Soybean Rate: सोयाबीन दरावरील दबाव दूर होईल का?

ताज्या आकडेवारीनुसार देशात सोयाबीनची लागवड किंचिंत पिछाडीवर आहे. मात्र देशातील बाजारांमध्ये चालू आठवड्याच्या सुरुवातीलाच सोयाबीन दर दबावात आले होते. मात्र शनिवारी दर काही प्रमाणात पुन्हा सुधारले. पण सोयाबीन दर दबावात का आले होते? सध्या सोयाबीनला काय दर मिळतो आहे? पुढील काळात सोयाबीनला काय दर मिळू शकतात? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.
Soybean Rate: सोयाबीन दरावरील दबाव दूर होईल का?

कापसाला दराची झळाळी कायम

देशात यंदा कापसाची लागवड (Cotton Sowing) जवळपास ७ टक्क्यांनी वाढली. मात्र तरीही सुरूवातीपासूनच कापसाला चांगला दर (Cotton Rate) मिळतोय. सध्या कापसाचं पीक चांगलं दिसत असलं तरी उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे. अनेक भागांत कपाशीला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. पिकाची वाढही खुटंली. तसंच बोंडअळी (Pink Bowl Worm), पांढरी माशी (White fly), मावा तुडतुड्यांचाही परिणाम पिकावर होतोय. परिणामी उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळं कापूस लागवड वाढली तरी यंदा कापसाला चांगला दर मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. सध्या कापसाला प्रतिक्विंटल ९ हजार ते १० हजार रुपये सरासरी दर मिळत आहे.

भुईमूगाच्या दरात सुधारणा

देशात भुईमूग उत्पादनात (Groundnut Production) गुजरात आघाडीवर आहे. गुजरातमधील उत्पादन वाढ किंवा घटीचा बाजारावर लगेच परिणाम होत असतो. यंदा गुजरातमधील भुईमूग लागवड १० टक्क्यांनी कमी होऊन १७ लाख हेक्टरवर स्थिरावली. तर उत्पादन यंदा ३९ लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे. मागील हंगामात गुजरातमध्ये जवळपास ४४ लाख टन उत्पादन झालं होतं. त्यामुळं सध्या दरात वाढ झाली आहे. यंदा केंद्र सरकारने भुईमुगाला ५ हजार ८५० रुपयांचा हमीभाव जाहिर केला. मात्र सध्या ६ हजार ६०० ते ६ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. हा दर टिकून राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Soybean Rate: सोयाबीन दरावरील दबाव दूर होईल का?
Rice Export Ban: तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी

तुरीच्या दरातील तेजी कायम

देशात खरिपातील तूर (Tur), मूग (Moong) आणि उडदाला (Urad) चांगला दर मिळतोय. तसंच ताज्या आकडेवारीनुसार खरिपातील कडधान्य लागवड (Pulses Sowing) ४ टक्क्यांनी घटलीये. मागील हंगामात या तीनही पिकांना खुल्या बाजारात हमीभावही मिळाला नाही. त्यातच सरकारनं आक्रमकपणे आयातीचं धोरण राबवलं. त्यामुळं यंदा शेतकऱ्यांनी कडधान्य लागवड कमी केली. महत्वाच्या तीनही पिकांची लागवड यंदा घटली आहे. तुरीचा पेरा सर्वाधिक ५ टक्क्यांनी घटला. सध्या तुरीला ७ हजार ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. हा दर टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

गवारचे दर टिकून राहण्याची शक्यता

बाजारात सध्या गवारला चांगला दर मिळतोय. मात्र बाजारातील गवारची आवक मर्यादीत होतेय. पुणे, मुंबई आणि नागपूर या मोठ्या बाजार समित्यांमध्ये आवक २०० ते ३०० क्विंटलच्या दरम्यान होत आहे. मात्र इतर बाजार समित्यांमधील आवक ही २० ते ३० क्विंटलच्या दरम्यान होतेय. त्यामुळं सध्या गवारला प्रतिक्विंटल ३००० रुपये ते ५००० रुपये दर मिळतोय. बाजारात गवारची आवक लगेच वाढण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळं गवारचा हा दर टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Soybean Rate: सोयाबीन दरावरील दबाव दूर होईल का?
Cotton Pests : वाढीच्या अवस्थेनूसार कपाशी पिकाचे व्यवस्थापन कसे कराल ?

सोयाबीन दरावरील दबाव दूर होईल का?

सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) शनिवारी काहीशी वाढ झाली. चालू आठवड्याच्या सुरुवातीला सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल ४ हजार ४०० रुपयांपर्यंत खाली आला होता. मात्र त्यात पुन्हा सुधारणा होत गेली. शनिवारी सोयाबीनला ५ हजार ते ५ हजार २०० रुपये दर मिळाला. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचा पुरवठा (Edible Oil Supply) वाढलाय. त्यातच केंद्र सरकारने २० लाख टन सोयातेल (Soybean Oil) आणि सूर्यफूल तेल (Sunflower Oil) शुल्काविना आयात करण्याची परवानगी दिलेली आहे. अर्जेंटीनाही सोयाबीन (Argentina Soybean) निर्यातीसाठी उत्पादकांना सवलत देत आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा पुरवठा (Soybean Supply) वाढण्याची शक्यता व्यक्त होतेय. तर देशात यंदा सोयाबीनचं उत्पादन चांगलं येण्याची शक्यता उद्योगातून व्यक्त होतेय. सध्या देशात जवळपास २७ लाख टन सोयाबीनचा साठा उपलब्ध असण्याची शक्यता सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन अर्थात सोपाने व्यक्त आहे. या सर्व घटकांमुळं सोयाबीनचा बाजार दबावात आल्याचं जाणकारांनी सांगितलं. मात्र स्टाॅकिस्ट सोयाबीनचा हा साठा कमी दरात बाहेर काढण्याची शक्यता कमीच आहे. तर मागील काही वर्षांत ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन उत्पादक पट्ट्यात पाऊस होतो. ऐन काढणीच्या काळात पाऊस होत असल्यानं उत्पादनावर परिणाम होतो. सध्या पीक चांगलं दिसत असलं तरी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील पावसावर उत्पादन अवलंबून आहे. म्हणून लगेच उत्पादनाबाबत ठामपणे सांगता येणार नाही. पण एकूणच बाजाराची स्थिती पाहता यंदा शेतकऱ्यांना साडेपाच ते सहा हजार रुपयांचा दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी ही दरपातळी लक्षात ठेऊन विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com