Chana Market : बदलते वातावरण, पावसामुळे हरभऱ्याचे नुकसान वाढले

देशातील काही बाजारात सध्या नवा हरभरा दाखल होत आहे. तर दुसरीकडे नाफेडही स्टाॅकमधील हरभरा कमी दरात बाजारात आणत आहे. अनेक केंद्रावर नाफेडची विक्री सुरु आहे. त्यामुळे हरभरा दरावर दबाव आहे.
Chana Market
Chana MarketAgrowon

1. कापसाच्या दरात चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कापूस दरातील (Cotton Rate) तेजी टिकून आहे. हजर बाजारातील दरही कायम आहेत. तर वायदे आज दुपारपर्यंत ८६.४० सेंट प्रतिसेंटवर होते.

देशातील बाजारात मात्र कापसाचे भाव (Cotton Rate) आजही टिकून होते.

कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर होते. मात्र पुढील काही दिवसांमध्ये कापसाच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Chana Market
Kabuli Chana Market : काबुली हरभऱ्याचे दर का नरमले?

2. सोयाबीन दर दबावातच

देशातील बाजारात सोयाबीनचे दर आजही दबावात होते. सोयाबीनचे दर मागील महिनाभरापासून एकाच भावपातळीवर कायम आहेत.

आजही सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये दर मिळाला. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे वायदे तेजीत आहेत.

आज दुपारपर्यंत सोयाबीन १५.३६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड ४८२ डाॅलर प्रतिटनांवर होते.

देशातील भाव सध्या दबावात असले तरी पुढील काळात दर सुधारु शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Chana Market
Chana Pusa JG -16 : हरभऱ्याचे हे वाण दुष्काळ आणि मर रोगाला सहनशील

3. गव्हाचे बाजारभाव तेजीत

सरकारने खुल्या बाजारात ३० लाख टन गहू विक्रीचा निर्णय घेतला. त्यानंतर दरात क्विंटलमागं ५०० रुपयांपर्यंत नरमाई आली होती.

मात्र मागील दोन दिवसांपासून दरात पुन्हा सुधारणा होत आहे. गव्हाचे दर सरासरी २ हजार ७०० रुपयांवरून २ हजार ९०० रुपयांपर्यंत वाढले आहेत.

सध्या गव्हाची टंचाई असल्याने दरातील वाढ कायम राहील, असा अंदाज गहू बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. 

Chana Market
Wheat production: यंदा भारतात गव्हाचे बंपर उत्पादन होणार?

4. लसणाचे दर कायम

राज्यातील बाजारात सध्या लसणाची आवक कमी झाली आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूर बाजार समित्या वगळता इतर बाजार समित्यांमधील सरासरी आवक कमी होती.

त्यामुळं सध्या लसणाला सरसारी २ हजार ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. लसणाचा हा दर पुढील काळातही टिकून राहील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

देशातील बाजारात हरभरा दर आजही दबावात आहेत. काही बाजारांमध्ये नव्या हरभऱ्याची आवक आणि नाफेडच्या विक्रीचा दरावर दबाव आहे.

यंदा देशात हरभरा लागवड कमी झाली. त्यातच बदलते हवामान आणि पावसाचा पिकाला फटका बसतोय.

मग या स्थितीत हरभरा बाजार कसा राहील? यंदा हरभऱ्याला दराचा आधार मिळेल का? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

देशातील काही बाजारात सध्या नवा हरभरा दाखल होत आहे. तर दुसरीकडे नाफेडही स्टाॅकमधील हरभरा कमी दरात बाजारात आणत आहे.

अनेक केंद्रावर नाफेडची विक्री सुरु आहे. त्यामुळे हरभरा दरावर दबाव आहे. सध्या बाजारात हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपये दर मिळत आहे.

सध्या प्रक्रिया उद्योग गरजेप्रमाणे हरभऱ्याची खरेदी करत आहे. बाजारावर नाफेडच्या विक्रीचाही दबाव असल्याने उद्योग आणि व्यापारी मोठी खरेदी करताना दिसत नाहीत.

मात्र या महिन्यात रमजानसाठी हरभऱ्याला मागणी येऊ शकते. तर यंदा हरभरा लागवड कमी झाली.

त्यातच मागील काही दिवसांपासून मध्य प्रदेश, उत्तर प्रेदश, राजस्थान, गुजरात या भागातील हरभरा पिकाला थंडी, धुके आणि पावसाचा फटका बसत आहे.

पुढीक काळात पावसाची अंदाज व्यक्त केला जात आहे. या सर्व कारणांनी यंदा हरभरा उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.

त्यामुळं हरभरा दरात जास्त नरमाई येण्याची शक्यता कमीच आहे. पण यंदाही हरभरा बाजाराची भीस्त सरकाच्या खेरदीवरच राहील. सध्या नाफेडकडे साठाही भरपूर आहे.

त्यामुळं नाफेड यंदा किती हरभरा खरेदी करेल, यावर बाजाराची नजर असेल. नाफेडने चांगली खरेदी केल्यास हरभरा दर हमीभावाच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज कडधान्य बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com