Agrowon Podcast : म्यानमारमधून तुरीची निर्यात मंद गतीने

Tur Market : म्यानमारमधील निर्यातदार तुरीचा स्टाॅक मागे ठेवत आहेत. भारतात तुरीचे दर वाढत असल्याने येथील निर्यातदार बाजारातील पुरवठा कमी करत आहेत.
Tur Market
Tur MarketAgrowon

१) कापूस दर निचांकी पातळीवर (Cotton Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात काहीसे चढ उतार सुरुच आहेत. कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत ८१ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर देशातील बाजारावरील दबाव मात्र कायम आहे. बाजारातील कापूस आवक जास्त आहे.

त्यामुळे कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे. कापसाच्या दरावरील दबाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) सोयाबनमध्ये काहीसे चढ उतार (Soybean Rate)

देशातील बाजारात सध्या सोयाबीन आवक वाढलेली दिसते. आजही देशातील बाजारात सव्वा लाख क्विंटलच्या दरम्यान सोयाबीन आवक झाली होती. आवक सध्या सरासरीपेक्षा खूपच जास्त आहे. त्यामुळे दरावर दबाव आला.

सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ६०० ते ५ हजार रुपये दर मिळत आहे. सोयाबीन दरावरील दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

३) नाफेडची हरभरा खरेदी सुरुच (Chana Rate)

नाफेडने देशात आतापर्यंत २१ लाख २८ हजार टनांची खरेदी केली. नाफेडची खेरदी सुरु असतानाही बाजारातील दर दबावातच आहेत. हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. सरकार तुरीप्रमाणे हरभरा बाजारावरही दबाव ठेऊन आहे.

त्यामुळे उत्पादनाला फटका बसून आणि नाफेडची खेरदी वाढूनही बाजारभावाला आधार मिळाला नाही. हरभऱ्यावरील हा दबाव कायम राहू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Tur Market
Chana Market : हरभरा बाजारातील चित्र दलणार की नाही?

४) मक्याचा बाजार दबावातच (Maize Market)

खरिपाच्या तोंडावर बाजारात मक्याची आवक वाढली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी मका विक्री सुरु केल्याचे व्यापारी सांगत आहेत. आवकेचा दबाव असल्याने अनेक ठिकाणी सध्या मक्याचे भाव हमीभावापेक्षा नरमले आहेत.

मक्याला सरासरी १ हजार ८०० ते २ हजार १०० रुपयांचा भाव मिळत आहे. मक्याची आवक आणखी काही दिवस टिकून राहू शकते. त्यामुळे मक्याचे भावही कायम दिसू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला५) .

५) तुरीच्या दरातील तेजी टिकेल का? (Tur Rate)

म्यानमारमधील निर्यातदार तुरीचा स्टाॅक मागे ठेवत आहेत. भारतात तुरीचे दर वाढत असल्याने येथील निर्यातदार बाजारातील पुरवठा कमी करत आहेत. भारतात प्रामुख्याने आफ्रिका आणि म्यानमार या देशांमधूनच तूर आयात होते.

आफ्रिकेत आता तूर उपलब्ध नाही. कारण आफ्रिकेतील देशांमध्ये आताच लागवड झाली. येथील बाजारांमध्ये सप्टेंबरनंतरच नवा माल येईल. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत भारताची भीस्त देशातील स्टाॅक आणि म्यानमारवर आहे. भारतात यंदा मागणी आणि पुरवठ्यामध्ये खूप तफावत आहे.

Tur Market
Tur Market : तूर दराची दहा हजारांकडे वाटचाल

परिणामी दरात वाढ झाली. याचा फायदा म्यानमारमधील निर्यातदारही घेत आहेत. म्यानमारमध्ये तुरीचा स्टाॅक मागे ठेवला जात आहे. येथील निर्यातदार आणखी दरवाढीची वाट पाहत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या म्यानमारमधून तूर आयात करायची म्हटल्यास प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ८०० रुपये मोजावे लागत आहेत.

म्हणजेच देशातील दरापेक्षाही अधिक भाव द्यावा लागतो आहे. देशात सध्या तुरीला प्रतिक्विंटल ८ हजार ते ९ हजार ५०० रुपये असा गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहे. या सर्व परिस्थितीमुळे देशातील तुरीच्या दारतील तेजी आणखी वाढू शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com