Tur Rate : तुरीचा बाजार कसा राहील ?

देशात यंदा तूर उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. मात्र आफ्रिकेतील देशांमधून तूर आयात वाढत आहे. त्यामुळं तुरीच्या दरात चढउतार सुरु आहेत. तसंच दरात सध्या मोठी तेजी दिसत नसल्याचं जाणकारांनी सांगितलं.
tur rate
tur rateagrowon

सोयाबीनचे दर स्थिर

1. देशात सोयाबान दर टिकून आहेत. मात्र काही बाजारांमध्ये दर क्विंटलमागे १०० रुपयाने घसरले होते. आज देशात सोयाबीनचा सरासरी दर ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होता. तर कमाल दर ६१०० रुपयांचा होता. सोयाबीनचे दर मागील काही दिवसांपासून याच दरपातळीवर स्थिर आहेत. तर दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन मागं ठेवलं आहे. जागतिक सोयाबीन बाजाराची स्थिती पहता दर ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

tur rate
Soybean Rate : स्टॉक लिमिट हटविल्याने सोयाबीन दरात सुधारणा

ज्वारीच्या दरात तेजी

2. गेल्या हंगामात देशात ज्वारीचं उत्पादन घटलं होतं. त्यातच यंदा परतीच्या पावसामुळं पेरण्यांना उशीर झाला. त्यामुळं रब्बी ज्वारीचा पेरा कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या कारणांनी ज्वारीच्या दरात मोठी तेजी आली. दरवाढीच्या अपेक्षेने स्टाॅकिस्ट ज्वारीचा साठा हळूहळू बाहेर काढत आहेत. सध्या देशात ज्वारीला प्रतिक्विंटल ३ हजार ते ५ हजार ६०० रुपये दर मिळतोय. ज्वारीचा दर टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

हरभरा दबावातच

3. पिकाचे भाव कमी राहिल्यानंतर शेतकरी त्या पिकाचा पेरा कमी करतात, असा अनुभव आहे. मागील वर्षभर हरभरा दर दबावात आहेत. शेतकऱ्यांना क्विंटलमागं जवळपास ८०० रुपये कमी कमतीने हरभरा विकावा लागला. आजही बाजारात हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपये दर मिळतोय. सध्या दर कमी असल्यानं हरभरा पेरणीवर परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र पुढील काही दिवस हरभरा दरात सुधारणा होण्याची शक्यता दिसत नाही, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

tur rate
Chana Sowing : दीड लाख हेक्टरवर होणार हरभऱ्याची पेरणी

वांग्याचे दर नरमले

4. राज्यातील अनेक बाजारांमध्ये आता वांग्याची आवक वाढत आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर आणि नाशिक बाजारांमध्ये वांग्याची आवक चांगली होत आहे. तर इतर बाजारांमध्ये आवक वाढत आहे. त्यामुळं वांग्याचे दर काहीसे नरमले आहेत. मात्र तरीही अनेक बाजारात वांग्याला चांगला दर मिळतोय. सध्या राज्यात वांग्याला सरासरी २ हजार ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. आवक वाढल्यानंतर वांग्याचे दर दबावात येऊ शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.

तुरीचा बाजार कसा राहील ?

5. देशात सध्या तुरीचे दर (Tur Rate) वाढलेले असल्याने सरकार दर कमी करण्यासाठी धडपड करतंय. सरकारने तुरीचा पुरवठा (Tur Supply) वाढवण्यासाठी मार्च २०२३ पर्यंत मुक्त आयातीला परवानगी दिली. केंद्राने यंदा देशात जवळपास ३९ लाख टन तूर उत्पादनाचा (Tur Production) अंदाज जाहीर केला. पण देशातील उत्पादन यापेक्षा कितीतरी प्रमाणात कमी असेल, असं उद्योग आणि व्यापारी सांगत आहेत. सध्या आफ्रिकेतील देशांमध्ये नवी तूर बाजारात येत आहे. त्यामुळं आयात वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

सध्या आयात सुरु असून तुरीला मागणी सामान्य आहे. त्यामुळे दरात मोठी वाढ होण्याची शक्यता नसल्याचं काही अभ्यासक सांगत आहेत. त्यामुळं तुरीच्या दरातही चढउतार सुरु आहेत. सध्या तुरीला सरासरी ७ हजार २०० ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. तुरीला फार उठाव नसला तरी देशातील लग्न सराईचा हंगाम सुरु झाला. या काळात तुरीच्या डाळीला मागणी वाढते. त्यामुळं भविष्यात आयात वाढली तरी दरात मोठी तेजी अपेक्षित नसली तरी घट होण्याची शक्यता नाही, असं तूर बाजारातील अभ्यासक सांगत आहेत. यंदा गेल्यावर्षीप्रमाणं विक्रमी आयात झाली तरी देशातील उत्पादन कमी राहणार आहे. त्यामुळं देशातील मागणीपेक्षा पुरवठा जास्त राहणार नाही. याचा आधार बाजाराला मिळेल, असंही बाजारातील जाणकारांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com