Maize Rate : जागतिक मका उत्पादनात घट होणार

आंतरराष्ट्रीय बाजार ऑगस्टच्या शेवटी मका दरात नरमाई आली होती. देशातही मक्याचे दर क्विंटलमागं २०० रुपयांपर्यंत नरमले होते. सध्या देशात मक्याला प्रतिक्विंटल २ हजार ४०० रुपये ते २ हजार ६०० रुपये सरासरी दर मिळतोय.
Maize Rate
Maize RateAgrowon

कापूस लागवड ९ टक्क्यांनी वाढली

देशातील बाजारात कापसाचे दर टिकून आहेत. कालपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशातील कापूस लागवड जवळपास ९ टक्क्यांनी वाढलीय. तर राज्यातील कापसाचं क्षेत्र ३ टक्क्यांनी अधिक आहे. राज्यात ४२ लाख २७ हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. गुजरातमध्ये २५ लाख तर तेलंगणात २० लाख हेक्टरवर कापूस पीक आहे. देशातील कापूस लागवड वाढली तरी उत्पादनात फार मोठी वाढ होण्याची शक्यता नाही. तसेच सध्या कापूस कमी उपलब्ध आहे. त्यामुळे कापसाला प्रति क्विंटल ९ हजार ते १० हजार रुपयांचा दर मिळतोय. आवकेचा दबाव वाढेपर्यंत हा दर टिकून राहील, असा अंदाज कापूस उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

Maize Rate
Rice export ban: मोदी सरकारने तांदळाची निर्यात बंद का केली?

तांदळाचे दर टिकून राहणार

देशात सध्या तांदळाचे दर तेजीत आहेत. खरिपात भात हे महत्वाचं पीक आहे. मात्र यंदा महत्वाच्या तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये कमी पाऊस झालाय. त्यामुळे कालपर्यंत देशातील भात लागवड तब्बल १९ टक्यांनी घटलीय. देशात आतापर्यंत ३९९ लाख हेक्टरवर भाताची लागवड झाली. उत्तर प्रदेशातील लागवड तीन टक्क्यांनी घटली आहे. तर पश्चिम बंगालमधील लागवड ४ टक्के, छत्तीसगडमध्ये २ टक्के लागवड घटलीय. पंजाब तसेच हरियाणातही लागवड काहीशी घटली आहे. लागवड घटल्यानं सरकारनं तुकडा तांदळाची निर्यात बंद केली, तर बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर शुल्क लावलंय. मात्र तरीही तांदळाला ३ हजार ४०० रुपये ते ३ हजार ८०० रुपये दर मिळतोय. हा दर टिकून राहू शकतो, असा अंदाज तांदूळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

Maize Rate
Tomato, Onion Prices: पाकिस्तानमध्ये टोमॅटो ५००, कांदा ४०० रुपये किलो

टोमॅटोला दराची लाली

बाजारात सध्या टोमॅटोला चांगला दर मिळतोय. पावसामुळं टोमॅटोची आवक काहीशी कमी झाली आहे. मात्र मागणी कायम आहे. त्यामुळं दराला आधार मिळतोय. राज्यातील महत्वाच्या बाजार समित्या सोडल्या तर आवक नगण्य अशीच होत आहे. त्यातच पाऊस आणि कीड-रोगानंही टोमॅटोचं नकुसान वाढलंय. सध्या टोमॅटोला २ हजार ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. टोमॅटोची आवक लगेच वाढेल, असं वाटत नाही. त्यामुळं हा दर दिवाळीपर्यंत टिकून राहू शकतो, असा अंदाज टोमॅटो व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

फ्लाॅवरची आवक कमीच

राज्याच्या बाजारात फ्लाॅवरची आवक कमी दिसतेय. त्यामुळं दर वाढलेले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या बाजार समित्यांमधील फ्लाॅवरची आवक ही ५०० क्विंटलपेक्षा अधिक आहे. मात्र इतर बाजार समित्यांमधील आवक सरासरी ३० क्विंटलच्या दरम्यान असते. त्यामुळं फ्लाॅवरला सरासरी १४०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. बाजारातील प्लाॅवरची आवक वाढेपर्यंत हा दर टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

कोणत्या देशात मका उत्पादन कमी होईल?

आंतरराष्ट्रीय बाजार ऑगस्टच्या शेवटी मका दरात (Maize Rate) नरमाई आली होती. देशातही मक्याचे दर क्विंटलमागं २०० रुपयांपर्यंत नरमले होते. सध्या देशात मक्याला (Domestic Maize Rate) प्रतिक्विंटल २ हजार ४०० रुपये ते २ हजार ६०० रुपये सरासरी दर मिळतोय. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातही मका दरवाढीने आठवड्याचा शेवट झाला. मात्र अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं (USDA) यंदा जागतिक मका उत्पादन (Global Maize Production) कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय. त्याचा परिणाम आठवडाभर बाजारावर दिसला. युएसडीएच्या सप्टेंबरच्या अहवालानुसार जागतिक मका उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा तब्बल ४७ दशलक्ष टनांनी कमी राहील. मागील हंगामात १२१९ दशलक्ष टन मका उत्पादन झालं होतं. ते यंदा ११७२ दशलक्ष टनांवर स्थिरावण्याचा अंदाज आहे.

अमेरिकेतील मका पिकाला यंदा दुष्काळाचा फटका बसतोय. त्यामुळं यंदा अमेरिकेतील मका उत्पादन ३० दशलक्ष टनांनी कमी होऊन ३५४ दशलक्ष टनांवर स्थिरावेल. तसचं इथेनाॅलसाठी आणि पशुखाद्यासाठीचा मका वापर कमी होईल, असं युएसडीएनं म्हटलंय. तर युरोपियन युनियनमध्येही मका उत्पादनात १२ दशलक्ष टनांची घट येईल, असा अंदाज आहे. युएसडीएच्या अहवालानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात मका दरात दीड टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली होती. शुक्रवारी मक्याचा दर ६.७९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होता. भारतात खरिपातील मका लागवड २ टक्क्यांनी वाढली. मात्र पिकाला पावसाचा फटका बसतोय. त्यामुळं देशातील उत्पादनही कमी राहण्याचा अंदाज आहे. परिणामी मका दर टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com