top 5 news -युक्रेनमध्ये सूर्यफुल पेरणीत मोठी घट!

युक्रेनमध्ये युद्धाची धग कायम आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी सरकारच्या उद्दिष्टाऐवढी पेरणी केली. युक्रनमध्ये आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी १२६ लाख हेक्टरवर पेरा केला.
Sunflower
Sunfloweragrowon

1. केंद्राने गहू निर्यातबंदी केल्यानंतर निर्माण झालेली अस्वस्थता कायमये. वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी सरकार निर्यातबंदीत शिथिलता आणणार नाही, असं स्पष्ट केलं. त्यानंतर व्यापारी आणि निर्यातदारांमध्ये चिंतेचं वातावरण आणखी वाढलं. मात्र निर्याबंदीपुर्वी लेटर ऑफ क्रेडिट म्हणजेच निर्यातीचे व्यवहार पूर्ण केले, त्यांना निर्यातबंदीतून(Export ban) सूट देण्यात येईल. एलसी अंतर्गत सूट दिली गेली तर पहिल्या टप्प्यात १० लाख टन गहू निर्यात होण्याची शक्यताये. या पैकी अर्धा गहू बांग्लादेशला निर्यात होण्याची शक्यताये. बांगलादेश भारताचा मोठा ग्राहक ठरलाय. तसंच १० लाख टन गहू निर्यात झाल्यास बाजारात खरेदी वाढू शकते, असं जाणकारांनी सांगितलंय.

2. पारा चढल्याने या उन्हाळ्यात आईस क्रीम, दही आणि फ्लेवर्ड दुधाच्या मागणी वाढली. यापुर्वी दोन वर्षे कोरोनोचा प्रादुर्भाव होता. या आर्थिक वर्षात दुग्धजन्य उत्पादनांची मागणी कायमये. याशिवाय तूप आणि पनीरसारख्या उत्पादनांनाही हॉटेल, रेस्टोरंटस आणि कॅफे क्षेत्राकडून मागणी वाढलीये. गेल्या आर्थिक वर्षातील दरवाढीमुळे या आर्थिक वर्षात दुध (Milk)व्यवसायाच्या महसुलात १३ ते १४ टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज क्रिसिल या रेटिंग एजन्सीने वर्तविलाय. गेल्या आर्थिक वर्षापासून दुधाच्या दरात दोनदा वाढ झाली. त्यामुळेही दुधाची उलाढाल वाढली. याचा शेतकऱ्यांनाही थेट लाभ मिळतोय, असंही या संस्थेनं म्हटलंय.

3. भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होते. भारताच्या एकूण निर्यातीत बांगलादेशला २६.७३ टक्के निर्यात होते. मात्र केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने २०१९ साली निर्यातबंदी केल्यानंतर बांगलादेशकडून मागणी असताना पुरवठा थांबविण्यात आला. त्यानंतर वारंवार निर्यातबंदीमुळे बांगलादेशने पर्यायी पाकिस्तान, म्यानमार, ब्रम्हदेश आणि अफगाणिस्तान देशांकडून कांदा(Onion) घेतला. याचा फटका आता भारतीय शेतकऱ्यांना बसतोय. बांगलादेश सरकारने मे महिन्यापासून भारतीय कांद्याची आयात रोखलीये. बांगलादेशमध्ये स्थानिक कांद्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितलं. कांदा सीमेपर्यंत जाऊनही पुढे बांगलादेशमध्ये जात नसल्यानं व्यवहारांवर मोठा परिणाम झालाय.

4. गव्हाच्या निर्यातीवरबंदी आणि साखर निर्यातीवर मर्यादा आणल्यानंतर आता वाढत्या महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार तांदूळ निर्यातबंदी (Export ban)करेल, अशी चर्चा होती. मात्र सरकारचा असा कुठलाही विचार नसल्याचं सुत्रांनी सांगितलंय. भारताने गेल्या आर्थिक वर्षात तांदूळ निर्यातीचा विक्रम केला. गेल्यावर्षी १३० लाख टन बिगर बासमती तांदूळ निर्यात झाली. भारतानं गहू निर्यातबंदी केल्यानंतर अनेक देशांनी नाराजी व्यक्त केलीये. आता तांदूळ निर्यातबंदी केली तर ही नाराजी आणखी वाढेल, असं जाणकारांनी सांगितलंय. त्यामुळं भारत सरकार लगेच तांदूळ निर्यातबंदी करण्याची शक्यता कमीचये.

Sunflower
शेतकरी पीक नियोजन : संत्रा

5. युद्धाची धग सोसणाऱ्या युक्रेनमधील शेतकऱ्यांनी वसंत ऋतुतील पेरणी वेगाने केली. अनेक भागांत पेरणीसाठी अडचणी होत्या. मात्र शेतकऱ्यांनी या अडचणींवर मात करत आत्तापर्यंत १२६ लाख हेक्टरवर पेरा केला. २६ मेपर्यंत युक्रेनमध्ये ८९ टक्के लागवड उरकली होती, असं युक्रेनच्या कृषी विभागानं स्पष्ट केलंय. तर युद्धामुळं शेतकऱ्यांना जवळपास १२० लाख हेक्टरवर पेरणी करता आली नाही. तसंच शेतकऱ्यांनी सरकारच्या(government) उद्दिष्टापेक्षा अधिक क्षेत्र लागडीखाली आणलं. परंतु पुढील काळात पेरणीत जास्त वाढ होण्याची शक्यता नाही. येथील वसंत ऋतुतील पेरणी आता पूर्ण होणाच्या मार्गावरये. येथे २३ ते २६ मे या तीनच दिवसांत जवळपास ३ लाख ९१ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी उरकली. गव्हाची पेरणी गेल्यावर्षीच्या तुलनेत ९१ टक्के झाली. तर सरकारी उद्दिष्ट ९९ टक्के साध्या झालं. बार्ली (Barley)पिकानं ९ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्र व्यापलंय. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत पेरणी ३० टक्क्यांनी कमी झाली. येथे मका पेरणी ४४ लाख हेक्टरवर झाली. मात्र तरीही मक्यानं यंदा १९ टक्के कमी क्षेत्र व्यापलंय. सूर्यफुल हे वसंत ऋतुतील महत्वाचं पीकये. मात्र सूर्यफुल लागवडीत ६६ टक्के घट झालीये. आत्तापर्यंत ४३ लाख हेक्टरवर सूर्यफुल पिकाची पेरणी झाली. तर सोयाबीन पेरणी ११ लाख हेक्टरवर झाली. मागीलवर्षीच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा १० टक्क्यांनी कमी झालाय. सूर्यफुल पिकाची पेरणी कमी झाली. त्यामुळं पुढील काळात हा सूर्यफुल तेलाची उपलब्धताही घटण्याची शक्यताये.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com