Tur Rate : तुरीच्या दराला आणखी फोडणी मिळणार?

देशात मागील वर्षीच्या तुलनेत तुरीची लागवड कमी झाली. त्यातच सततच्या पावसानं कर्नाटक आणि महाराष्ट्रात पिकाला फटका बसला. त्यामुळं तुरीच्या दरात तेजी आली. आता तुरीच्या दराला पुन्हा फोडणी मिळण्याची शक्यता आहे.
Tur Rate
Tur RateAgrowon

व्यापाऱ्यांनी ठरवून पाडले केळीचे दर

1. राज्यात जळगाव जिल्ह्यानंतर नांदेड हे केळीचं मोठं आगार मानलं जातं. श्रावण महिना सुरु झाल्यानंतर केळीच्या दरात मोठी सुधारणा झाली होती. दोन हजार ते २ हजार ५०० रुपयानं केळीचे व्यवहार होत होते. मात्र मागील आठवड्यापासून केळीच्या दरात आचानक घसरण झाली. व्यापाऱ्यांनी ठरवून केळीचे दर पाडल्याचा आरोप होतोय. यासंबंधीची एक ऑडिओ क्लिप समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाली. त्यामुळं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. राज्यात सध्या केळीला १ हजार ते १ हजार ५०० रुपये दर मिळतोय. बाजारात मागणी असतानाही दर कमी झालेत. केळीला यापेक्षा अधिक दर मिळायला हवा, असं जाणकारांनी सांगितलं.

Tur Rate
Tomato : टोमॅटोवरील कीड-रोग नियंत्रण

टोमॅटोचे दर सुधारण्याची शक्यता

2. पावसामुळं टोमॅटो पिकाचं नुकसान होतंय. त्यामुळं बाजारातील टोमॅटो आवक कमी झाली. पण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या घाऊक दरात मोठी वाढ झालेली नाही. मात्र टोमॅटोच्या किरकोळ दरात किलोमागं ५ ते १० रुपयांची सुधारणा झालीये. राज्यात टोमॅटोचे किरकोळ विक्री दर किलोमागं ४० रुपयांपर्यंत आहेत. तर उत्तरेतील राज्यांमध्ये हाच दर ५० ते ६० रुपये आहे. असं असलं तरी शेतकऱ्यांना केवळ १० ते १८ रुपये दर मिळतोय. पुढील काळात टोमॅटोची बाजारातील आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं दर काहीसे सुधारतील, असं जाणकारांनी सांगितलं.

Tur Rate
Parbhani Shakti Jowar: ही ज्वारी आरोग्यासाठी उपयुक्त का आहे?

भविष्यात ज्वारी भाव खाणार

3. देशात सध्या ज्वारीचे दर काहीसे सुधारले. देशातील ज्वारी उत्पादन यंदा कमी राहीलं. मागील हंगामात देशात ४८ लाख टन ज्वारी उत्पादन झालं होतं. मात्र यंदा ते ४५ लाख टनांवरच स्थिरावलं. त्यातच कोरनानंतर देशात ज्वारीचा वापर वाढलाय. त्यामुळे मागणी वाढून ज्वारीच्या दरात सुधारणा पाहायला मिळतेय. देशात ज्वारीला सध्या सरासीर ३ हजार ४०० रुपये दर मिळतोय. राज्यातील ज्वारीचा दर २ हजार ८०० ते ३ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहे. त्यातच पावसामुळे खरिपातील ज्वारीचं नुकसान होतंय. त्यामुळं पुढील काळात ज्वारीच्या दरात सुधारणा होऊ शकते, असं जाणकारांनी सांगितलं.

Tur Rate
Tur Rate : तुरीच्या दराने गाठला आठ हजार रुपयांचा पल्ला

राज्यात कोबीचे दर स्थिरावण्याचा अंदाज

4. राज्यातील बाजारात कोबीची आवक काहीशी वाढली होती. मात्र मागील पाच दिवसांपासून पावसामुळं आवकेत काहीशी घट झाली. पण बाजारातील दर स्थिर होते. राज्यातील बाजारात कोबीला सरासरी २२०० रुपये दर मिळतोय. शुक्रवारी पुणे बाजार समितीत सरासरी २३३५ रुपयाने कोबीचे व्यवहार झाले. तर मुंबई बाजारातील दर २४०० रुपये होता. राज्यातील इतर शहरांमध्ये यापेक्षा दर काहीसे कमी होते. राज्यात पावसानं पिकांचं मोठं नुकसान होतंय. त्यामुळं पुढील काळातही बाजारातील कोबी आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे. परिणामी दरही याच पातळीवर राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

तुरीच्या दराला आणखी फोडणी मिळणार?

5. देशात तुरीच्या दरात (Tur Rate) आणखी सुधारणा होण्यासाठी परिस्थिती निर्माण होतेय. ५ ऑगस्टपर्यंत देशातील तूर लागवड (Tur Cultivation) गेल्या वर्षीच्या तुलनेत १०.४२ टक्क्यांनी कमी होती. मात्र आजच्या अहवालात तुरीची लागवड गेल्या वर्षीपेक्षा ११.६७ टक्क्यांनी घटलीये. म्हणजेच मागील आठवडाभरात तूर लागवड १.२४ टक्क्यांनी कमी झाली. तर आजपर्यंत गेल्यावर्षीपेक्षा ५ लाख ५५ हजार हेक्टरनं क्षेत्र घटलं. यात कर्नाटकातील तूर लागवड ८२ हजार हेक्टरनं कमी झाली.

कर्नाटक हे देशातील महत्वाचं तूर उत्पादक राज्य आहे. तर महाराष्ट्रीतही तुरीखालील क्षेत्र यंदा १ लाख ४० हजार हेक्टरनं कमी झालंय. तसंच तेलंगणातही १ लाख ३० हजार हेक्टरनं तूर लागवड कमी झालीय. एकीकडं तुरीच्या दरात तेजी असतानाही लागवड घटतेय. आधीच कमी लागवड आणि पावसानं होत असलेल्या नुकसानीमुळं तुरीच्या दरात तेजी आलीय. सध्या देशात तुरीला ७ हजार ८०० ते ८ हजार ४०० रुपयांचा दर मिळतोय. आज तूर लागवड आणखी कमी झाल्याचा अहवाल आलाय. त्यामुळे पुढील काळात तुरीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होतेय. देशात या महिन्याच्या शेवटी आफ्रिकेतून तूर आयात होईल. मात्र देशातील परिस्थिती पाहता ही तूर महाग विकली जाईल. तसंच बर्मा या देशातील निर्यातदारही तुरीचे दर वाढवतील. एकूणच काय तर भविष्यात तुरीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तुरीच्या दरात आणखी २०० ते ३०० रुपयांची सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com