Tur Market : नव्या तुरीची आवक वाढली का?

देशातील बाजारात सध्या नव्या तुरीची आवक वाढत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही बाजारांमध्ये आवक वाढली. मात्र या तुरीला चांगला उठाव मिळत आहे.
Tur Market
Tur MarketAgrowon

देशातील बाजारात सध्या नव्या तुरीची आवक (Tur Arrival) वाढत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही बाजारांमध्ये आवक वाढली.

मात्र या तुरीला चांगला उठाव मिळत आहे. तसेच पुढील काळात आफ्रिकेतील देशांमधून आयात (Tur Import) कमी होण्याची शक्यता आहे.

मग या परिस्थितीत तुरीला काय दर मिळतील? सध्या नवी तूर काय (Tur Rate) दरानं विकली जातेय? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

Tur Market
Tur Market : शेतकरी तुरीची आवक मर्यादीत ठेवणार का ?

1. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर तेजीत आहेत. सीबाॅटवर सोयाबीनच्या दराने १५.२२ डाॅलर प्रतिबुशेल्साचा टप्पा गाठला होता.

तर सोयापेंडच्या दरही ४८४ डाॅलर प्रतिटनावर पोचले होते. मात्र देशातील सोयाबीन दर स्थिर होते. देशात आजही सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर टिकून राहिल्यास देशातील सोयाबीन बाजारालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Tur Market
Tur Arrival : नव्या तुरीची आवक सुरू

2. कापूस दरात चढ उतार कायम

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात मोठे चढ-उतार सुरु आहेत. काल कापूस दराने ८४.९६ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठल्यानंतर वायदे ८२.४५ सेंटवर बंद झाले होते.

तर आज दुपारी २ वाजेपर्यंत वायदे ८२.६८ सेंटवर पोचले. आंतरराष्ट्रीय बाजारात मोठे चढ-उतार होत असल्याचा परिणाम देशातील कापूस दरावरही जाणवतोय.

आज देशातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ९ हजार रुपये क्विंटल दर मिळाला. कापसाच्या दरात पुढील काही दिवस चढ-उतार कायम राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.  

Tur Market
Tur Market: बाजारात तुरीची आवक घटल्याने दरात सुधारणा | ॲग्रोवन

3. कारल्याचे दर वाढले

राज्यातील बाजारात सध्या कारल्याची खूपच कमी आवक होत आहे. मोठ्या बाजार समित्या वगळता कारल्याची सरासरी २० क्विंटलपेक्षाही कमी आवक सुरु आहे.

मात्र कारल्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे कारल्याचे दर टिकून आहेत. सध्या कारल्याला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार ५०० रुपये दर मिळतोय.

हा दर टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला. 

4. कोबीचे दर दबावात

कोबीचे दर सध्या दबावात आहेत. कोबीची बाजारातील आवकही कमी दिसत आहे. मात्र उठाव काहीसा कमी असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. सध्या बाजारातील कोबीची सरासरी आवक ३० क्विंटलपेक्षा कमी दिसते. तर पुणे, मुंबई आणि नागपूर यासारख्या मोठ्या बाजारातील आवक २०० क्विंटलच्या दरम्यान आहे. सध्या कोबीला सरासरी ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला. 

5. देशातील बाजारात सध्या नव्या तुरीची आवक वाढत आहे. मात्र आवकेचा गती सध्या कमी आहे. बाजारात आलेल्या तुरीचा हातोहात निपटारा होत असल्यानं दरही टिकून आहेत. सध्या कर्नाटकातील काही बाजारांमध्ये आवकेचा दबाव वाढला. तर महाराष्ट्रातील सोलापूर, जालना, अकोला, अमरावती या मोठ्या बाजारांमध्ये आवक वाढतान दिसत आहे. मागील हंगामातील तूर आता कमी शिल्लक आहे. तसेच स्टाॅकिस्ट नफावसुलीच्या मानसिकतेत दिसत आहेत. त्यामुळं बाजारातील आवक मर्यादीत आहे. मध्य प्रदेशातील दाल मिल्सना तुरीची टंचाई भासत आहे. त्यामुळं येथील दाल मिल्सनी आता कर्नाटक आणि महाराष्ट्रात तुरीची खरेदी सुरु केली. त्यामुळे या दोन्ही राज्यांतील बाजारात तूर चांगलाच भाव खात आहे. देशातील तुरीचे दर तेजीत असल्याने निर्यातदार देशांनीही दरात काहीशी वाढ केली. सध्या आफ्रिकेतील मालावी, मोझांबिक, टंझानिया या देशांमध्ये तुरीचा साठा खूपच कमी आहे. आता म्यानमार देशातून तूर आयात होऊ शकते. परंतु त्याचंही प्रमाण जास्त नसेल. त्यातच यंदा देशातील तूर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं यंदा गेल्या वर्षीऐवढी आयात झाली तरी पुरवठा जास्त वाढणार नाही. मागणी आणि पुरवठ्यात यंदा तफावत राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं तुरीचे दर तेजीत राहतील. सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. हा दर यंदाच्या हंगामात कायम राहू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला. 

Tur Market
Tur Market: बाजारात तुरीची आवक घटल्याने दरात सुधारणा | ॲग्रोवन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com