Urad Market: देशातील बाजारात उडदाची उपलब्धता कमी

यंदाच्या खरिपातील उडदाचे उत्पादन कमी राहीले. त्यातच सध्या बाजारातील उडदाची आवक कमी आहे. तर उडदाला उठाव चांगला मिळतो आहे. फेब्रुवारीपासून म्यानमारमधून उडीद आयात वाढू शकते.
Urad Market
Urad MarketAgrowon


यंदाच्या खरिपातील उडदाचे उत्पादन (Urad Production) कमी राहीले. त्यातच सध्या बाजारातील उडदाची आवक (Urad Arrival) कमी आहे. तर उडदाला उठाव चांगला मिळतो आहे. फेब्रुवारीपासून म्यानमारमधून उडीद आयात (Urad Import) वाढू शकते. मग देशातील उडदाला सध्या काय दर मिळतोय? भविष्यात उडदाला काय दर मिळू शकतो? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

Urad Market
Urad Market : बाजारात उडदाच्या डाळीचे दर का वाढले? | Agrowon

1. सोयाबीन किंचित सुधारले

ख्रिसमसच्या सुट्ट्यांनंतर आंतरराष्ट्रीय बाजार दोन दिवस सुरु झाला. पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर मोठी सुधारणा पाहायला मिळाली. आज १५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर सोयाबीनचे वायदे पोचले होते. तर देशातील काही बाजारांमध्येही आज सोयाबीनच्या दरात किंचित वाढ झाली होती. आज सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळला. सोयाबीनच्या दरात जानेवारीत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला होता. 

Urad Market
Urad Market : देशात उडीद उत्पादन कमी राहण्याची शक्यता | Agrowon

2. कापूस दरात काहीशी वाढ

देशातील बाजारात सोमवारी कापूस दरात मोठी घट झाल्यानंतर मंगळवारी दर स्थिरावले होते. मात्र आज काही बाजारांमध्ये कापूस दरात वाढ झालेली दिसली. कापसाचे दर तुटल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारातील आवक कमी केली. तसेच वायद्यांमध्ये कापूस दर वाढल्याने बाजार समित्यांमधील दरातही सुधारणा पाहायला मिळाली. आज कापसाला सरासरी ७ हजार ६०० ते ८ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. जानेवारीत कापसाचे दर वाढू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला. 

Urad Market
Cotton Market: देशातील बाजारात कापूस दर का नरमले? | Agrowon | ॲग्रोवन

3. ज्वारीचे दर तेजीत

देशात सध्या ज्वारीचे दर तेजीत आहेत. यंदा खरिपातील ज्वारी उत्पादन कमी झाले होते. तसेच अनेक महत्वाच्या ज्वारी उत्पादक भागांमध्ये परतीचा पाऊस चांगला झाला. त्यामुळे ज्वारी लागवडीला उशीर झाला. परिणामी रब्बीतील ज्वारी उत्पादनही कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. यामुळे सध्या ज्वारीला प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. यंदा ज्वारीचे दर तेजीत राहण्याचा अंदाज असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. 

Urad Market
Cotton Market : बाजारात कापसाची आवक कमी

4. टोमॅटो दर घसरलेच

राज्यातील बाजारात सध्या टोमॅटोचे दर चांगलेच घसरले आहेत. मागील महिन्यात टोमॅटोला सरासरी १५०० ते २०० रुपये दर मिळत होता. मात्र सध्या दरात मोठी घसरण झाली असून दर ६०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटलवर पोचले. बाजारातील आवक वाढल्याने दरात घट झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर टोमॅटो आवक पुढील काळात मर्यादीत झाल्यास सरासरी भाव १ हजार रुपयांचा टप्पा पार करु शकतात, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला.
 

5. देशात सध्या उडदाचे दर चांगले आहेत. उडदाला सध्या सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. यंदा खरिपातील उडीद उत्पादन कमी राहीले. तसंच भारताचा मुख्य उडीद पुरवठादार असलेल्या म्यानमारमध्ये सध्या उडदाची उपलब्धता कमीच आहे. म्यानमारमध्ये उडदाची आवक जानेवारीत सुरु होते. मात्र आवकेचा मुख्य हंगाम फेब्रुवारीत असतो. त्यामुळं दोन महिने तरी म्यानमारमधून आयात कमी होईल. त्यामुळं देशातील उडीद बाजाराची मदार आता तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील पिकावर आहे. या राज्यांतील उडीद लवकर बाजारात येईल. मात्र सध्या देशात उडदाचा पुरवठा कमी असल्याने दर तेजीत आहेत. यंदा सरकारने उडदाला प्रतिक्विंटल ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. पण सध्याचे दर त्यापेक्षा जास्त आहेत. देशातील बाजारात सध्या सरासरी ५०० टन उडदाची आवक होत आहे. ही आवक मागीलवर्षी याच काळातील आवकेच्या तुलनेत जळपास ८० टक्क्यांनी कमी आहे. त्यातच सध्या देशात गुणवत्तापूर्ण उडदाची उपलब्धता कमी असल्याचं व्यापारी सांगत आहेत. उठाव चांगला मिळतोय. त्यामुळं यंदा उडादाचे दर टिकून राहतील. यंदा उडदाला सरासरी ७ हजार ते ७ हजार २०० रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज उडीद बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com