Agrowon Podcast : देशातील काबुली हरभरा उत्पादन वाढण्याचा अंदाज

देशात मागील काही महिन्यांपासून काबुली हरभऱ्याला चांगला भाव होता. यंदा काबुली हरभऱ्याने गेल्या काही वर्षातील उच्चांकी दराचा टप्पा गाठला होता.
Agrowon Podcast
Agrowon PodcastAgrowon

१) सोयाबीन दर स्थिर (Soybean Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात चढ उतार सुरू आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १४.८५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ४६४ डाॅलर प्रतिटनांवर आहेत.

देशात बाजारातील सोयाबीनची आवक जास्त असूनही मागणी असल्याने दर स्थिर आहेत. सध्या सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये दर मिळतोय. चालू महिन्यात सोयाबीनचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

२) कापूस दर दबावातच (Cotton Rate)

देशात कापसाच्या दरातील नरमाई कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव ७७.२२ सेंट प्रतिपाऊंडवर आहेत. याचा परिणाम भारतातून होणाऱ्या कापूस निर्यातीवर होत आहे. त्यातच मार्च महिन्यातील कापसाची आवक जास्त आहे.

त्यामुळं देशातील दरावर दबाव आल्याचे सांगितले जाते. सध्या देशात कापसाला सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपये दर मिळतोय.

पण देशातील कापूस उत्पादनाचे अंदाज कमी होत आहेत. त्यामुळं आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरालाही आधार मिळेल, असा अंदाज अभ्यासकांनी केला.

३) टोमॅटो दरात काहीशी सुधारणा (Tomato Rate)

मागील महिन्यापर्यंत बाजारातील टोमॅटो आवक जास्त असल्यानं दरावर दबाव होता. राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोची आवक काहीशी कमी झाली. त्यामुळं टोमॅटो दरात सुधारणा दिसत आहे. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार ते १ हजार ३०० रुपये दर मिळतोय.

पुढील काळात टोमॅटो आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी केला.

Agrowon Podcast
Soybean Market : ब्राझीलच्या जैवइंधन धोरणामुळे सोयाबीन सुधारण्याचे संकेत

४) कांदा आवकेचा दबाव कायम (Onion Arrival)

कांदा बाजार अद्यापही दबावात आहे. सध्या नाशिक, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील बाजारांमध्ये कांदा आवक जास्त आहे. बाजारातील आवक जास्त असल्याने दरावर दबाव आहे.

कांद्याचे भाव अद्यापही उत्पादन खर्चापेक्षा कमी आहेत, असे शेतकरी सांगत आहेत. सध्या कांद्याला सरासरी ७०० ते १ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील काही दिवस कांद्याची आवक जास्त राहून दरावर दबाव राहू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

५) काबुली हरभऱ्याचे उत्पादन कसे राहू शकते? (Kabuli chana)

देशात मागील काही महिन्यांपासून काबुली हरभऱ्याला चांगला भाव होता. यंदा काबुली हरभऱ्याने गेल्या काही वर्षातील उच्चांकी दराचा टप्पा गाठला होता. काही बाजारांमध्ये तर काबुली हरभऱ्याच्या दराने १५ हजार रुपये प्रतिक्विंटलचाही टप्पा पार केला होता.

दुसरीकडे देशी हरभरा दबावात होता. पण मागणीच्या तुलनेत पुरवठा मर्यादीत असल्याने काबुली हरभरा तेजीत राहिला. महत्वाच्या काबुली उत्पादक देशांमध्ये उत्पादन कमी राहीले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही दर तेजीत होते. परिणामी भारतीय मालाला मागणी वाढली.

Agrowon Podcast
Cotton Market : कापूस, सोयाबीनच्या किमतींत घसरण

गेले सहा ते सात महिने काबुली हरभऱ्याचे दर तेजीत असल्याने देशात यंदा काबुली हरभऱ्याचे क्षेत्र वाढल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. त्यामुळं मागील काही दिवसांपासून काबुली हरभऱ्यातील तेजी कमी झाली. काही बाजारांमध्ये नव्या मालाची आवक सुरु झाली.

सध्या काबुली हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ९ हजार ते ११ हजार ५०० रुपये दर मिळतोय. देशात यंदा काबुली हरभरा उत्पादन ३ लाख टनांचा टप्पा पार करेल, असा अंदाज काही व्यापारी व्यक्त करत आहेत.

त्यामुळं आवकेच्या हंगामात दरावर काहीसा परिणाम होऊ शकतो. पण दरात जास्त नरमाई येण्याची शक्यता नाही, असाही अंदाज व्यापारी आणि प्रक्रियादार व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com