निर्यात केली. त्यानंतर टांझानिया ३३ हजार टन मालावी १७ हजार टन, सुदान ७ हजार आणि युगांडामधून १२० टन तूर भारतात आली. तर म्यामारने १८ हजार टन तुरीची भारताला निर्यात केली. मात्र आफ्रिकेतील देशांमधून तूर आयातीची गती पुढील काळात कमी होण्याचा अंदाज आहे. 

दुसरीकडे देशातील तूर काढणीचा वेग वाढला. मात्र अनेक शेतकरी यंदा तूर लगेच विकताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी तूर कशी विकतात याची चर्चा सध्या बाजारात सुरु आहे. यंदा शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनची विक्री मर्यादीत ठेवली.  एरव्ही डिसेंबर महिन्यात कापूस आणि सोयाबीनचे दर कमी असतात. मात्र यंदा दर नरमल्यानंतर शेतकऱ्यांनी दरवाढण्याची वाट पाहण्याचे ठरवलं. त्यामुळं बाजारातील आवक सध्या कमी आहे. परिणामी दरातील घसरण थांबली. हाच गित्ता शेतकरी तुरीच्या बाबतीतही गिरवतील, असा अंदाज सध्या व्यक्त केला जातोय.

Tur Market
Tur Market : शेतकरी तुरीची आवक मर्यादीत ठेवणार का ?

…………..
शेतकऱ्यांना वस्तुस्थितीची माहिती
यंदा देशात तुरीची लागवड कमी झाली. तसंच पिकाचं नुकसानही झालं. त्यामुळं तुरीचं उत्पादन कमी राहीलं, याचा अंदाज शेतकऱ्यांनाही आहे. त्यामुळं शेतकरी तुरीची विक्री एकदाच न करता टप्प्याटप्याने करू शकतात, असं सध्या व्यापारी सांगत आहेत. बाजारात एकदाच आवकेचा दबाव न वाढता मर्यादीत पुरवठा झाल्यास दरही टिकून राहतील.
…………
सध्याची दरपातळी
सद्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ९०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. हा दर आवकेच्या काळात टिकून राहू शकतो. तर चालू हंगामाचा विचार करता तुरीला सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com