Top 5 News: वाढत्या उन्हाचा साखर उद्योगाला दिलासा?

शीतपेय उद्योग तसेच सभा, समारंभ यांचा सकारात्मक परिणाम साखर मागणीवर दिसून आला.
निर्यातीच्या निर्णयाने साखर उद्योगाला दिलासा
निर्यातीच्या निर्णयाने साखर उद्योगाला दिलासाAgrowon

1. बाजारात तुरीची आवक (Tur Arrival) आता बऱ्यापैकी येऊन गेली. तसेच देशांतर्गत बाजारात भाव वाढल्याशिवाय आयात करणं परवडणार नाही. सध्या आफ्रिकी तूर ५३-५५ रुपये किलो तर म्यानमारमधली लेमन तूर (Lamon Tur) ६३ रुपये किलोच्या आसपास आहे. स्थानिक तूर बाजारात येत असल्यामुळे भाव वाढत नाहीत. स्थानिक तुरीच्या किंमतींपेक्षा आयात तूर महाग पडत आहे. त्यामुळे आयात अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे दिसून येतंय. स्थानिक तूर आवक मे महिन्याच्या मध्यापासून रोडावू लागेल. तेव्हा पुरवठा नियंत्रित होऊन तुरीचा बाजार सुधारत (Tur market) जाईल, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

2. यंदा देशात मोहरी उत्पादन (Mustard Production) वाढले. मात्र बाजारातील आवक वाढली नाही. मार्च महिन्यातील देशभरातील बाजारांत १३ लाख टन मोहरीची आवक झाली होती. ती एप्रिलमध्ये वाढणे अपेक्षित होते. मात्र झालं उलटचं. एप्रिलमधील आवक केवळ ७ लाख २२ हजार टनच होती. खाद्यतेलाला मागणी असल्यानं मोहरीचे दर (Mustard rate) पुढील काळात आणखी वाढतील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. त्यामुळे शेतकरी मोहरीचा साठा मागे ठेवत आहेत. शेतकऱ्यांनी माल रोखल्याने बाजारातील आवक कमी झाली. शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा आहे. त्यामुळे देशात मोहरीचे उत्पादन वाढूनही गाळप कमी होत आहे. पुढील काही काळ मोहरीचे दर ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपये राहू शकतात. बाजारातील फंडामेंटल्स दराला आधार देणारे आहेत.

निर्यातीच्या निर्णयाने साखर उद्योगाला दिलासा
शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी पाच लाखांचे अनुदान मिळते का?

3. सध्या जागतिक स्तरावर गव्हाची टंचाई (wheat scarcity) निर्माण झाली. त्यातच सध्या फक्त भारतातच नवीन माल बाजारात आला. त्यामुळे भारताकडून मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात होत आहे. तर खुल्या बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर आहेत. त्यामुळे सरकारची खरेदी मंदावली. त्यामुळे केंद्र सरकारकडून होणाऱ्या गहू खरेदीत (wheat procurement) ४४ टक्क्यांनी घट झाली. १ मेपर्यंत केंद्र सरकारकडून १६२ लाख टन गहू खरेदी करण्यात आली. तर गेल्या वर्षी याच कालावधीत सरकारकडून २८८ लाख टन गहू खरेदी करण्यात आली होती, अशी माहिती सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली.

4.नांदेड विभागातील चार जिल्ह्यांत अद्याप ४२ हजार हेक्टरवरील ऊस गाळपाअभावी शिल्लक असल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालकांनी दिली. परंतु प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी अधिक हेक्टरवरील ऊस शिल्लक असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या विभागात २७ पैकी २६ कारखाने अद्याप सुरू आहेत. प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने विभागात नांदेडमध्ये चार हजार ४८ हेक्टर, परभणीमध्ये ११ हजार ९६४ हेक्टर, हिंगोलीत दोन हजार ७५० हेक्टर व लातूर जिल्ह्यात २३ हजार २९५ हेक्टर असा एकूण ४२ हजार ५७ हेक्टर ऊस १७ एप्रिलपर्यंत उभा असल्याची माहिती मिळाली.हा ऊस विभागात मागील १८ ते २० महिन्यांपासून तोडणीअभावी उभा आहे.

निर्यातीच्या निर्णयाने साखर उद्योगाला दिलासा
म्यानमारमध्ये माॅन्सून पाच-दहा दिवस लवकर धडकणार?

5.देशभरात उन्हाचे चटके वाढत असताना साखर कारखान्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे शीतपेय उद्योगातून वाढलेली साखरेची मागणी व सुरू झालेले सभा, समारंभ याचा सकारात्मक परिणाम साखर मागणीवर दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत साखर दरात क्विंटलला फेब्रुवारीच्या तुलनेत एप्रिलच्या शेवटच्या सप्ताहापर्यंत शंभर रुपयांपर्यंत वाढ झाली. सध्या क्विंटलला 3300 रुपयांपेक्षा जास्त दर साखरेला मिळत आहे. केंद्राने मे महिन्यासाठी 22.50 लाख टन साखरेचा कोटा दिला आहे. एप्रिल मध्ये 22 लाख टन साखरेचा कोटा केंद्राकडून देण्यात आला होता. मे साठी कोटाही ज्यादा नसल्याने साखर कारखान्यांना साखर विक्री करताना दबाव येणार नसल्याची स्थिती आहे. एप्रिल बरोबर मेमध्ये ही मागणी वाढण्याची शक्‍यता असल्याने यंदाचा उन्हाळा साखर कारखान्यांना काहीसा सुखकर ठरेल, अशी शक्यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली. फेब्रुवारीपर्यंत साखरेचे दर एमएसपी इतकेच रेंगाळत होते. क्विंटलला 3100 रुपयाच्या आसपास साखरेचा दर होता. मार्चनंतर उन्हाळ्यामध्ये वाढ होऊ लागल्याने याचा सकारात्मक परिणाम साखरेच्या मागणीवर दिसून येऊ लागला. कोविडचे संकटही कमी झाल्याने लग्न समारंभ व दोन वर्षे थांबून राहिलेले कार्यक्रम एकदम सुरू झाले. त्यामुळे साखरेच्या मागणीत अपेक्षित वाढ झाली एप्रिल मध्ये मार्च च्या तुलनेत क्विंटलला पन्नास रुपयांची वाढ दिसून आली होती. मेच्या प्रारंभी पुन्हा पन्नास रुपयांची वाढ झाली . सध्या साखरेला दर्जानुसार 3250 ते 3300 चे रुपयापर्यंत दर मिळत आहे. मागणी कायम राहण्याची शक्यता असल्याने मे महिन्यात तरी कारखान्यांना साखर विक्री करताना अडथळे येणार नाहीत, अशी शक्यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com