top 5 news -युक्रेन मका, गहू उत्पादनाचं उद्दिष्ट गाठणार?

युक्रेनमधील वसंत ऋतुतील पेरणी अंतिम टप्प्यात आहे. येथील ३० शेती रशियन सैन्याच्या ताब्यातील क्षेत्रात आहे. तरीही युक्रेनमधील मका आणि गहू उत्पादन यंदा सरकारी उद्दिष्ट गाठण्याची शक्यता आहे. येथील उत्पादनाबाबत जाणकारांनी काय अंदाज व्यक्त केला?
wheat
wheat agrowon

1. जगातील एकूण आंबा उत्पादनाच्या निम्मे उत्पादन भारतात होते. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, गुजरात,महाराष्ट्र आदी राज्यांत आंब्याचं उत्पादन मिळतं. मात्र यंदा वाढलेल्या उष्णतेचा राज्यातील आंबा(mango) पिकाला मोठा फटका बसला. तर उत्तर प्रदेशातही प्रतिकूल हवामानामुळं दशेरी आणि इतर आंबा उत्पादनात ७० टक्क्यांची घट झालीये. उत्तर प्रदेशात दरवर्षी सरासरी ३५ ते ४५ लाख टन आंब्याचं उत्पादन होतं. मात्र यंदा उत्पादन १० ते १२ लाख टनांवर सीमित झालये. त्यामुळं बाजारात आंबा चढ्या दरानं विकला जातोय. उत्पादन घटल्यानं शेतकऱ्यांना आणि दरवाढीनं ग्राहकांना फटका बसतोय.

2. तेलंगणा सरकार ५० हजार एकरवर एकच वेचणी होणाऱ्या कापसाची लागवड करणारे. कापसाचं हे वाण एकाच उंचीत वाढतं. त्यामुळं यंत्रानं वेचणी करता येती. सध्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या टप्प्यांत तीन ते चार वेळा कापूस (cotton)वेचावा लागतो. परंतू या वाणामुळे एकाच टप्प्यात वेचणी शक्य होईल. यातून कापूस वेचणीसाठी मजुरांची समस्या दूर होईल. या पध्दतीत उत्पादकता ४० टक्क्यांनी वाढेल. तसेच एकाच वेचणीमुळे शेत लवकर रिकामं होईल. त्यामुळे तिथं कमी कालावधीचं दुसरं एखादं पीक घेता येईल. या पध्दतीत झाडांची संख्या जास्त असते. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या क्षेत्रात या पद्धतीने कापूस लागवड होणार आहे. याचे चांगले परिणाम दिसून आल्यास मोठा दिलासा मिळेल, असं जाणकारांनी सांगितलं.

3. अतिरिक्त साखर साठा कमी होण्यासाठी निर्यात हाच प्रभावी पर्याय ठरला. सध्या साखर निर्यातदार व काही घटकांकडून पुढील वर्षाच्या साखर(sugar) उत्पादनाचा अंदाज घेणं सुरुये. विदर्भ, मराठवाड्यासारख्या भागातही गेल्या वर्षीपेक्षा जास्त लागवडी झाल्या. या अंदाजामुळे २०२२-२३ मध्ये भारताचं साखर उत्पादन ३७० लाख टन तर महाराष्ट्रात १४० ते १५० लाख टन होईल, अशी शक्यताये. परिणामी अतिरिक्त साखर उत्पादनाची समस्या भेडसावू शकते. कारखान्यांनी यंदाप्रमाणं साखर निर्यात केल्यास दिलासा मिळेल. त्यामुळं पुढील हंगामात सरकारनं निर्यातीवर निर्बंध आणू नये, अशी अपेक्षा साखर उद्योगातून व्यक्त होतेय.

4. उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळं मुदतीपूर्वीच थांबलेली हरभरा खरेदी पुन्हा सुरू होणारे. केंद्र सरकारने राज्याला ८७ हजार ४६० टन खरेदीचं उद्दिष्ट वाढून दिलं. आता राज्यात १८ जूनपर्यंत खरेदी प्रक्रिया राबवली जाणारे. राज्यात नाफेडनं(Nafed) ६ लाख टनांची खरेदी केली. तर एफसीआयची खरेदी ५० हजार टनांच्या दरम्यान असल्याचं जाणकरांनी सांगितलं. यापुर्वी केंद्रानं राज्याला ६ लाख ८९ हजार टन हरभरा खरेदीचं उद्दिष्ट दिलं होतं. आता त्यात पुन्हा ८७ हजार टनांची भर पडली. सध्या खुल्या बाजारात हमीभावापेक्षा ६०० ते ८०० रुपयाने कमी दर आहेत. या परिस्थितीत खरेदीला मुदत आणि उद्दिष्ट वाढवून मिळाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाणारे.

wheat
नॅनो युरियाने कृषी उत्पादन,शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ

5. रशियानं युक्रेनवर २४ फेब्रुवारीला आक्रमण केलं. यामुळं येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. वसंत ऋतीतील पेरणी करण्यात अनेक अडचणी होत्या. याही परिस्थितीत येथील शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या. युक्रेनमधील जवळपास ३० टक्के शेती रशियायन सैन्याच्या ताब्यात असलेल्या भागांतये. तरीही युक्रेनमधील शेतकऱ्यांनी मक्याची पेरणी गेल्यावर्षीच्या तुलनेत ७८ टक्के उरकली. व्यापारी संस्थांनी युक्रेनमधील मका(Maize) उत्पादन २२० ते २८० लाख टनांदरम्यान राहील, असा अंदाज व्यक्त केलाय. तर अॅग्रीसेंसस या संस्थेने २५२ लाख टन आणि युक्रेन येथील एका संस्थेने २५७ लाख टनांचा अंदाज व्यक्त केलाय. तर येथील गहू उत्पादनाचे अंदाज १७० ते २०५ लाख टनांदरम्यान व्यक्त होतायेत. मका आणि गहू गहू उत्पादनाचे अंदाज हे रशियन सैन्याच्या ताब्यातील क्षेत्राला वगळून देण्यात आले. काही संस्थांच्या मते युक्रेनमध्ये यंदाही २०२०-२१ मधील उत्पादनाऐवढा गहू मिळेल. या हंगामात इथं २५३ लाख टनांच्या दरम्यान उत्पादन झालं होतं. तर मागील हंगामात ३२० लाख टनांपर्यंत उत्पादन वाढलं होतं. सध्या गहू आणि मक्याचा पेरा चांगला झाला असला तरी येथील शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा(Fertilizer shortage) जाणवतोय. तसंच अनेक भागांत इंधनही मिळत नाहीये. याचा पिकांवर परिणाम झाला तर अंदाजाचा किमान आकडा उत्पादन गाठेल. म्हणजेच मका २२० लाख टन तर गहू १७० लाख टन मिळेल. परंतु सर्व परिस्थिती चांगली राहिली तर कमाल म्हणजेच मका २८० लाख टन आणि गहू २०५ लाख टन मिळेल, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com