Chana Sowing : हरभऱ्याचा पेरा खरंच वाढला का?

मागील वर्षभर हरभऱ्याला कमी दर मिळाला. मात्र गहू आणि मसूरने विक्रमी दराचा टप्पा गाठला होता. ऐन पेरणीच्या काळातही हरभऱ्याचे दर दबावात आहेत. त्यामुळे शेतकरी यंदाच्या रब्बीत हरभरा पेरणी कमी करून इतर पिकांना पसंती देतील, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र सरकारच्या आकडेवारीनुसार सध्या तरी हरभऱ्याची लागवड जास्त दिसत आहे.
Chana Sowing
Chana Sowing Agrowon

सोयाबीनचे दर सुधारण्याचा अंदाज

1. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात चढउतार सुरु आहेत. देशातही दरांची हीच स्थिती होती. मागील तीन दिवसांमध्ये सोयाबीनच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांपर्यंत नरमाई दिसून आली होती. आजही काही बाजारांमध्ये सोयाबीनचे दर क्विंटलमागे ५० रुपयांनी नरमले होते. आज देशातील बाजारांमध्ये दोन लाख टन सोयाबीनची आवक झाली होती. तर सरासरी दर ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. पुढील आठवड्यात सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा होऊन शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Chana Sowing
Cotton Market : बाजारात कापसाची आवक कमी

कापसाचे दर काहीसे नरमले

2. चीनची बाजारपेठ पुन्हा खुली होण्यास सुरुवात झाल्यानंतर कापसाला मागणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली. तसेच भारतातील कापसाचे दर एका भावपातळीवर भोवती फिरत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मागील आठवड्यात कापूस दरात सुधारणा पाहायला मिळाली. मात्र काल कापसाचे दर जवळपास पाच टक्क्यांनी तुटले होते. तर देशातील वायदेही दीड टक्क्याने कमी झाले होते. आजही देशात कापूस दर क्विंटलमागे १०० रुपयाने नरमले होते. मात्र पुढील काळात कापसाचे दर पुन्हा सुधारू शकतात. शेतकऱ्यांना यंदा सरासरी किमान ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करावी, असे आवाहन बाजारातील अभ्यासकांनी केले आहे.

Chana Sowing
Moong Rate : मूग आणखी भाव खाणार का?

मूग तेजीतच राहणार

3. केंद्राने ४ लाख टन मूग हमीभावाने खरेदीला मान्यता दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, छत्तीसगड, हरियाना, उत्तर प्रदेश, गुजरात आणि ओडिशात ही खरेदी होणार आहे. केंद्राने यंदा मुगासाठी ७ हजार ७५५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला. मात्र सध्या खुल्या बाजारात मुगाला ६ हजार ८०० ते ८ हजार रुपये दर मिळत आहे. आता सरकारी खरेदीमुळे मुगाच्या बाजाराला आधार मिळणार आहे. त्यामुळे मुगाचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Chana Sowing
Maize Sowing : खानदेशात मका लागवडीत वाढ

मक्याची आवक वाढली

4. मागील हंगामातील मक्याला चांगला दर मिळाला होता. सध्या देशातील बाजारात नव्या मक्याची आवक वाढत आहे. उष्ण वातावरणामुळे मक्यातील ओलावाही आता कमी येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही मक्याला सध्या बऱ्यापैकी दर मिळत आहे. भारतातून निर्यातीसाठीही मक्याला मागणी येत आहे. त्यामुळे ऐन आवकेच्या हंगामातही मक्याला सरासरी २ हजार ते २ हजार १०० रुपये दर मिळत आहे. हा दर पुढील काळातही टिकून राहू शकतो, असा जाणकारांचा अंदाज आहे.

हरभऱ्याचा पेरा खरंच वाढला का?

5. मागील हंगामात देशात हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन (Chana Production) झाले होते. परंतु सरकारने केवळ १७ टक्के मालाची खरेदी (Chana Procurement) केली. त्यामुळे खुल्या बाजारात हमीभावापेक्षा (Chama MSP) कमी दराने हरभरा विकायची वेळ शेतकऱ्यांवर आली. नंतरच्या काळात नाफेडनेही (NAFED) आपल्याकडील साठा टप्प्याटप्याने बाजारात आणला. त्यामुळे बाजारावर नाफेडच्या विक्रीचा दबाव कायम राहिला. ऐन दिवाळीतही हरभऱ्याचे दर वाढले नव्हते. शेतकऱ्यांना क्विंटलमागे सरासरी ८०० रुपये कमी दर मिळाला. सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार ३०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे.

त्यामुळे शेतकरी चालू रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी कमी करतील, असा अंदाज होता. चांगला दर मिळणाऱ्या गहू आणि मसूरची लागवड वाढेल, असं वाटत होतं. मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार रब्बी हंगामाच्या सुरूवातीच्या टप्प्यात हरभऱ्याचा पेरा गेल्या वर्षीपेक्षा साडेपाच टक्क्यांनी जास्त झालेला दिसतो. गेल्या वर्षी २ डिसेंबरपर्यंत ७६ लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा होता. मात्र यंदा याच कालावधीत हरभरा पेरा ८० लाख हेक्टरवर पोहोचला आहे. वास्तविक यंदा गहू आणि मोहरीच्या लागवडीत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. त्याचा परिणाम म्हणून कडधान्य पिकांखालचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामाच्या सुरूवातीच्या काळातली आकडेवारी आता हाताशी आली आहे. येत्या एक-दोन आठवड्यात रब्बीचा कल पूर्णपणे स्पष्ट होईल. त्यावेळीच हरभऱ्याची नेमकी स्थिती काय राहील, याचा अंदाज येईल, असे जाणकारांनी सांगितले. काही तज्ज्ञांनी सरकारच्या पेरणीच्या आकडेवारीवर संशय घेतला आहे. सरकारला कडधान्यांचे उत्पादन कमी होणार असल्याचे सांगून भाववाढीला हातभार लावायचा नाही, त्यामुळे मुद्दामहून कडधान्य पेरणीचे आकडे फुगवून सांगितले जात आहेत, असा आरोप त्यांनी केलाय. सरकार कदाचित पुढच्या टप्प्यात सुधारित आकडेवारी जाहीर करेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com