Agrowon Podcast : हरभरा बाजारावरही सरकारची नजर

देशात सध्या हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा कमीच आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकरी नाफेडला विक्री करण्याचं उद्दीष्ट वाळगून आहे.
Chana Rate
Chana RateAgrowon

१) कापसाची भावपातळी कायम (Cotton Rate)

आंतरराष्ट्रीय आणि देशातील बाजारात कापूस दरात चढ उतार सुरु आहेत. देशात सध्या कापसाची आवक चांगली असल्याचं व्यापारी सांगत आहेत. आज कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ९०० ते ८ हजार ४०० रुपये दर मिळाला.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात दरपातळी दुपारपर्यंत ८३ सेंट प्रतिपाऊंडवर होती. बाजारातील कापूस आवक मर्यादीत झाल्यानंतर दर यापेक्षा जास्त पातळीवर पोचतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) सोयाबीन दरात किंचित नरमाई (Soybean Rate)

देशातील बाजारात आज सोयाबीन दरात क्विंटलमागं ५० रुपयांची नरमाई दिसली. आंतरराष्ट्रीय बाजारातही चढ उतार सुरु आहेत. त्याचा परिणाम देशातील सोयाबीन बाजारावर दिसत असल्याचं जाणकार सांगतात.

सध्या देशात सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ५ हजार ४०० रुपये दर मिळतोय. सोयाबीनचा स्टाॅक सध्या शेतकऱ्यांकडे कमी आहे.

सोयापेंडला निर्यातीसाठी चांगली मागणी आहे. त्यामुळे सोयाबीन बाजार आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीसोबत वाढेल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) कारल्याला चांगला उठाव

राज्यातील बाजारात कारल्याला सध्या चांगला भाव मिळतोय. कारल्याची बाजारातील आवक कमी दिसते. राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक बाजारात आवक सरासरीपेक्षा कमीच आहे.

त्यामुळे कारल्याला सध्या प्रतिक्विंटल २ हजार ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. कारल्याची आवक पुढील काळातही मर्यादीत राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं कारल्याचे दर टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Chana Rate
Jowar Crop : ज्वारीचे आरोग्यदायी गुणधर्म काय आहेत?

४) ज्वारीचे दर तेजीत

देशात यंदा ज्वारी पिकाला बदलते वातावरण आणि पावसाचा मोठा फटका बसला. त्यामुळं ज्वारी उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमी राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. सध्या बाजारातील आवकही मर्यादीत आहे.

त्यामुळे ज्वारीला सरासरी २ हजार ५०० ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. ज्वारीची बाजारातील आवक पुढील काळातही कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ज्वारीचे दरही टिकून राहतील, असा अंदाज ज्वारी व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

५) हरभरा दर मात्र दबावातच का आहेत?

देशात सध्या हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा कमीच आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकरी नाफेडला विक्री करण्याचं उद्दीष्ट वाळगून आहे. शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा देण्यासाठी माल मागं ठेवला. यामुळं खुल्या बाजारातील हरभरा आवक काहीशी कमी दिसते.

तर नाफेडची खरेदीही आता ७ लाख टनांवर पोचली. नाफेडने पाच राज्यांमध्ये आतापर्यंत ७ लाख ५ हजार टन हरभरा खरेदी केला. यापैकी ४ लाख टन महाराष्ट्रात तर गुजरातमध्ये २ लाख टनांची खरेदी केली. उर्वरित माल कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशात खेरदी केला.

Chana Rate
Chana Market : बुलढाण्यात सुमारे ७० टक्के हरभरा विक्री शिल्लक

नाफेडची खरेदी वाढल्यानंंतर खुल्या बाजारात हरभरा दरही वाढतील, असा अंदाज होता. पण सरकारनं कडधान्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय केले. सरकारने तुरीबरोबरच हरभरा स्टाॅकही माहिती मागितल्याचं व्यापारी सांगितात.

त्यामुळं सरकार हरभरा दर वाढल्यास बाजारात हस्तक्षेप करेल, अशी भीती व्यापारी, स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादारांना आहे. तसेच नाफेड खरेदी केलेला हरभरा दरात सुधारणा झाल्यास बाजारात आणेल, याचीही भीती आहे. त्यामुळं बाजारात हरभऱ्याची खरेदी गरजेप्रमाणंच सुरु आहे. परिणामी हरभरा बाजारावर दबाव आहे.

सध्या हरभऱ्याला बाजारात प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपये दर मिळतोय. हरभरा दराला आधार देणारे फेंडामेंटल्स आहेत. पण सरकारच्या धोरणांची भीती बाजारात आहे. त्यामुळं हरभरा किंचित चढ उतार पुढील काळात दिसू शकतात, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com