Tur : आयात तुरीतील तेजी बाजाराच्या पथ्यावर?

देशातील बाजार समित्यांमध्ये सध्या तुरीची आक कमी झाली. मात्र सणांमुळे तूर डाळीला मागणी वाढत आहे. त्यामुळं तुरीच्या दरात सुधारणा झाली. सध्या तुरीचे दर हंगामातील उच्चांकी पातळीवर आहेत.
Tur
TurAgrowon

एफआरपीत टनामागे १५० रुपयांची वाढ

केंद्र सरकारने २०२२-२३ च्या गाळप हंगामासाठी एफआरपीत प्रतिटन १५० रुपयांनी वाढ केलीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या हंगामात १० टक्के साखर उताऱ्यासाठी २९०० रुपये एफआरपी होती. आता १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी ३०५० रुपये एफआरपी मिळेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत उसाच्या एफआरपीत २.६ टक्के वाढ झालीये. यंदाच्या एक ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या साखर हंगामासाठी ही एफआरपी लागू असेल. एफआरपीत वाढ केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असं जाणकारांनी सांगितलं.

Tur
Sugarcane : अनुदानाअभावी ऊसतोडणी यंत्रांची समस्या उद्‌भवणार
Tur
Food Grain : कमी पावसामुळे धान्य उत्पादन कमी होणार?

अर्जेंटीनाच्या शेतकऱ्यांनी धान्य विक्री रोखली

युक्रेनमधून धान्याचं पहिलं जहाज बाहेर पडलं. त्यामुळं जगातील धान्य पुरवठा वाढेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र दुसरीकडं युक्रेनमधील शेतकऱ्यांनी धान्य मागं ठेवलंय. सध्या अर्जेंटीनात आर्थिक संकट आलंय. येथील सरकारनं व्याजदर ८ टक्क्यांवरून ६० टक्के केलाय. तर यंदा येथील महागाई ८० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं अर्जेंटीना सरकार पेसोचे अवमुल्यन करण्याची शक्यता व्यक्त होतेय. पेसो हे अर्जेंटीनाचं चलन आहे. अर्जेंटीना सरकारने पेसोचं अवमूल्यन केल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. त्यामुळं शेतकरी वाट पाहत आहेत, असं जाणकारांनी सांगितलं.

Tur
Wheat : गहू खरेदीत सरकारचे ७६ हजार कोटी वाचले

सीबाॅटवर गव्हाच्या वायद्यांत सुधारणा

जगात गव्हाला मागणी आहे. मात्र पुरवठ्यातील चढ-उतारासह दरातही बदल होत आहेत. शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडवर गुरुवारी गव्हाच्या वायद्यात एक टक्क्यापर्यंत सुधारणा झाली. गव्हाचे वायदे सहा महिन्यांतील निचांकी दरावरून सुधारले. गुरुवारी गव्हाचे वायदे ७.७० डाॅलर प्रतिबुशेल्सने झाले. युक्रेनमधून गहू निर्यात आता सुरू झाली. तर रोमानियात उत्पादनवाढीची शक्यता आहे. तर काही देशांत पिकाला दुष्काळाचा फटका बसतोय. याचा परिणाम गव्हाच्या दरावर जाणवतोय.

आयात तुरीतील तेजी बाजाराच्या पथ्यावर?

देशात सणांच्या पार्श्वभुमीवर तुरीला मागणी (Tur Demand) वाढली. मात्र बाजारात तुरीची आवक (Tur Arrival) कमी होत आहे. राज्यातील बऱ्याच बाजार समित्यांमध्ये दैनंदिन तूर आवक १०० क्विंटलच्या आतच होतेय. तर मोठ्या बाजार समित्यांमध्ये आवक अधिक दिसत असली तरी ससरासरीपेक्षा कमीच आहे. लातूर आणि अकोला बाजार समित्यांत आवक ८०० ते २००० क्विंटल होतेय. मात्र ही आवक सरासरीपेक्षा खूपच कमी असल्याचं येथील व्यापाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळं देशातील बाजार समित्यांमध्ये तुरीला यंदाचा उच्चांकी दर (Highest Rate For Tur) मिळतोय. राज्यात तुरीला ६ हजार ५०० ते ७ हजार ६०० रुपयांपर्यंत दर मिळतोय.

देशाचा विचार करता राज्यातच दर अधिक आहेत, अस जाणकारांनी सांगितलं. बाजार समित्यांमध्ये तुरीला चांगला दर तर मिळतच आहे. शिवाय आयात तुरीचेही दर जास्त आहेत. सध्या म्यानमार आणि सुदान या देशांमधून तूर आयात होतेय. मात्र आयात तुरीचेही दर वाढत आहेत. गुरुवारी आयात तुरीच्या दरात क्विंटलमागं १०० रुपयांची वाढ झाली होती. म्यानमारमधून येणाऱ्या लेमन तुरीला मुंबई आणि चेन्नईत ७ हजार ४५० रुपये दर मिळतोय. तर सुदान तुरीला ७ हजार ८०० रुपयांचा दर मिळतोय. देशातील बाजार समित्यांतील कमी आवक आणि वाढलेली मागणी यामुळं दर वाढले. तर आयात तूरही तेजीत असल्यानं दराला आधार मिळतोय, असं जाणकारांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com