Harbhara Market: हरभरा पेरणी घटल्यास दर वाढण्याचा अंदाज

देशातील रब्बी पेरणी सध्या जोमात सुरु आहे. मागील वर्षभर देशातील बाजारात हरभऱ्याचा दर दबावात होता. त्यामुळे यंदा शेतकरी हरभऱ्याचा पेरा कमी करतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.
Chana  Rate
Chana RateAgrowon

देशातील रब्बी पेरणी (Rabi Sowing) सध्या जोमात सुरु आहे. मागील वर्षभर देशातील बाजारात हरभऱ्याचा दर दबावात होता. त्यामुळे यंदा शेतकरी हरभऱ्याचा पेरा कमी करतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मागील आठवड्यात मात्र हरभऱ्याचा पेरा (Chana Sowing) गेल्यावर्षीपेक्षा आघाडीवर होता. मग चालू आठवड्यात हरभरा पेरणी कशी राहीली? त्याचा बाजारावर काय परिणाम होतोय? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

Chana  Rate
Kabuli Chana Rate : काबुली हरभरा तेजीत; पेरणी वाढली

1.  सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरातील सुधारणा आजही कायम होती. आज सोयाबीन दराने मागील तीन महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली. सोयाबीनचे वायदे १४.८७ डाॅलर प्रतिपाऊंडवर पोचले होते. तर देशातील बाजारातही सोयाबीनचे दर क्विंटलमागे सरासरी ५० ते १०० रुपयाने सुधारले होते. आज सोयाबीनला सरासरी ५ हजार २५० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरासोबत देशातील दरही सुधारू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Chana  Rate
Chana Sowing : दर दबावात असूनही हरभरा पेरणी वाढली

2. कापूस बाजार स्थिर

देशातील बाजारात आज कापसाचे दर स्थिर होते. त्यातच बाजारातील आवकही कमीच आहे. आज देशातील कापसाला सरासरी ८ हजार ५५० ते ८ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. कापसाचे दर कमी होत नसल्यामुळे उद्योगाने सरकारकडे निर्यातशुल्क रद्द करण्याची मागणी केली. मात्र सरकार ही मागणी मान्य करण्याची शक्यता कमीच आहे. तसेच भारताने आयातशुल्क कमी केल्यास निर्यातदार देश दर वाढवतात. त्यामुळे कापूस दरावर फारसा परिणाम होणार नाही, अशी माहिती कापूस बाजारातील जाणकारांनी दिली. 

Chana  Rate
Chana Production : हरभरा पीक शेतकऱ्यांसाठी आतबट्ट्याचे का ठरतंय ?| ॲग्रोवन

3. कांदा दर दबावातच

राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर नरमलेलेच आहेत. बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम कांदा दरावर दिसून येत आहेत. मात्र एका महिन्यात दर जवळपास निम्म्यावर आल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल ९५० रुपये ते १ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर कांद्याच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांपर्यंत दर वाढू शकतात, अशी माहिती भाजीपाला बाजारातील जाणकारांनी दिली. 

4. हिरव्या मिरचीचे दर नरमले  

राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक वाढली आहे. त्याचा दरावर दबाव आल्याचं दिसतं. हिरव्या मिरचीचे दर क्विंटलमागे जवळपास ५०० रुपयाने कमी झाले. सध्या राज्यातील महत्वाच्या बाजारांमध्ये हिरव्या मिरचीला सरासरी २ हजार २०० रुपये ते २ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत. हिरव्या मिरचीचे हे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, अशी शक्यता भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली.
 

देशातील रब्बी पेरणी सध्या जोमात सुरु आहे. मागील वर्षभर देशातील बाजारात हरभऱ्याचा दर दबावात होता. आजही हरभऱ्याला हमीभावापेक्षा ५०० ते ६०० रुपयांपर्यंत कमी दर मिळत आहे. त्यामुळे यंदा शेतकरी हरभऱ्याचा पेरा कमी करतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्याची प्रचितीही सध्या येत आहे. मागील १५ दिवसांमध्ये हरभरा पेरणीचा वेग मागीलवर्षीच्या तुलनेत जास्त होता. २ डिसेंबरपर्यंत हरभरा पेरणी मागीलवर्षी याच काळात झालेल्या लागवडीपेक्षा साडेपाच टक्क्यांनी जास्त होती. मात्र केंद्रीय कृषिमंत्रालयाने आज प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार हरभरा पेरणीचा वेग कमी झाला. गेल्यावर्षीच्या तुलनेत पेरणीची आघाडी आता अडीच टक्क्यांवर आली. गेल्या आठवड्यात हरभरा पेरणी क्षेत्र ८० लाख हेक्टरवर होते, ते आता ८९ लाख हेक्टरवर पोचले. म्हणजेच गेल्या आठवडाभरात देशात केवळ ९ लाख हेक्टरवर हरभरा पेरणी झाली. तर गेल्यावर्षीचं क्षेत्र ८७ लाख हेक्टर होतं. हरभरा पेरणीची गती लक्षात घेऊन ग्राहक बाजारात हरभरा दराला आधार मिळताना दिसत आहे. महत्वाच्या मोठ्या बाजारात हरभरा दरात मागील दोन आठवड्यांत क्विंटलमागे १०० रुपयांची सुधारणा झाली. सध्या हरभऱ्याला देशात सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. पुढील तीन आठवड्यांमध्ये हरभरा पेरणीचं चित्र कसं राहील, यावर हरभरा दर अवलंबून आहेत, अशी माहिती कडधान्य बाजारातील जाणकारांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com