Maize Market: मका उत्पादक भाववाढीच्या प्रतिक्षेत

बाजारात मागील काही दिवसांपासून मका दर स्थिरावले आहेत. पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगांनी मका निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही, मात्र त्याचा मानसिक परिणाम बाजारावर जाणवत आहे.
Maize Market
Maize MarketAgrowon

बाजारात मागील काही दिवसांपासून मका दर स्थिरावले आहेत. पोल्ट्री (Poultry) आणि स्टार्च (Starch) उद्योगांनी मका निर्यातीवर (Maize Export) बंदी घालण्याची मागणी केली होती. सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही, मात्र त्याचा मानसिक परिणाम बाजारावर जाणवत आहे. मग सध्या मक्याला काय दर (Maize Rate) मिळत आहे? पुढील काळात मक्याचा बाजार कसा राहील? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

Maize Market
Maize Market : महत्वाच्या मका उत्पादक देशांमध्ये पिकाला दुष्काळाचा फटका | Agrowon

1. सोयाबीन बाजार कायम

सोयाबीनचा बाजार आजही स्थिर होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सुट्ट्या असल्यानं व्यवहार बंद आहेत. त्यामुळं पुढील काही दिवस तरी सोयाबीन बाजार स्थिर राहील, असा अंदाज आहे. आजही देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला. तर जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. 

Maize Market
Maize Rate : मका भाव खाणार

2. कापूस दर सुधारणार

कापूस बाजारात सध्या अपेक्षेप्रमाणं दर कमी झाले आहेत. काल कापसाच्या दरात क्विटंलमागं ५०० रुपयांची नरमाई दिसून आली होती. मात्र आज अनेक ठिकाणी बाजार स्थिर होता. तर काही ठिकाणी दरात क्विंटलमागं १०० रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली. कापूस बाजार जानेवारीच्या मध्यापर्यंत दबावात राहू शकतो. त्यानंतर दर सुधारतील. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांनी किमान ८ हजार रुपयांच्या खाली कापूस विक्री करू नये, असं आवाहन जाणकारांनी केलंय. 

Maize Market
Maize Market : आजचे मका बाजारभाव

3. तूर दरातील तेजी कायम


देशातील बाजारात सध्या तुरीचे दर टिकून आहेत. देशात यंदा तुरीचे उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळं निर्यातदार देशही कमी दरात तूर निर्यात करण्यास इच्छूक नाहीत. परिणामी देशातही तुरीचे दर तेजीत आहेत. सध्या नव्या तुरीची आवक वाढत आहे. मात्र तरीही तुरीला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. हे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज कडधान्य प्रक्रियादारांनी व्यक्त केलाय. 

4. डाळिंबाला सरासरी दर

सध्या सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील बाजारांमध्ये डाळिंबाची आवक जास्त दिसते. मात्र सरासरीपेक्षा सध्या बाजारात येणारा डाळिंब कमीच आहे. परिणामी काही बाजारांमध्ये डाळिंबाला जास्त दर मिळतोय. मात्र जास्त आवक असलेल्या बाजारांमधील सरासरी दर हा ६ हजार ते १३ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. डाळिंबाला पुढील काळात मागणी वाढून दरही सुधारण्याची शक्यता आहे, असा अंदाज डाळिंब व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
 

5. राज्यातील महत्वाच्या मका उत्पादक भागांतील बाजार समित्यांमध्ये सध्या मक्याची आवक वाढत आहे. गेल्या हंगामात आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरवठ्यात अडचणी होत्या. त्यामुळे मका दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मक्याने २ हजार ८०० रुपयांचा टप्पा गाठला होता. मात्र त्यानंतर दर कमी होत गेले. तसंच यंदा सरकारने खरिपातील मका उत्पादन विक्रमी पातळीवर पोचल्याचं म्हटलंय. पण शेतकऱ्यांनी यंदा मका पिकाला पावसाचा मोठा फटका बसल्याचं सांगितलं. त्यामुळं खरिपातील मका उत्पादन सरकारचा अंदाज असलेल्या २३ लाख १० हजार टनांवर पोचणार नाही, असंही शेतकरी सांगत आहेत.

मात्र बाजारात मागील काही दिवसांमध्ये मका दर स्थिरावले आहेत. पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगांनी मका निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही, मात्र त्याचा मानसिक परिणाम बाजारावर जाणवत आहे. असं असूनही सध्या मक्याचे दर हमीभावापेक्षा जास्त आहेत. सरकारने खरिपासाठी मक्याला १ हजार ९६५ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र सध्या बाजारात मक्याला सरासरी २ हजार ते २ हजार ३०० रुपये दर मिळतोय. सरकारने निर्यातबंदी केली नाही, किंवा बाजारात हस्तक्षेप केला नाही, तर मक्याच्या दरात २०० रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com