Soybean Rate : यंदा किती सोयाबीन उत्पादन होणार?

देशात यंदा सोयाबीन लागवड काहीशी कमी झाली. मात्र पिकाची स्थिती चांगली असून उत्पादनही चांगले येईल, असा अंदाज उद्योगांतून व्यक्त होत आहे. मात्र सोयाबीन पिकाला पाऊस आणि कीड-रोगांचा फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. केंद्र सरकारनेही आपल्या अंदाजात यंदा सोयाबीन उत्पादन कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला.
soybean rate
soybean rate agrowon

कापसाचं उत्पादन कमीच राहणार

1. बाजारात सध्या कापसाची आवक वाढतेय. यंदा कापसाची लागवड जवळपास साडेसात टक्क्यांनी वाढली. आत्तापर्यंत १२७ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झालीये. त्यातच पीक चांगलं असल्याचं सांगत काॅटन असोसिएशन ऑफ इंडियानं यंदा कापूस उत्पादन ३७० लाख गाठींवर पोचेल, असं म्हटलंय. एक गाठ १७० किलो रुईची असते. मात्र सरकारनं यंदा ३४१ लाख गाठींचा अंदाज व्यक्त केलाय. पाऊस आणि कीड-रोगानं कापसाचं नुकसान होत असल्याचं यातून स्पष्ट होतंय. त्यामुळं शेतकऱ्यांनी यंदा कापसाला ९ हजार रुपयांचा दर लक्षात ठेऊन टप्प्याटप्पायनं विक्री करावी, असं आवाहन शेतमाल बाजार अभ्यासकांनी केलंय.

soybean rate
Tur cultivation: अर्धरब्बी तूर लागवडीचे तंत्र जाणून घ्या

तुरीच्या दराला आधार मिळणार

2. देशात सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. तुरीला सध्या बाजारांमध्ये ७ हजार ते ७ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. यंदा देशातील तुरीची लागवड जवळपास ५ टक्क्यांनी घटलीये. केंद्र सरकारनेही यंदा तुरीचं उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा साडेचार लाख टनांनी कमी राहीलं, असा अंदाज जाहीर केलाय. सरकारच्या मते यंदा देशातील तुरीचं उत्पादन जवळपास ३९ लाख टनांवर स्थिरावेल. त्यामुळं तुरीच्या दराला आणखी आधार मिळू शकतो. यंदा तुरीला ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

कांदा दर दबावातच

3. कांदा दर अद्यापही दाबावात आहेत. मागील तीन महिन्यांपासून कांदा आवक अधिक असल्यानं दर उत्पादनखर्चापेक्षाही कमी आहेत. सप्टेंबर महिन्यापासून सणांची मागणी वाढून दर सुधारण्याचा अंदाज होता. मात्र साठवणीतील कांदा खराब होण्याचं प्रमाण वाढल्यानं शेतकऱ्यांनी विक्री सुरु केली. परिणामी बाजारात अद्यापही आवक अधिक असून दरही अपेक्षेप्रमाणं वाढले नाहीत. सध्या बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल ८०० ते १३०० रुपयांचा दर मिळतोय. आवक मर्यादीत झाल्यानंतरच कांदा दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कांदा व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

soybean rate
Soybean : सोयाबीनच्या ३५ एकर पिकाला शेंगाच नाहीत

मेथी तेजीतच राहणार

4. सध्या मेथीच्या भाजीला चांगला दर मिळतोय. बाजारातील आवक नगण्य होत असल्यानं दरात तेजी आली आहे. ऑगस्ट महिन्यातील लागवडी काढणीला आल्या नाहीत. तसंच पाऊस आणि ढगाळ वातावरणानं भाजी आवकेवर परिणाम होत आहे. त्यामुळं बाजारातील आवक घटली. पुणे, नागपूर आणि मुंबई बाजारात ५० ते २०० क्विटंलच्या दरम्यान आवक होत आहे. तर इतर बाजारांतील आवक १० क्विंटलच्या दरम्यान होतेय. मेथीला ९ हजार ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. मेथीचा दर पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

यंदा किती सोयाबीन उत्पादन होणार?

5. देशातील सोयाबीन लागवड (Soybean Cultivation) यंदा ८ हजार हेक्टरनं कमी झाली. आत्तापर्यंत १२० लाख ७० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा (Soybean Sowing) झालाय. हंगामाच्या सुरुवातीला केंद्र सरकारनं यंदा देशात १४७ लाख टन सोयाबीन उत्पादनाचं (Soybean Production) उद्दिष्ट ठेवलं होतं. तर सरकारच्या मागील वर्षाच्या चौथ्या अंदाजानुसार जवळपास १३० लाख टन सोयाबीन उत्पादन झालं. आता सरकारनं २०२२-२३ च्या हंगामातील म्हणजेच चालू हंगामातील खरिप उत्पादनाचा (Khari Soybean Production) पहिला अंदाज जाहीर केलाय. पहिल्या अंदाजात सरकारनं यंदा देशात १२९ लाख टन सोयाबीन उत्पादन होईल, असं म्हटलंय. म्हणजेच सुरुवातीलाच सरकारनं गेल्यावर्षीपेक्षा सोयाबीन उत्पादन एक लाख टनानं कमी राहीलं, असं म्हटलंय.

यंदा सोयाबीन लागवड वाढीचा अंदाज होता. मात्र अनेक भागांत उशीरा पेरणीयोग्य पाऊस झाला. तसचं अनेक भागांत पावसाचा खंड पडला. त्यामुळं पेरा कमी झालाय. ऑगस्ट आणि जुलै महिन्यात बऱ्याच भागात सतत काही दिवसा पाऊस झाले. त्यामुळं पिकाला फटकाही बसलाय. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये पिकाचं नुकसान झाल्याचे अहवाल आहेत. त्यामुळं सरकारचा हा अंदाज नंतर कमी होऊ शकतो, असं जाणकारांनी सांगितलं. सध्या सोयाबीनला ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. हंगामात शेतकऱ्यांनी किमान ५ हजार रुपयांची दरपातळी लक्षात ठेऊन विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com