Tur Rate : तुरीच्या दरातील तेजी टिकेल का?

आफ्रिकेतील देशांमधून सध्या तूर आयात वाढली आहे. त्यामुळं बाजारावर काहीसा दबाव आला. म्यानमारमध्येही तुरीचे दर कमी झाले. म्यानमारची तूर मार्च महिन्यापासून बाजारात येईल. तसेच देशातील मालाचीही आवक वाढणार आहे.
Tur rate
Tur rate Agrowon

सोयाबीन दर स्थिर

1. बुधवारी सोयाबीन दराने आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या अडीच महिन्यातील उच्चांकी टप्पा गाठला होता. १४.७४ डाॅलर प्रतिबुशेल्सने व्यवहार झाले. मात्र काल बाजार बंद झाला तेव्हा दर १४.२५ डाॅलरपर्यंत लुडकले. आज दरात काहीशी सुधारणा होऊन १४.३४ डाॅलरपर्यंत पोचले. मात्र देशातील सोयाबीन दर आजही स्थिर होते. देशात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळला. सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्याने सोयाबीन विकावे, असं आवाहन शेतीमाल बाजार अभ्यासकांनी केले आहे.

Tur rate
Soybean Rate : सोयाबीन दरात वाढ होणार

उडदाचे दर तेजीतच

2. नाफेडने अनेक राज्यांमध्ये उडदाची खरेदी सुरु केली. मात्र नाफेडला आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात खरेदी करता आली नाही. कारण सध्या खुल्या बाजारात उडदाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत आहे. केंद्राने यंदा उडदासाठी ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र सध्या बाजारात ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. देशातील उत्पादन आणि मागणीचा विचार करता उडदाचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज प्रक्रियादारांनी व्यक्त केला आहे.

Tur rate
Kabuli Chana Rate : काबुली हरभरा तेजीत; पेरणी वाढली

हरभऱ्याचा पेरा जोमात

3. मागील हंगामातील हरभऱ्याला अद्यापही दर कमी मिळत आहे. गेल्या हंगामात सरकारने हरभऱ्यासाठी ५ हजार २३० रुपये हमीभाव जाहीर केला होता. मात्र बाजारात सध्या हरभऱ्याला ४ हजार ४०० ते ४ हजार ९०० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हरभऱ्याचा पेरा कमी करतील, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र आत्तापर्यंत देशात जवळपास ८० लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला. गेल्यावर्षीपेक्षा हा पेरा ४ लाख हेक्टरने जास्त आहे.

Tur rate
Onion Seed Production : कांदा बीजोत्पादनामध्ये लागवड तंत्र महत्त्वाचे

कांदा दर दबावात

4. कांद्याने पुन्हा एकदा उत्पादकांची गोची केली. कांद्याचे दर मागील महिन्यात सरासरी २ हजार रुपयांवर पोचले होते. मात्र त्यात घसरण होऊन कांदा दर आता सरासरी १३०० रुपयांपर्यंत आले. एकिकडे उत्पादन घटूनही बाजारभाव पडल्याने शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा होती. मात्र झालं उलटच. दर पडले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. कांद्याचे बाजारभाव पुढील काही दिवसांमध्ये सुधारु शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

तुरीच्या दरातील तेजी टिकेल का?

5. सरकारने तूर आयातीसाठी (Tue Import) पायघड्या घातल्या आहेत. त्यामुळे आफ्रिकेतील देशांमधून तूर आयात वाढत आहे. सध्या आफ्रिकेतील देशांमध्ये नवी तूर बाजारात (Tur Market) येत असून लगेच भारतात निर्यात केली जात आहे. या मालाची उपलब्धतता भारतीय बाजारपेठेत वाढल्याने दरही (Tur Rate) काहीसे नरमले आहेत. म्यानमारध्येही तुरीच्या दरात काहीशी घट झाली आहे. मागील महिन्यात म्यानमारच्या तुरीचे दर प्रतिक्विंटल सरासरी ७५०० रुपयांच्या दरम्यान होते. ते आता ७ हजार रुपयांपर्यंत नरमले आहेत. म्यानमारप्रमाणेच आफ्रिकेच्या तुरीचे दरही क्विंटलमागे ५०० रुपयाने नरमल्याचे दिसत आहे. म्यानमारमध्ये नव्या तुरीची फेब्रुवारी महिन्यात काढणी सुरु होईल. पण आफ्रिकेच्या तुरीचा दरावर दबाव जाणवत आहे.

देशातही तुरीच्या बाजारावर आयात आणि स्थानिक उत्पादनाचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे सरासरी दर ६ हजार ७०० ते ७ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. मार्चपासून म्यानमारची तूर बाजारात येईल. तसेच स्थानिक बाजारातही तुरीची आवक वाढलेली असेल. त्यामुळे या बाजारात पुरवठा वाढेल. मात्र यंदा देशातील तूर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. तसेच सरकारने हमीभाव खरेदी सुरु केल्यास बाजाराला चांगला आधार मिळू शकतो. शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन प्रमाणे टप्प्याटप्प्याने विक्री सुरु ठेवल्यास पुरवठा मर्यादीत राहील. असे झाल्यास शेतकऱ्यांना तुरीसाठी ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com