Tur Market : सरकारच्या हमीभाव खरेदीचा बाजाराला आधार मिळेल

देशातील तूर उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज आहे. तसंच मागील हंगामातील शिल्लक साठाही नगण्य आहे. सरकारही हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यामुळं सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. सध्या तुरीला चांगला दर मिळत आहे.
Tur Market
Tur MarketAgrowon

देशातील तूर उत्पादन (Tur Production) यंदा घटण्याचा अंदाज आहे. तसंच मागील हंगामातील शिल्लक साठाही नगण्य आहे.

सरकारही हमीभावाने खरेदी करणार आहे. त्यामुळं सध्या तुरीचे दर (Tur Rate) तेजीत आहेत. सध्या तुरीला चांगला दर मिळत आहे.

मात्र हे दर पुढील काळात  टिकतील का ? तुरीला यंदा काय दर मिळू शकतो? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

Tur Market
Soybean Rate : सोयाबीन बाजाराला आधार मिळेल का?

1. सोयाबीन दरात चढ उतार सुरुच

आंतरराष्ट्रीय बाजारात आठवड्याचा शेवट सोयाबीन दर नरमण्यासह झाला. शुक्रवारी सोयाबीनचे वायदे १५.०९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले.

तर सोयापेंड ४६४ प्रतिटन आणि सोयातेल ६२ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशातील बाजारातही सोयाबीन क्विंटलमागं १०० रुपयानं नरमलं होतं.

आजही सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला.

मात्र पुढील काही दिवसांमध्ये सोयाबीन दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Tur Market
Soybean Market : अर्जेंटीनातील उत्पादन घटीचा सोयाबीन बाजाराला आधार

2. कापूस काहीसा सुधारला

देशातील कापूस दर आज कायम होते. काल कापसाच्या कमाल दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली होती.

सध्या देशातील बाजारात कापसाला सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळतोय. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे वाढीसह बंद झाले होते.

काल बाजार ८६.७६ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढण्याचा अंदाज आहे.

तसंच देशातही दर सुधारतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Tur Market
Tur Market: मागील वर्षी आतबट्ट्याची ठरलेली तूर यंदा आधार देणार | Agrowon

3. शेवगा खातोय भाव

राज्यातील बाजारात शेवग्याला सध्या चांगला दर मिळतोय. बाजारातील शेवग्याची आवक नगण्य आहे.

पुणे, मुंबई, नाशिक आणि नागपूर बाजार वगळता इतर ठिकाणी आवक १० क्विंटलपेक्षाही कमी दिसतेय. त्यातच उठाव चांगला मिळतोय.

त्यामुळं शेवगा दर तेजीत आहेत. सध्या शेवग्याला सरासरी ४ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय.

हा दर पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

4. टोमॅटो दरात काहीशी वाढ

टोमॅटो दरात मागील काही दिवसांमध्ये वाढ पाहायला मिळाली. अगदी ३०० रुपये क्विंटल विकला गेलेला टोमॅटो आता किमान ६०० रुपयांवर पोचला.

काही बाजारांमध्ये टोमॅटोला १ हजार रुपयांचाही दर मिळतोय. बाजारातील आवक मर्यादीत होत असल्यानं दर काहीसे वाढले.

सध्या टोमॅटोला सरासरी ८०० ते १ हजार रुपये दर मिळतोय. बाजारातील आवक पुढील काळात कमी होण्याचा अंदाज असून हे दर टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.  

5. तुरीची काढणी आता वेग घेत आहे. देशातील अनेक बाजारांमध्ये आता तुरीची आवक वाढत आहेत.

राज्यातील सोलापूर, जालना, अमरावती, नागपूर, अकोला, लातूर या महत्वाच्या बाजारांमध्ये तुरीची आवक हळूहळू वाढत आहे.

यंदा देशातील तूर लागवड जवळपास ५ टक्क्यांनी कमी राहीली होती. तर पिकाला पाऊस आणि कीड-रोगांचा मोठा फटका बसला.

त्यामुळं यंदा देशातील तूर उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याचा अंदाज आहे. सरकारनं यंदा ३९ लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला.

तर उद्योगाच्या मते यंदा ३२ ते ३५ लाख टनांपर्यंतच उत्पादन होईल. देशातील उत्पादन कमी राहण्याचे अंदाज येत आहे.

त्यामुळं सध्या तुरीचे दर तेजीत आहेत. स्टाॅकिस्ट तुरीची टप्प्याटप्यानं विक्री करताना दिसत आहेत. त्यामुळं दर टिकून आहेत.

तर बाजारात येणाऱ्या नव्या तुरीलाही सध्या चांगला दर मिळत आहे. देशातील तुरीची सरासरी दरपातळी प्रतिक्विंटल ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये आहे.

बाजारात तुरीची आवक वाढल्यानंतर दर काहीसे दबावात येतील असंही सांगितलं जात आहे. मात्र सरकारनेही हमीभावानं तूर खरेदीची तयारी सुरु केली.

यंदा तुरीला ६ हजार ६०० रुपये हमीभाव आहे. परिणामी सरकारच्या खरेदीचाही तूर बाजाराला आधार मिळणार आहे.

त्यामुळे यंदा तुरीचे दर टिकून राहतील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com