Cotton Rate : कापूस बाजार स्थिरावला

देशातील बाजारात कापसाची आवक कमी झाली होती. मात्र उद्योगाकडून मागणी वाढल्यानं कापसाच्या दरात सुधारणा झाली. देशात मागील तीन दिवसांपासून कापसाचे दर वाढले आहेत. आजही कापूस दर काही प्रमाणात वाढले.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

सोयाबीनचे दर तेजीत

1. देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात गुरुवारपासून सुधारणा सुरु आहे. सोमवारीही सोयाबीनचे दर काही बाजारांमध्ये १०० रुपये प्रतिक्विंटलने सुधारले होते. सोयाबीनचा भाव आता अनेक बाजारांमध्ये ५ हजार ५०० रुपयांपर्यंत पोचला. तर सरासरी दर ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान मिळतोय. प्रक्रिया प्लांट्सनी खरेदी वाढविल्याने सोयाबीनच्या दरात सुधारणा झाल्याचं सांगितलं जातं. मात्र शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन विक्री केल्यास फयदेशीर ठरेल, असं जाणकारांनी सांगितलं.

t

Cotton Rate
Tur market : तूर बाजाराची स्थिती काय?

तुरीचे दर कायम

2. देशातील बाजारात सध्या तुरीच्या दरात १०० ते २०० रुपयांची तेजी मंदी सुरु आहे. मागील आठवड्यात प्रक्रिया प्लांट्सकडून मागणी कमी राहिल्याने दर काहीसे नरमले होते. पण तुरीचे दर क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी कमी झाल्यानंतर प्रक्रिया प्लाट्सकडून खरेदी वाढते. त्यामुळं तुरीच्या दरात पुन्हा सुधारणा होते. तुरीचे दर यंदा दबावात येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे तुरीला सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Cotton Rate
Soybean Rate : सोयाबीन उत्पादकांसाठी परिस्थिती अनुकूल

हरभरा दर दबावातच

3. देशात मागील हंगामापासून हरभरा दर दबावात आहेत. दिवाळीच्या काळातही हरभऱ्याला मागणी वाढून दरात सुधारणा झाली नाही. त्यामुळं सध्या गरजेप्रमाणं हरभरा खरेदी सुरु असल्याचं जाणकारांनी सांगितलं. मागील आठवडाभरात हरभरा दरात क्विंटलमागे १०० रुपयांची तेजीमंदी होती. सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार २०० ते ४ हजार ७०० रुपये दर मिळतोय. हरभरा दरात लगेच मोठी वाढ होण्याची शक्यता कमीच आहे, असा अंदाज प्रक्रियादारांनी व्यक्त केलाय.

वांग्याचे दर वाढले

4. राज्यातील बाजारात सध्या वांग्याला चांगला दर मिळतोय. मात्र बाजारातील वांगी आवक काहीशी घटलेली दिसते. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर बाजारांमध्ये आवक सरासरी १०० ते ३०० क्विंटलच्या दरम्यान आहे. तर इतर बाजारातील आवक ही सरासरी ४० क्विंटलपेक्षा कमी आहे. त्यामुळं सध्या वांग्याला प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये सरासरी दर मिळतोय. वांग्याचे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

कापूस बाजार स्थिरावला

5. कापूस बाजाराला (Cotton Rate) सध्या पेंड आणि खाद्यतेल दरात (Edible Oil Rate) सुधारणा झाल्याचा फायदा मिळतोय. कापसाच्या दरात (Cotton Rate) मागील तीन दिवसांमध्ये सुधारणा झाली. देशातील कापसाचा हंगाम (Cotton Season) १ ऑक्टोबरपासून सुरु झाला. मात्र देशातील आगाप लागवडीचा कापूस सप्टेंबर महिन्यापासून बाजारात विक्रीसाठी येतोय. पण दिवाळीपर्यंत कापसाचे दर (Cotton Rate) दबावात होते. हंगामाच्या प्रारंभी काही दिवस कापसाचे बाजारभाव प्रति क्विंटल ७ हजार ते १० हजार रूपयांच्या घरात होते. ते ७ हजार ५०० रूपयांपर्यंत कमी झाले होते. त्यामळं शेतकऱ्यांनी कापूस विक्री कमी केली.

दिवाळीनंतर बाजारातील कापूस आवक निचांकी पातळीवर पोचली होती. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढले. परिणामी देशातील कापूस बाजाराला आधार मिळाला.कापसाच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे जवळपास ३०० ते ४०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. आजही काही बाजारांमध्ये कापसाचे दर क्विंटलमागं १०० रुपयाने वाढले होते. तर अनेक बाजारांमधील दर स्थिर होते. आज अनेक बाजारांध्ये कापसाचा कमाल दर ८ हजार ५०० रुपयांवर पोचला होता. कापसाच्या दरातील वाढ पुढील काही दिवस टिकून राहिल, असा अंदाज काही जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील महिना-दोन महिन्यांमध्ये कापसाला सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com