Soybean : देशात ४० लाख टन सोयाबीन शिल्लक?

देशात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन रोखल्याने दर तेजीत होते. परिणामी एक ऑगस्टपर्यंत देशातील बाजारांमध्ये गेल्यावर्षीपेक्षा ८ लाख टनांनी आवक कमी झाली. तसंच गाळपही कमी झालं. देशात सोयाबीनचा शिल्लक साठा अधिक आहे.
Soybean
Soybean Agrowon

तुरीच्या दरावर मसूरचा दबाव

मसूर डाळ ही काही प्रमाणात तुरीच्या डाळीला पर्याय मानली जाते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मसूरचे दर कमी झाले. त्यामुळं देशातही मसूरचे दर नरमले. ही ग्राहकांसाठी खुषखबर आहे, मात्र शेतकऱ्यांना चिंता वाढणारी बातमी आहे. कारण मसूरचे दर कमी राहिले किंवा वाढले तरी तुरीच्या दरावरही परिणाम होतो. कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात उत्पादन वाढल्यानं मसूर स्वस्त झालीये. त्यामुळं यंदा आयात वाढण्याची शक्यता आहे. स्वस्त मसूर आयात झाल्यास त्याचा परिणाम तुरीच्या दरावरही होईल. परिणामी तुरीचे दरही नरमतील, असा अंदाज व्यक्त होतोय. सध्या तुरीला राज्यात ७ हजार ७०० ते ८ हजार ४०० रुपये दर मिळतोय. हा दर पुढील काळात काहीसा नरमेल, अशी शक्यता व्यक्त होतेय.

Soybean
Tur Rate : तुरीचे दर विक्रमी टप्पा गाठतील का?

भेंडीचे दर टिकून राहण्याचा अंदाज

जुलै महिन्यापासून राज्यात भाजीपाला पिकांना पावसाचा फटका बसतोय. पावसामुळं भेंडी उत्पादन कमी झालंय. परिणामी मागील महिन्यात भेंडीची आवक कमी होती. ऑगस्टमध्ये बाजारातील भेंडी आवक काहीशी वाढली. सध्या बाजारात सरासरी आवक होतेय. मात्र श्रावण महिन्यामुळं मागणी वाढलेली आहे. त्यामुळं दरातील तेजी कायम आहे. सध्या राज्यात भेंडीला ४ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. पुण्यात सरासरी ३ हजार ५०० रुपये दर मिळाला. तर मुंबईच्या मार्केटमध्ये ५ हजाराने भेंडी विकली गेली. सध्या पिकाची स्थिती पाहता हे दर टिकून राहण्याची शक्यता आहे.

Soybean
Cotton Rate : कापूस यंदाही भाव खाणार?

कापूस यंदाही भाव खाण्याची शक्यता

देशातील मल्टी कमोडिटीज् एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवर गुरुवारी कापसाचे ऑगस्ट महिन्याचे वायदे ४८ हजार ९०० रुपये प्रतिगाठीने झाले. एक कापूस गाठ १७० किलोची असते. ऑगस्टच्या वायद्यामध्ये मागील १५ दिवसांत जवळपास १२ टक्क्यांची वाढ झाली. तर नोव्हेंबरचे वायदे ३४ हजार ९४० रुपयाने पार पडले. देशात सध्या कापसाचा कमी पुरवठा आहे. तसचं खरिपातील पिकाचं नुकसानही होतंय. तर तिकड अमेरिकेत पिकाला दुष्काळाचा फटका बसतोय. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर वाढत आहेत. त्यामुळं कापूस आवकेच्या काळातही दर चांगले असतील. शेतकऱ्यांना ७ हजार ५०० ते ८ हजार रुपये दर मिळू शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.

Soybean
Chana : हरभरा विक्रीचे चुकारे थकलेलेच

काबुली हरभऱ्यातील तेजी कायम राहणार

देशात काबुली हरभऱ्याचा तुटवडा जाणवतोय. त्यातच पुढील तीन महिन्यांमध्ये मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सणांच्या काळात काबुली हरभऱ्याला मागणी जास्त असते. त्यामुळं काबुली हरभरा दर वाढतील. आंतरराष्ट्रीय बाजारातही काबुलीची कमी उपलब्धता आहे. त्यामुळं दर वाढलेले आहेत. सध्या देशातील विविध बाजारांमध्ये काबुली हरबऱ्याला १० हजार ते ११ हजार रुपये दर मिळतोय. मात्र मागणी वाढल्यास दर १२ हजार ते १२ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढू शकतात, असंही जाणकारांनी सांगितलं.

देशात ४० लाख टन सोयाबीन शिल्लक?

देशात सध्या गाळप न केलेल्या सोयाबीनचं (Soybean Crushing) प्रमाण गेल्यावर्षीपेक्षा तब्बल चार पटींनी अधिक असल्याचं सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (Soybean Processor Association Of India) अर्थात सोपानं सांगितलं. चालू हंगामात देशात सोयाबीनचं १२० लाख टन उत्पादन झालं होतं. त्यापैकी जवळपास १११ लाख टन सोयाबीन गाळपासाठी उपलब्ध झालं. मात्र आधीच्या हंगामात सोयाबीनला मिळालेला दर पाहता शेतकऱ्यांनी एकदाच विक्री न करता टप्प्याटप्प्याने विक्री सुरु ठेवली. त्यामुळं हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीन दर तेजीत होते.

गेल्या हंगामात ऑक्टोबर ते जुलै या १० महिन्यांमध्ये ९० लाख टन सोयाबीन बाजारात आलं होतं. मात्र यंदा याच काळात केवळ ८२ लाख टन सोयाबीन विकलं गेलं. म्हणजेच यंदा सोयाबीन आवकेत ८ लाख टनांची घट झाली. तर दुसरीकडं गाळपात मोठी घट झाली. यंदाच्या पहिल्या दहा महिन्यांमध्ये सोयाबीन गाळप २० लाख टनांनी कमी झालंय. एक ऑगस्टपर्यंत देशात ६७ लाख ५० हजार टनांचच गाळप झाल्याचं सोपानं सांगितलं. त्यामुळं शेतकरी, प्रक्रिया प्लांट्स आणि व्यापारी यांच्याकडं ४० लाख टन सोयीबीन शिल्लक आहे. गेल्यावर्षी केवळ ९ लाख टन सोयाबीन शिल्लक होतं. म्हणजेच यंदा विक्रमी सोयाबीनचा शिल्लक साठा आहे. मात्र या शिल्लक साठ्याचा पुढील हंगामातील सोयाबीन दरावर परिणाम होणार नाही, असं जाणकारांनी सांगितलं. सध्या पावसामुळं सोयाबीन पिकाचं नुकसान होतंय. त्यामुळं उत्पादनाला फटका बसू शकतो. सध्याची स्थिती पाहता सोयाबीनला ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांचा दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com