Tur rate
Tur rate Agrowon

Tur Rate : आयातीमुळे तुरीच्या दरातील तेजीला ब्रेक?

आफ्रिकेतील देशांमधून स्वस्त तुरीची आयात वाढत आहे. तसेच या देशांमधून आयात होणारी तूर म्यानमारच्या तुरीपेक्षा स्वस्त आहे. त्यातच सरकारने आत्तापर्यंत १२ हजार टन आयात तुरीची खरेदी केली.

सोयाबीन दरात नरमाई

1. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये काहीशी नरमाई दिसून आली. तसंच देशातही सोयापेंडचे दर काहीसे नरमले होते. परिणामी देशातील बाजारात सोयाबीन दरात क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांची तूट पाहायला मिळाली. देशात सध्या सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला. तर कमाल दरही बहुतेक बाजारांमध्ये कमी झाले होते. मात्र देशातील सोयाबीनची मागणी आणि पुरवठा बघता दर किमान ५ हजार आणि कमाल ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

Tur rate
Soybean Rate : सोयापेंड निर्यातवाढीचा शेतकऱ्यांना फायदा

कापसाचे दर ३०० रुपयाने तुटले

2. देशातील बाजारात आज कापूस दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची तूट आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर नरमल्याचा परिणाम देशातील कापूस बाजारावर झाल्याचं अभ्सासकांनी सांगितलं. आज देशातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ६०० ते ८ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तर कमाल दर ९ हजार ५०० रुपयांपर्यंत स्थिरावला होता. आज दर नरमले तरी देशातील कापूस मागणी आणि पुरवठा बघता सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

Tur rate
Cotton Rate : कापूस दर नरमले

हरभरा दर दबावातच

3. देशात आता लग्नसराईचा हंगाम सुरु झाला. या काळात बेसणला मागणी जास्त असते. तसेच हरभरा डाळीलाही उठाव असतो. मात्र असं असूनही हरभरा दर दबावात आहेत. नाफेडच्या विक्रीचा जास्त दबाव हरभरा दरावर असल्याचं जाणकार सांगतात. सध्या हरभऱ्याला खुल्या बाजारात ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपये दर मिळतोय. या दरात क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांची तेजीमंदी येऊ शकते, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

गुळाला अपेक्षेपेक्षा कमी दर

4. राज्यात परतीचा पाऊस थांबल्यानंतर गुऱ्हाळे आता सुरु झाली आहेत. तर दिवाळी पाडव्याला मुहुर्ताचे सौदे होऊन गूळ बाजारही सुरु झाला. मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच गुळाला अपेक्षित दर मिळातानाही दिसत नाहीये. उत्पादकांना गुळासाठी ४ हजारांपेक्षा जास्त दर अपेक्षित आहे. तर बाजारमध्ये सध्या केवळ सरासरी ३ हजार ३०० ते ३ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. हे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज गूळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

आयातीमुळे तुरीच्या दरातील तेजीला ब्रेक?

5. देशात सध्या आफ्रिकी देशांमधून कमी दरात तुरीची आयात (Tur Import) वाढली आहे. त्यामुळं देशातील तुरीच्या तेजीला ब्रक लागला. म्यानमारच्या तुरीपेक्षा आफ्रिकेतून आयात केलेली तूर स्वस्त (Tur Rate) आहे. त्यामुळं यापासून निर्मित डाळीचे दरही (Dal Rate) कमी आहेत. याचा दबाव देशातील तुरीच्या बाजारावर (Tur Market) येतोय. पुढील महिन्यापासून देशातील नवी तूर बाजारात येईल. नव्या मालाची आवक हळूहळू वाढेल. त्यामुळं तुरीच्या दरांवरही दबाव येण्याचा अंदाज व्यक्त होतोय. ही शक्यता लक्षात घेऊन स्टाॅकिस्ट आपल्याकडील साठा हळूहळू बाजारात आणत आहेत. मात्र देशातील आवक वाढत नाही तोपर्यंत तुरीचे दर टिकून राहण्यास मदत होत आहे.

तर सध्या सरकार म्यानमारमधून आयात तुरीची ७ हजार ९५० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करत आहे. हा दर सध्या सरकारकडे उपलब्ध असलेल्या साठ्याच्या तुलनेत खुपच जास्त आहे. तर आफ्रिकेतून आयात होणाऱ्या तुरीला ५ हजार ९८० रुपये दर दिला जात आहे. सरकारने आत्तापर्यंत १२ हजार टन आयात तूर खरेदी केली आहे. तर देशात यंदा तूर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं सरकारनेही आयात तूर खरेदीवर जोर दिलाय. परिणामी शेतकऱ्यांची तूर बाजारात आली तरी दर तेजीत राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यंदा तूर सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान विकली जाऊ शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com