Tur Rate : तुरीचा बाजार कसा राहील?

दिवाळीनंतर देशातील बाजारात तुरीला काहीसा कमी उठाव मिळत आहे. त्यामुळं बाजारात दर कमी जास्त होत आहेत. देशातील बाजारात मागील दोन महिन्यांमध्ये तुरीच्या दरात २०० ते ३०० रुपयांची तेजीमंदी पाहायला मिळाली. देशात सध्या आफ्रिकेतून तुरीची आयात वाढत आहे.
Tur Import
Tur ImportAgrowon

सोयाबीनमधील तेजी कायम

1. देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे दर तेजीत आहेत. सोयाबीनच्या दरात मागील पाच दिवसांमध्ये जवळपास ५०० ते ६०० रुपयांची सुधारणा झाली. आजही सोयाबीनचे दर ५० ते १०० रुपयाने वाढले होते. सध्या देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयातेलाचे दर वाढले तसंच देशातील प्रक्रिया प्लांट्सनी खरेदी वाढविल्याने दरात वाढ झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

Tur Import
Cotton Rate : कापूस वेचणी दरात किलोमागे तीन ते पाच रुपयांनी वाढ

कापसाला दराची झळाळी

2. कापसाच्या दरात आजही काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. दिवाळीनंतर कापसाचे दर सुधारत आहेत. सुताला उठाव मिळाल्यानं कापसाला मागणी वाढली आहे. मागील पाच दिवसांपासून कापसाच्या दरात जवळपास ५०० ते ६०० रुपयांची सुधारणा झाली. सध्या कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ७०० रुपये दर मिळतोय. तर सरकीचे ३ हजार ८०० ते ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. शेतकऱ्यांना यंदा कापसासाठी सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं विक्री सुरु ठेवावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

मुगाचे दर दबावात

3. देशातील बाजारात सध्या नव्या मुगाची आवक वाढत आहे. देशातील बाजारात रोज दैनंदीन ५ लाख क्विंटलच्या दरम्यान आवक होतेय. यंदा सरकारनं मुगासाठी प्रतिक्विंटल ७ हजार ७५५ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र सध्या नव्या मुगाला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ६०० रुपये दर मिळतोय. मुगाला सध्या मागणी कायम आहे. त्यामुळं एफएक्यू दर्जाच्या मुगाचे दर हमीभावाच्या दरम्यान येतील, असा अंदाज प्रक्रियादारांनी व्यक्त केलाय.

Tur Import
Crop Damage : मूग, उडदाची पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली

गवारला दराचा आधार

4. राज्यातील बाजारात सध्या गवारचे दर तेजीतच आहेत. सध्या बाजारात गवारची आवक घटलेली आहे. पुणे, मुंबई आणि नागपूर बाजारातील आवक सरासरी १०० क्विंटलपेक्षा जास्त नाही. तर इतर बाजारातील आवक ही २० क्विंटलपेक्षाही कमी आहे. त्यामुळं गवारचे दर तेजीत आहेत. सध्या गवारला सरासरी ३ हजार ५०० ते ५ हजार रुपये दर मिळतोय. गावरचे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

तुरीचा बाजार कसा राहील?

5. देशात सध्या तुरीचा तुटवडा (Tur Shortage) आहे. त्यामुळं आफ्रिकी देशातून तूर आयात (Tur Import) सुरु आहे. तरीही तुरीच्या दरातील तजी कायम आहे. मागील दोन महिन्यांपासून तुरीच्या दरात (Tur Rate) २०० ते ३०० रुपयांची तेजीमंदी पाहायला मिळतेय. तुरीचे कमाल दर ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आल्यानंतर तुरीला उठाव मिळतोय. तर तुरीच्या कमाल दरानं ८ हजारांचा टप्पा पार केल्यानंतर मागणी काहीशी कमी होऊन दर पुन्हा नरमतात. मात्र मागील दोन महिन्यांत तुरीचा सरासरी दर ७ हजार ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान राहीला.

सध्या आफ्रिकेतून तूर आयात काहीशी जास्त होते. ही तूर प्रक्रियेसाठी ततकी योग्य नसते. या तुरीला मागणीही कमी राहते. त्यामुळे या तुरीचे दरही कमी असतात. पण म्यानमारमधून आयात होणाऱ्या तुरीचे दर जास्त आहेत. भारतातील तुरीलाही चांगली मागणी असते. त्यामुळे या दोन्ही तुरीचे दर तेजीत आहेत. मागील आठवड्याचा विचार करता तुरीच्या भागात तेजीमंदी राहिली. दिवाळीनंतर तुरीला काहीसा कमी उठाव मिळतोय. पण देशात यंदा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. आयात तुरीतूनही गरज पूर्ण होणार नाही. ही शक्यता लक्षात घेऊन देशात तुरीचे व्यवहार होत आहेत. सध्या तुरीला सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. देशातील नवी तूर डिसेंबरपासून येण्यास सुरुवात होईल. मात्र गुणवत्तापूर्ण नव्या मालालाही चांगला दर मिळू शकतो, असा अंदाज तूर प्रक्रियादारांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com