Maize : मका दर आणखी किती वाढतील ?

देशात सध्या मक्याचा दर तेजीत आहे. त्यामुळं लागवडही काही प्रमाणात वाढली. मात्र मका पिकावर काही राज्यांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढतोय. तर पावसानंही नुकसान होतंय. त्यामुळं उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Maize Rate
Maize RateAgrowon

यंदा तांदूळही भाव खाण्याची शक्यता

1. सरकारची गहू खरेदी यंदा जवळपास ५७ टक्क्यांनी कमी झाली. त्यामुळं बाजारात गव्हाचे दर तेजीत आहेत. गहू कमी उपलब्ध असल्यानं रेशनसह कल्याणकारी योजनांसाठी सरकारला तांदळाचा पुरवठा वाढवावा लागला. हा अनुभव लक्षात घेता केंद्र सरकारने खरिपातील तांदूळ खरेदीसाठी कंबर कसली. खरिपातील भात उत्पादक राज्यांमध्ये खरेदी कशी वाढवता येईल, यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी चर्चा करणार आहे. म्हणजेच यंदा केंद्र सरकार हमीभावानं भात खरेदी वाढवेल. यामुळे बाजारात भाताला गव्हाप्रमाणं चांगला दर मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

गाईच्या दुधाला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर

2. देशातील काही दूध संघांनी दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांपर्यंत वाढ केली. या दरवाढीमुळं ग्राहकांच्या खिशावर ताण पडला. मात्र या दरवाढीमुळं अनेक दूध संघांचा तोटा कमी होण्यावर मदत होईल, असा दावा क्रिसील या संस्थेनं म्हटलंय. तर अमूल आणि मदर डेअरीसारख्या मोठ्या संघांचा नफा केवळ अर्ध्या टक्क्याने वाढेल असाही दावा केला. मात्र दूध संघांनी खरेदीदरात वाढ केलेली नाही. दूध खरेदीदर कमीच आहे. गाईच्या दुधाला तर प्रतिलिटर २० रुपयांपासून दर मिळतोय. या दरात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळत नाही. गाईच्या दुधाला किमान ४० रुपये दर मिळावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. मात्र दूध संघ लेगच हा दर देतील असं वाटत नाही, असं जाणकारांनी सांगितलं.

Maize Rate
Onion : कांदादर समस्या, सरकारचेच पाप

कांदा दराला हवा निर्यातवाढीचा आधार

3. बाजारात सध्या कांद्याची आवक बऱ्यापैकी असल्याने कांदा दर दबावात आहेत. यंदा उन्हाळ कांद्याचं उष्णतेमुळं मोठं नकुसान झालं. मात्र उन्हाळ कांद्यालाही बाजारात कमी दर मिळतोय. त्यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. गेल्या पाच महिन्यांपासून कांद्याचे सरासरी दर ८०० ते १२०० रुपयांच्या दरम्यान आहेत. कांद्याचा सध्या जास्त पुरवठा असल्यानं दर कमी आहेत. त्यामुळं केंद्रानं जास्तीत जास्त कांदा निर्यातीसाठी धोरण आखावं, अशी मागणी केली जातेय. तर बाजारात आवकेचा दबाव असेपर्यंत दर दबावात असतील. मात्र आवक कमी झाल्यानंतर कांद्याचा दर वाढेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Maize Rate
Maize : मका तेजीत राहणार

कमी आवकेमुळं गवार खातेय भाव

4. सततच्या पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळं चांगल्या भाज्यांना बाजारात दरसुद्धा मिळत आहे. प्रामुख्याने गवारला बाजारात सातत्याने चांगला दर मिळतोय. बाजारात सध्या गवारची आवक कमी होतेय. त्यामुळं दरही तेजीत आहेत. बाजारात किमान ५००० हजार ते ७००० हजारांपर्यंत गवारची विक्री होतेय. तर किरकोळ बाजारात गवार ८० ते १२० रुपयांदरम्यान प्रतिकिलोने केली जात आहे. पुढील काळात गवारला आणखी मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं गवारच्या दरातही सुधारणा होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

मका दर आणखी किती वाढतील ?

5. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात तसंच देशातही मका दर (Maize Rate) तेजीत आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा (Maize Supply) कमी असल्यानं मका दर तेजीत आहेत, असं जाणकारांनी सांगितलं. मक्याला चांगला दर मिळत असल्यानं खरिपातील मका लागवडही (Maize Cultivation) काही प्रमाणात वाढली. यंदा कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, हमाचल प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये मका लागवड वाढली. मात्र मका पिकाला पाऊस आणि लष्करी अळीचा फटका बसतोय. सध्या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आहवाल आहेत. लष्करी अळीनं मका, बेबी काॅर्न, मधु मका आणि मक्याच्या धांडांवरही आक्रमण सुरु केलंय.

सध्या नुकसानीची पातळी तुलनेत कमी आहे. मात्र लष्करी अळीचं वेळीच नियंत्रण केलं नाही तर नुकसानीचं प्रमाण वाढू शकतं. सध्या अळीला आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना फवारण्या कराव्या लागत आहेत. यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढतोय. तर उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होतेय. देशात दरवर्षी ३०० लाख टनांच्या दरम्यान मक्याचा वापर होतो. तर निर्यातीसाठीही मोठी मागणी असते. मात्र बाजारात मका कमी उपलब्ध असल्यानं देशात सध्या मक्याला २ हजार ४०० ते २ हजार ८०० रुपये दर मिळतोय. तर आंतरराष्ट्रीय बाजारात ६.७८ डाॅलर प्रतिबुशेल्सने मक्याचे व्यवहार झाले. देशात तर मक्याचा पुरवठा कमी आहेच, शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही कमी मका उपलब्ध आहे. त्यामुळं मक्याचे दर टिकून राहतील. तर देशात मक्याचे दर दिवाळीपर्यंत सुधारतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com