Maize Market Rate : मक्याचा बाजार कसा राहील ?

देशातील खरिप मका पिकाला यंदा पावसाचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे यंदा खरिपातील मका उत्पादन घटून गुणवत्ताही कमी झाल्याचे जाणकारांनी सांगितले. तसेच सध्या बाजारातील मका आवकही मर्यादीत आहे.
Maize Rate
Maize RateAgrowon

सोयाबीन दर टिकून

1. देशात आजही सोयाबीनचे दर सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान टिकून होते. आंतरराष्ट्रीय बाजारात काहीशी सुधारणा दिसत आहे. मात्र त्याचा प्रत्यय देशातील बाजारात आज दिसला नाही. दुसरीकडे जगातील आघाडीच्या सोयाबीन उत्पादक ब्राझीलमध्ये ९१ टक्के सोयाबीन लागवड पूर्ण झाली. मात्र ब्राझीलमधील काही भागांमध्ये सध्या उष्ण आणि कोरडे हवामान आहे. त्यामुळे येथील सोयाबीन पिकाची भीस्त डिसेंबरमधील पावसावर आहे. डिसेंबरमध्ये पावसाने खंड दिल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे पडसाद उमटू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

Maize Rate
Soybean Rate : सोयाबीन बाजारात काय घडलं?

कापसाचे दर स्थिर

2. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात आज एक टक्क्यांची सुधारणा पाहायला मिळाली. आज कापसाचे वायदे ८४.९४ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. मात्र देशातील कापूस दर आजही अनेक बाजारात स्थिर होते. आज कापसाला सरासरी ८ हजार ४०० ते ८ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. सध्या देशातील कापूस दर आंतरराष्ट्रीय दरापेक्षा जास्त आहेत. पण सध्या चीन, भारत, पाकिस्तान आणि टर्की आंतरराष्ट्रीय बाजारातून कापूस खरेदी करत आहेत. त्यामुळे कापसाचे दर सुधारत आहेत. परिणामी देशातील कापूस दर पुढील काही दिवसांत सरासरी ९ हजार रुपयांपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

Maize Rate
Cotton Cultivation : पेच कापूस लागवडीचा

टोमॅटो दरात घसरण

3. राज्यातील बाजारात सध्या टोमॅटोचे दर घसरले आहेत. नोव्हेंबरच्या सुरुवातीला टोमॅटोला सरासरी १ हजार ४०० ते १ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळत होते. मात्र मागील काही दिवसांमध्ये बाजारातील टोमॅटो आवक वाढली. त्यामुळे महत्वाच्या बाजारांमध्ये टोमॅटोचे दर कमी होण्यास सुरुवात झाली. सध्या टोमॅटोचे दर जवळपास निम्म्यावर आले आहेत. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल ४५० ते ९०० रुपये दर मिळत आहे. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज टोमॅटो व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Maize Rate
Millet Processing : भरडधान्यांचे प्रक्रियामूल्य वाढवा...

बाजरीचे दर तेजीत

4. मागील हंगामात देशातील बाजरी उत्पादन जवळपास १ लाख टनाने कमी होऊन ९ लाख ६७ हजार टनांवर स्थिरावले होते. यंदाही महत्वाच्या बाजरी उत्पादक राज्यांमध्ये पावसाचा पिकाला तडाखा बसला होता. त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. सरकारने यंदा ९ लाख ७५ हजार टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र उत्पादन यापेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यातच सध्या बाजारातील आवकही कमी आहे. त्यामुळे बाजरीच्या दरात सुधारणा झाली. सध्या बाजरीला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. बाजारीच्या दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

मक्याचा बाजार कसा राहील ?

5. देशात यंदा खरिपात २३१ लाख टन मका उत्पादन (Maize Production) होईल, असा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला होता. मात्र देशात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस झाले. तसेच नोव्हेंबर महिन्यातही बहुतेक भागांमध्ये सतत पाऊस झाला. याचा फटका मका पिकाला (Maize Crop Damage) बसला. तसेच मक्यावर काही भागांमध्ये कीड-रोगांचाही (Maize Pest) प्रादुर्भाव आढळून आला होता. त्यामुळे मका उत्पादन कमी तर झालेच शिवाय मक्याच्या गुणवत्तेवरही परिणाम झाल्याचं शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे खरिपात राज्यातील मका उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमी राहल्याचं सांगितलं जातं.

तर कर्नाटकातील उत्पादन गेल्यावर्षीऐवढे होईल, असा अंदाज मका प्रक्रिया उद्योगाने व्यक्त केला आहे. तर रशिया आणि युक्रेनमधून आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या मक्याचा पुरवठा कमी होत असल्याने देशातून निर्यात चांगली सुरु आहे. याचा आधार देशातील मका बाजाराला मिळत आहे. देशातील बाजारात सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २ हजार २०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मात्र मक्याची आवक सध्या मर्यादीत आहे. त्यातच रब्बीतील लागवड वाढत असली तरी पीक येण्यास खूप वेळ आहे. त्यामुळे मका दरात पुढील काळात २०० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com