Urad Market : देशातील उडदाचे उत्पादन यंदा घटणार

देशातील उडीद उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज आहे. मात्र गेल्यावर्षीपेक्षा यंदा उडीद आयात वाढणार आहे. त्यामुळं देशातील बाजारात उडदाचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त असेल.
Urad Market Rate
Urad Market RateAgrowon

Urad Market News: देशातील उडीद उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज आहे. मात्र गेल्यावर्षीपेक्षा यंदा उडीद आयात (Urad Import) वाढणार आहे.

त्यामुळं देशातील बाजारात उडदाचा (Urad Market) पुरवठा मागणीपेक्षा जास्त असेल. मग या परिस्थितीत उडदाला यंदा काय दर (Urad Rate) मिळू शकतो?

सध्या उडीद बाजार कसा आहे? यंदा उडीद उत्पादन आणि आयात किती होऊ शकते ? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

Urad Market Rate
Urad Market: उडदाचे दर टिकून राहतील का ? |ॲग्रोवन

1. सोयाबीन दर दबावातच

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात सध्या चढ उतार सुरु आहेत. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १४.९६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते.

तर सोयापेंडचे व्यवहार ४६७ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनचे दर काहीसे नरमले आहेत.

आज सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला. सध्या दरात चढ उतार सुरु असले तरी पुढील काळात सोयाबीनचे भाव वाढू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

2. कापूस दर नरमलेलेच

देशातील बाजारात कापसाचे भाव काहीसे नरमलेले आहेत. सध्या कापसाला ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळतोय. सध्या बाजारातील आकही वाढली आहे.

गेल्यामहिन्याच्या तुलनेत कापूस आवक दीडपट वाढली. त्यामुळं दरावर दबाव असल्याचं सांगितलं जातं.

तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात चढ उतार सुरुच आहेत. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे ८६.४६ सेंट प्रतिपाऊंडवर होते.

तर देशातील कापूस दर पुढील काळात वाढू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Urad Market Rate
Chilli Market : देशातील लाल मिरचीचे उत्पादन यंदा घटले?

3. कांदा आवक वाढली

राज्यातील महत्वाच्या बाजारात कांदा आवक वाढली. याचा दरावर दबाव असल्याचं सांगितलं जातं. कांद्याचे दर काहीसे नरमले आहेत.

आज कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपये दर मिळतोय. पुढील काळात कांद्याची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

त्यामुळं कांदा दरावरील दबाव कायम राहील, असा अंदाज कांदा बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

Urad Market Rate
Tur Production : देशातील तूर उत्पादन घटणार?

4. गुळाचे भाव सरासरी

राज्यातील गुऱ्हाळे सुरु होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी होत आला. त्यामुळं गूळ उत्पादनाचा वेगही जास्त आहे.

यंदा उसाचं क्षेत्र काहीसं अधिक असल्यानं गुऱ्हांकडं जाणारा ऊस यंदा वाढू शकतो, असं सांगितलं जातं.

तर सध्या बाजारात येणाऱ्या गुळाला सरासरी ३ हजार ते ३ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय.

गुळाचा हा दर यंदा टिकून राहू शकतो, असा अंदाज गुऱ्हाळ मालकांनी व्यक्त केला. 

5. देशातील उडीद उत्पादन यंदा घटण्याचा अंदाज आहे. केंद्राने यंदा देशात २७ लाख टन ऊडीद उत्पादनाचा अंदाज जाहीर केला.

तर उद्योगाच्या मते उडीद उत्पादन यापेक्षा कमी राहील. मागील हंगामात उडदाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला होता.

तसंच अनेक भागांमध्ये खरिपात पेरणीला उशीर झाला होता. त्यामुळं यंदा खरिपातील उडदाचा पेरा कमी झाला होता. तर चालू रब्बी हंगामात उडदाचा पेरा ४ टक्क्यांनी घटला. त्यामुळं यंदा उडदाचं उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे.

उद्योग आणि अभ्यसकांच्या मते यंदा देशात २१ लाख टन उडीद उत्पादन होऊ शकते. तर मागील हंगामातील जवळपास २ लाख टन उडीद शिल्लक आहे. देशातील उत्पादन घटण्याचा अंदाज असल्यानं यंदा आयात वाढू शकते.

मागील हंगामात ५ लाख ६५ हजार टन आयात झाली होती. ती यंदा जवळपास ६ लाख २५ हजार टन उडदाची आयात होऊ शकते.

त्यामुळं यंदा देशातील एकूण उडीद पुरवठा २९ लाख टनांच्या दरम्यान राहू शकतो. तर देशाचा वापर २८ लाख ५० हजार टनांच्या दरम्यान असतो. म्हणजेच यंदा मागणीच्या तुलनेत उडदाचा पुरवठा जास्त नसेल.

त्यामुळं बाजारात उडदाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळू शकतो. यंदा उडदाला प्रतिक्विंटल ६ हजार ६०० रुपये हमीभाव आहे. तर सध्या ६ हजार ५०० ते ७ हजार रुपये दर मिळतोय.

हा दर टिकून राहू शकतो, असा अंदाज कडधान्य बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com