Wheat Rate : तिसऱ्या लिलावात ५ लाख टन गव्हाची विक्री

देशातील बाजारात सध्या गहू दरावरून मोठ्या घडामोडी घडत आहेत.
Wheat Rate
Wheat RateAgrowon

१) सोयाबीनचे दर स्थिर (Soybean Rate)

देशातील बाजारात सोयाबीनचे दर स्थिर आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) आजही चढ उतार पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत १५.४० सेंटपर्यंत नरमले होते. तर सोयापेंड ४९४ डाॅलर प्रतिटनावर होती.

देशातील सोयाबीन दर मात्र ५ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान कायम होते. देशात सोयाबीनला मागणी वाढत आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) कापूस दरात नरमाई (Cotton Rate)

कापासाचा बाजार काहिसा स्थिर होता. देशातील बाजारात कापसाला सध्या सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार ४०० रुपये दर मिळतोय. तर बाजारातील कापसाची आवकही स्थिर आहे. सध्या बाजारातील कापसाची दैनंदीन आवक १ लाख ३० हजार गाठींच्या दरम्यान होत आहे.

उद्योगांना या भावात कापूस मिळत नाही. शेतकऱ्यांना जास्त दर अपेक्षित आहेत. त्यमुळं आवक कमी झाली. उद्योगांना कापूस हवा असल्यास दर वाढवावे लागतील. त्यामुळं कापसाची सरासरी दरपातळी वाढून किमान ८ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Wheat Rate
Wheat Market: सरकार आणखी २० लाख टन गहू विकणार, व्यापाऱ्यांनाही तंबी | Agrowon | ॲग्रोवन

३) तुरीच्या भावात सुधारणा (Tur rate)

तुरीच्या दरातही आजही काही बाजारांमध्ये सुधारणा पाहायला मिळाली. बाजारातील कमी आवक आणि वाढलेली मागणी यामुळं चांगला दर मिळतोय. आज अनेक बाजारांमध्ये तूर दरात क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली.

आज तुरीला सरासरी ७ हजार ३०० ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. यंदा तुरीला चांगला भाव मिळू सकतो. तुरीचे भाव ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

४) बाजरीही खातेय भाव

देशात यंदा बाजारीचे उत्पादन घटल्याचं शेतकरी सांगत आहेत. तसचं सध्या बााजारतील आवकही कमी आहे. पण बाजरीला चांगला उठाव मिळतोय. त्यामुळं बाजरीचे दर तेजीत आहेत.

सध्या बाजरीला २ हजार ४०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. रब्बीतही बाजारीचे उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे बाजारीच्या दरातील वाढ पुढील काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

Wheat Rate
Wheat Harvest : गहू काढणीच्या कामांची पूर्व भागात लगबग

५) गव्हाचं उत्पादन यंदा वाढेल का?

देशातील बाजारात सध्या गहू दरावरून मोठ्या घडामोडी घडत आहेत. भारतीय अन्न महामंडळानं बुधवारी ११ लाख ७२ हजार टन गहू विक्रीसाठी लिलाव ठेवले होते. पण केवळ ५ लाख ८ हजार टन गव्हाची विक्री झाली. हा तिसरा लिलाव होता.

यापुर्वी सरकारनं दोन लिलावांमधून १३ लाख टन गव्हाची विक्री केली. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या लिलावासाठी सरकारनं आरक्षित किंमत कमी होती. त्यामुळं पहिल्या दोन लिलावांमध्ये गहू घेणाऱ्या व्यापाऱ्यांना फटका बसला.

त्यामुळं तिसऱ्या लिलावात कमी व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदवला. सरकारला गव्हाचे भाव कमी करायचे आहे. त्यासाठी सरकार आक्रमक आहे. त्यामुळं बाजारात सध्या भीती आणि अस्वस्थताही आहे. पण दुसरीकडे उन्हाचा पारा चढतोय.

त्यामुळं गहू पिकाला फटकाही बसतोय. मागील चार ते पाच दिवसांपासून अनेक भागांमध्ये पारा चढला. त्यामुळं गहू पिक वेळेआधी पक्व होऊ सकते. परिणामी उत्पादकता कमी राहू शकते. शेतकरी आणि व्यापारी यंदाही उत्पादन कमी राहील, असा अंदाज व्यक्त करत आहेत.

गहू उत्पादकता यंदाही १० ते १५ टक्क्यांपर्यंत घटू शकते, अशी चर्चा सध्या सुरु आहे. पण गहू पिक काढणीच्या काळातच खरी परिस्थिती लक्षात येईल.

सध्या गव्हाला २ हजार ३०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सरकारला गहू हमीभावापेक्षा कमी दरात ठेवायचा. पण सरकारचे हे उद्दीष्ट साध्य होण्याची शक्यता खूपच आहे, असेही काही व्यापारी सांगत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com