Tur Market : शेतकऱ्यांच्या विक्रीवर तुरीचे दर अवलंबून

शेतकरी तूर कशी विकतात याची चर्चा सध्या बाजारात सुरु आहे. कापूस आणि सोयाबीनचे दर नरमल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारातील आवक कमी केली. परिणामी दरातील घसरण थांबली.
Tur Market
Tur MarketAgrowon

शेतकरी तूर (Tur) कशी विकतात याची चर्चा सध्या बाजारात सुरु आहे. कापूस (Cotton) आणि सोयाबीनचे दर (Soybean Rate) नरमल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारातील आवक कमी केली. परिणामी दरातील घसरण थांबली. पण शेतकरी तुरीचीही विक्री अशीच करतील का? यंदा तुरीला काय दर मिळू शकतो? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.  

Tur Market
Tur Market : तुरीचे भाव कसे राहतील?

1. सोयाबीनची आवक मर्यादीतच

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात काहीशी घसरण झाली होती. सोयाबीन एक टक्क्याने तर सोयापेंड दोन टक्क्यानं नरमलं होतं. देशातील सोयाबीन बाजार मात्र स्थिर होता. देशात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. डिसेंबरमध्ये बाजारातील सोयाबीन आवक एरवी जास्त असते. त्यामुळं दरही कमी झालेले असतात. मात्र यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनची मर्यादीत विक्री केल्यानं दर टिकून राहीले. जानेवारीत दरात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता असल्याचं, सोयाबीन बाजारातील जाणकारांनी सांगितलं.
 

2. कापूस काहीसा नरमला

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात हळूहळू सुधारणा होताना दिसतेय. आज कापूस ८२ सेंट प्रतिपाऊंडवर पोचला. तर देशात मात्र आज कापसाच्या दरात क्विंटलमागं २०० रुपयांपर्यंत नरमाई दिसली. कापसाला सरासरी ८ हजार १०० ते ९ हजार २०० रुपये दर मिळाला. तर आज सीसीआयने ८ हजार १०० रुपयांचा दर काढला होता. मात्र दर कमी झाल्यानं शेतकरी कापूस विक्री पुन्हा कमी करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. तर जाणकारांच्या मते चालू महिन्यात कापूस दर कमी जास्त होऊ शकतात. मात्र जानेवारीत दर सुधारु शकतात. शेतकऱ्यांना यंदा सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय. 

Tur Market
Tur Market : देशात तुरीचे दर का वाढले?

3. केळीचे दर दबावातच

केळीच्या लागवडी अनेक भागांमध्ये आटोपल्या आहेत. सध्या केळीची बाजारातील आवक कमी आहे. चालू हंगामात सुरुवातीला केळीला चांगला दर मिळाला. मात्र नंतर दरात मोठी घसरण झाली होती. आता केळीची आवक कमी असूनही दर दबावात आहेत. सध्या केळीला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपये दर मिळतोय. त्यातच थंडी कमी असल्याचाही परिणाम केळीच्या दरावर होतोय. पुढील काळात केळीचे दर सुधारु शकतात, असा अंदाजही जाणकारांनी व्यक्त केलाय. 

4. स्ट्राॅबेरीच्या दरात तेजी

स्ट्राॅबेरी हे राज्यात विशिष्ट भागातच घेतले जाणारे पीक आहे. इतर भागातही आता स्ट्राॅबेरी लागवडीचे प्रयोग सुरु आहेत. मात्र यंदा अपेक्षित थंडी अजूनही पडली नाही. किमान तापमान जास्त असल्यानं पिकावर परिणाम होत असल्याचं शेतकरी सांगत आहेत. सध्या काही बाजारात स्ट्राॅबेरीची आवक होतेय. तर दर प्रतिक्विटंल १० हजार ते १६ हजार रुपयांच्या दरम्यान आहे.पुढील काळात स्ट्राॅबेरीची आवक वाढण्याचा अंदाज असल्याचं जाणकारांनी सांगितलं.
 

5. आफ्रिकेतील देशांमधून तूर आयातीची गती पुढील काळात कमी होत जाईल. मात्र देशातील तूर काढणीचा वेग वाढला. पण शेतकरी तूर कशी विकतात याची चर्चा सध्या बाजारात सुरु आहे. यंदा शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनची विक्री मर्यादीत ठेवली.  एरव्ही डिसेंबर महिन्यात कापूस आणि सोयाबीनचे दर कमी असतात. मात्र यंदा दर नरमल्यानंतर शेतकऱ्यांनी दरवाढण्याची वाट पाहण्याचे ठरवलं. त्यामुळं बाजारातील आवक सध्या कमी आहे. परिणामी दरातील घसरण थांबली. हाच गित्ता शेतकरी तुरीच्या बाबतीतही गिरवतील, असा अंदाज सध्या व्यक्त केला जातोय. यंदा देशात तुरीची लागवड कमी झाली. तसंच पिकाचं नुकसानही झालं. त्यामुळं तुरीचं उत्पादन कमी राहीलं, याचा अंदाज शेतकऱ्यांनाही आहे. त्यामुळं शेतकरी तुरीची विक्री एकदाच न करता टप्प्याटप्याने करू शकतात, असं सध्या व्यापारी सांगत आहेत. बाजारात एकदाच आवकेचा दबाव न वाढता मर्यादीत पुरवठा झाल्यास दरही टिकून राहतील. सद्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ९०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. हा दर आवकेच्या काळात टिकून राहू शकतो. तर चालू हंगामाचा विचार करता तुरीला सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com