बंदरांवर अडकला १७ लाख टन गहू

केंद्र सरकारने गहू निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आजघडीला विविध बंदरांवर किमान १७ लाख टन गहू पडून आहे. आता लवकरच पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा गहू पावसात भिजून खराब होण्याची भीती आहे.
बंदरांवर अडकला १७ लाख टन गहू
wheatagrowon

1. केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंधनं घातली असली तरी त्यामुळे साखरेच्या दरात पडझड होण्याची शक्यता नाही. देशात साखरेच्या शिल्लक साठ्यांचं प्रमाण कमी राहणार आहे. तसेच स्थानिक मागणीही चांगली आहे. त्यामुळे साखरेचे(sugar) दर स्थिर राहतील, अशी माहिती साखर उद्योगातील जाणकारांनी दिली. केंद्र सरकारने यंदा १० दशलक्ष टन एवढीच साखर निर्यात करता येईल, अशी मर्यादा नुकतीच घातली. गेल्या वर्षी ७.२ दशलक्ष टन साखर निर्यात करण्यात आली होती. एक ऑक्टोबरपासून नवीन गळीत हंगाम सुरू होईल. तेव्हा साखरेचा उपलब्ध शिल्लक साठा ६.२ दशलक्ष टन राहील, असा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांतील हा सगळ्यात कमी साठा असेल. यंदा स्थानिक मागणी चांगली असल्यामुळे साखरेचा खप वाढला आहे. विशेषतः आईसक्रीम आणि शीतपेये उद्योगाकडून मागणीत मोठी वाढ झाली. उन्हाचा चटका आणि उष्णतेची लाट यामुळे यंदा आईसक्रीमचा खप मोठ्या प्रमाणात वाढला.

2. पुढील दोन आठवड्यात दक्षिण भारतातील राज्यांमध्ये टोमॅटोचे दर स्थिर होतील, असा दावा केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी केला. दक्षिणेकडील राज्यांमध्ये टोमॅटोचे दर भडकले आहेत. स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोचा(Tomatoes) किरकोळ विक्रीचा दर प्रति किलो ५० ते १०६ रुपये इतका झाला आहे. महाराष्ट्रातही हीच अवस्था आहे. दक्षिण भारतात अनेक ठिकाणी पाऊस झाल्यामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे टोमॅटोच्या दरात वाढ झाली, ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशातील विविध भागात टोमॅटोचे दर ४० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. मुंबई आणि कोलकाता शहरात ७७ रुपये किलो या दरानेही टोमॅटो विकले गेले. दिल्ली वगळता देशातील प्रमुख महागनरांमध्ये टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

3. भारताला खताची गरज भागवण्यासाठी आयातीवर अवंलबून राहावं लागतं. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किंमती आभाळाला भिडल्या आहेत. खतांसाठी द्याव्या लागणाऱ्या अनुदानामुळे सरकारी तिजोरीवर पडणारा प्रचंड भार पडत असल्याने सरकार त्रस्त झालं आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी खतांचा(Fertilizer वापर कमी करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन केलं जात आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीला राजाश्रय देण्याचा प्रयत्न होत आहे. पंरतु तज्ज्ञांच्या मते भारतासारख्या देशाला सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करताना सावधपणे पावलं उचलावी लागतील, अन्यथा श्रीलंकेसारखी अवस्था होऊ शकते. श्रीलंकेत अचानाक रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळण्याची सक्ती करण्यात आली. कोणतेही दीर्घकालिन नियोजन न करता हा तुघलकी निर्णय घेण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून तिथे अन्नतुटवडा आणि आर्थिक मंदी ओढवली.

4. यंदाच्या खरीप हंगामात डाळिंबाच्या नवीन लागवडी वाढण्याची चिन्हे आहेत. राज्यात खानदेश (प्रामुख्याने कळवण-सटाणा-मालेगाव-देवळा म्हणजेच कसमादे) हा डाळिंबाचा जुना पट्टा म्हणून ओळखला जातो. तेथे गेल्या काही वर्षांत मर, तेलकट डाग रोगामुळे डाळिंब शेतीत चढ-उतार दिसून आले. परंतु तिथे यंदा मोठ्या प्रमाणात नवीन लागवडी सुरू झाल्या आहेत. तर काही भागांत शेतकरी द्राक्ष शेतीला पर्याय म्हणून डाळिंबाला (Pomegranate)पसंती देत आहेत. राज्यात सोलापूर परिसर हा डाळिंब लागवडीचा एक मोठा पट्टा आहे. तेथे गेल्या दोन वर्षांपासून अतिरिक्त पाऊस, रोगराई यामुळे डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात तोडण्यात आल्या. परंतु तिथेहा आता नव्याने डाळिंब लागवड वाढत आहे.

wheat
शेतजमिनीच्या किंमत निर्देशकांची नोंद घेता येणार

5. मोदी सरकारने गहू निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आजघडीला विविध बंदरांवर किमान १७ लाख टन गहू पडून आहे. आता लवकरच पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा गहू पावसात भिजून खराब होण्याची भीती आहे. निर्यातबंदीमुळे मे महिन्यातील गहू (wheat)निर्यात ११.३ लाख टनावर घसरली. एप्रिल महिन्यात १४.६ लाख टन इतकी विक्रमी गहू निर्यात झाली होती. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे. उष्णतेच्या लाटेमुळे देशातील उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटल्यामुळे आणि गव्हाच्या किंमती वाढल्याने सरकारने १३ मे रोजी गव्हावर निर्यातबंदी लागू केली. पण ज्या व्यवहारांमध्ये लेटर ऑफ क्रेडीट (एलसी) जारी करण्यात आले आहेत त्यांना या बंदीतून वगळण्यात आले. तसेच भारत सरकारने ज्या देशांना अन्नसुरक्षेसाठी गहू पुरवण्याची परवानगी दिली असेल, त्यांनाही या बंदीतून सूट देण्यात आली. परंतु अजूनही किमान १७ लाख टन गहू वेगवेगळ्या बंदरांवर अडकून पडला आहे, अशी महिती सूत्रांनी दिली. गुजरातमधील कांडला आणि मुंद्रा या दोन बंदरांवरच सगळ्यात जास्त गव्हाचा साठा अडकून पडला आहे. या दोन ठिकाणी मिळून एकूण १३ लाख टन गहू आहे. सरकारने अन्नसुरक्षा अबाधित राखण्यासाठी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. परंतु जर बंदरांवर अडकून पडलेला गहू पावसामुळे भिजून गेला तर त्यात कोणाचाच फायदा होणार नाही, असे निर्यातदारांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com