भारतातील शेतकऱ्यांमुळे जागतिक महागाईला अटकाव

भारतामुळे जगात आधीच वाढलेल्या महागाईत तेल ओतलं गेल्याची टीका होत आहे. पण खरं तर जगातील अन्नमहागाई आटोक्यात ठेवण्यामध्ये भारतीय शेतकऱ्यांचं मोठं योगदान आहे.
भारतातील शेतकऱ्यांमुळे जागतिक महागाईला अटकाव
Food inflationagrowon

1. कापसाच्या दरात विक्रमी तेजी आल्यानंतर देशात आता दर काही प्रमाणात उतरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी झाल्याचे पडसाद देशातही उमटले. तसेच चढ्या किंमतीला कापूस विकत घेण्यासाठी व्यापारी आणि साठवणुकदारांनी हात आखडता घेतल्यामुळे कापसाची मागणी घटली आहे. कापसाच्या दरातील(Cotton rates) तेजीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकार आयातशुल्क कपातीला मुदतवाढ देण्याच्या विचारात आहे. या सर्व कारणांमुळे कापसाचे दर घटले आहेत. परंतु दीर्घ कालावधीचा विचार करता कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणावर पडझड होण्याची शक्यता नाही, कापसाचे दर स्थिर राहतील, असं या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितलं.

2. राज्यात गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनच्या बियाण्यांच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यात आता खरीप हंगामाची(Kharif season) तयारी जोरात सुरू आहे. हवामानशास्त्र विभागाने यंदा सरासरीपेक्षा १०३ टक्के अधिक पाऊस होईल, महाराष्ट्रात दमदार पाऊस होईल असा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सरलेल्या हंगामात सोयाबीनला चांगला दर मिळाला. त्यामुळे यंदा सोयाबीनचं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. यंदाही सोयाबीनच्या बियाण्यांच्या टंचाईचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. महाबीजने सोयाबीन बियाण्याच्या दरात वाढ केल्याची टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाबीजवर शेतकऱ्यांची फसवणुक केल्याचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी महाबीजकडील बियाणे संपल्यानंतर महाबीजने बाजार समित्यांमधून बियाणे खरेदी केले आणि तेच बियाणे महाबीजचे असल्याचे सांगून शेतकऱ्यांना विकले, असा आरोप कडू यांनी केला आहे.

3. महागाईचा भडका उडाल्यामुळे केंद्र सरकार हवालदिल झालं आहे. त्यामुळे सरकार गव्हापाठोपाठ तांदळाचीही निर्यात बंद करणार, अशा बातम्या येत आहेत. परंतु सरकारने निर्यातबंदीचा इन्कार केला आहे. देशात तांदळाचा अतिरिक्त साठा आहे(Extra stocks of rice), तसेच खासगी बाजारातील किंमती हमीभावापेक्षा कमी आहेत; त्यामुळे तांदूळ निर्यातबंदीचा प्रश्नच येत नाही, असं सरकारी सूत्रांनी सांगितलं. गेल्या वर्षी तांदळाची निर्यात १७८ लाख टनावरून विक्रमी २१२ लाख टनावर पोहोचली. परंतु देशांतर्गत बाजारात मात्र तांदळाचे दर उतरणीला लागले आहेत. कारण देशात तांदळाचा प्रचंड साठा असून सरकारी खरेदी वाढतच आहे. देशात यंदा तांदळाचं विक्रमी १२९ लाख टन उत्पादन झालं. मुलभूत घटक मजबुत असल्यामुळे तांदूळ निर्यातीवर बंदी घातली जाणार नाही, असं सूत्रांनी सांगितलं.

4. पोल्ट्री(Poultry) उत्पादक शेतकऱ्यांची खासगी कंपन्यांकडून नाडवणुक होत असल्याची दखल केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री संजीव बालियान यांनी घेतली आहे. या कंपन्यांना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसारखं काम करायचं आहे का, अशी टिप्पणीही त्यांनी केली. खासगी कंपन्यांनी आपल्या कारभारात सुधारणा केली नाही तर सरकारला हस्तक्षेप करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसायाकडे (कुक्कुटपालन) पाहिलं जातं. मात्र मागील काही दिवसांपासून या व्यवसायावर संक्रांत आली आहे. खासगी कंपन्यांकडून पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना कमी भाव दिला जात असल्याने ते अडचणीत आले आहेत.

Food inflation
कापसाचे दर का उतरले?

5. भारताने गहू निर्यातीवर बंदी घातल्यामुळे जगातील प्रमुख देश भारतावर टीका करत आहेत. भारताच्या या निर्णयामुळे जगातील अन्नसंकट तीव्र होईल, महागाईचा भडका उडेल, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून भारतातील शेतकऱ्यांनी केलेल्या पराक्रमामुळे देशात अन्नधान्यांचं मुबलक उत्पादन झालं. त्यामुळे भारताला सध्या अन्नधान्य आयातीची गरज पडत नाही. ही स्थिती जर उलट असती आणि भारताने गहू-तांदळाची आयात केली असती तर जगात अन्नाचा मोठा तुटवडा पडला असता, तसेच त्यांच्या किंमती आभाळाला भिडल्या असत्या. त्यामुळे जगातील अन्नमहागाई(Food inflation) आटोक्यात ठेवण्यामध्ये भारतीय शेतकऱ्यांचं मोठं योगदान आहे, असं मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केलं.
भारत सरकारचं हेच धोरण सध्याच्या जागतिक अन्नसंकटाच्या काळात तारून नेण्यासाठी उपयोगी पडलं. रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला, उत्तर अमेरिकेतील दुष्काळ, भारत आणि युरोपातील उष्णतेची लाट यामुळे जगभरात अन्नधान्याचं उत्पादन गडगडलं. जागतिक बाजारात गव्हाच्या किमती केवळ चार महिन्यांत ५४ टक्के वाढल्या, तर मक्याच्या किमतीत ३० टक्के वाढ झाली. भारतातील गव्हाच्या उत्पादनात यावर्षी १० टक्के घट होऊनही किमतीत केवळ १० ते १५ टक्के वाढ झाली. कारण गेल्या वर्षी सरकारने विक्रमी गहू खरेदी केली होती. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात विक्रमी ७२ लाख टन गव्हाची निर्यात होऊनही देशात तुटवडा भासला नाही. केंद्र सरकारला गेल्या काही वर्षांपासून गहू आणि तांदळाची गरजेपेक्षा जास्त खरेदी करावी लागत आहे. परंतु राजकीय अपरिहार्यता असल्यामुळे प्रचंड आर्थिक भार सोसून ही खरेदी करण्यात आली. गहू-तांदूळ साठवणूक करण्याच्या भारताच्या धोरणामुळे सध्याच्या आणीबाणीच्या काळात जगाचाही फायदा झाला. भारताने हे धोरण सोडून दिलं असतं तर जगात अन्नधान्य तुटवड्याचं संकट हाताबाहेर गेलं असतं, असं बाजारविश्लेषकांचं म्हणणं आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com