Cotton : नव्या कापसाला १२ हजाराचा दर ?

हरियाणा आणि पंजाबनंतर आता आणखी काही ठिकाणी नवा कापूस बाजारात दाखल झालाय. नवीन कापसालाही जुन्या मालाप्रमाणं दर मिळतोय. देशात कापसाची टंचाई आहे. कापसाची मागणी वाढलीय. त्यामुळे दर तेजीत आहेत.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

लाल मिरचीच्या दरातील तेजी टिकून

1. देशात सध्या लाल मिरचीचे दर तेजीत आहेत. प्रतिकूल हवामानामुळं लाल मिरचीच्या उत्पादनाला फटका बसला. पाऊस आणि उष्णतेमुळं मिरची पिकाची गुणवत्ताही कमी झाली. त्यामुळं चांगल्या दर्जाच्या मिरचीची बाजारात सध्या टंचाई जाणवतेय, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यातच सध्या मिरचीची आवक रोडावलीय. त्यामुळं बाजारात लाल मिरचीला १० हजारांपासून २२ हजार रुपयांपर्यंत दर मिळतोय. तेलंगणातही मिरचीचे व्यवहार सरासरी १३ हजार ते २० हजार रुपयाने होत आहेत. उत्पादनातील घट पाहता लाल मिरचीचे दर टिकून राहण्याचा अंदाज आहे.

Cotton Rate
Cotton : कापूस पट्ट्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू लागला

मर्यादीत आवकेमुळे भेंडीचे दर तेजीत

2. श्रावण आणि गणपती उत्सावामुळं भेंडीला मागणी वाढलीय. मात्र यंदा कमी उत्पादनामुळं आवक घटलीय. परिणामी भेंडीचे दर वाढले आहेत. केवळ राज्यातच नाही तर देशभरात सध्या भेंडीला चांगला दर मिळतोय, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं. राज्यातील पुणे, मुंबई आणि नागपूर या बाजार समित्या वगळता इतर ठिकाणी दैनंदिन भेंडी आवक ८० क्विंटलपेक्षा कमीच दिसते. राज्यात भेंडीला सरासरी ३ हजार ते ५ हजार रुपये क्विंटल दर मिळतोय. पुणे, मुंबई आणि नागपूर बाजार समितीत साधारण ३ हजार ते ६५०० रुपयांच्या दरम्यान व्यवहार होत आहेत. भेंडीचे दर चढे राहण्याचा जाणकारांचा अंदाज आहे.

Cotton Rate
Cotton Market: देशातील कापूस पिकाचं नुकसान वाढलं |ॲग्रोवन

बाजारात पपईचे दर स्थिर

3. देशभरात सध्या पपईला बऱ्यापैकी दर मिळतोय. मागणी चांगली असल्यानं दर टिकून आहेत. तर दुसरीकडं बाजारातील आवक कमी आहे. देशातील महत्त्वाचं पपई उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातही सध्या आवक कमी होतेय. येथेही पपईला प्रतिक्विंटल २ हजार ते २ हजार ५०० रुपये दर मिळतोय. तर महाराष्ट्रात १ हजार ५०० ते ३ हजार रुपये दराने पपईचे व्यवहार होत आहेत. पुढे गणेशोत्सवामुळं पपईची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पपईचे दर टिकून राहतील, असं सध्याचं चित्र आहे.

जास्त ओलाव्यामुळे मुगाचे दर दबावात

4. देशातील काही बाजारांमध्ये नवीन मुगाची आवक सुरु झाली. मात्र ढगाळ वातावरण आणि पावसामुळं मुगात ओलावा अधिक आहे. त्यामुळं नव्या मुगाला सध्या हमीभावापेक्षा म्हणजेच ७ हजार ७५५ रुपयांपेक्षा कमी दर मिळतोय. बाजारात जुना मूग प्रतिक्विंटल ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपयाने विकला जातोय. तर नव्या मुगाला ६ हजार ५०० ते ७ हजार २०० रुपये दर मिळतोय. बाजारात पुढील काळात मुगाची आवक वाढेल. मात्र पाऊस उघडल्यास ओलावा कमी राहील. त्यामुळं आवक वाढल्यानंतरही मुगाचे दर पडणार नाहीत, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

नव्या कापसाला १२ हजाराचा दर ?

5. देशात सध्या कापसाचे दर तेजीत आहेत. महाराष्ट्रात कापूस बाजारात यायला अजून वेळ आहे. परंतु उत्तर भारतात कापूस लागवड लवकर होत असते. त्यामुळे तेथील काही बाजारापेठांमध्ये नवीन कापसाची आवक सुरु झालीय. या नवीन कापसाला चांगला दर मिळतोय. हरियाणातील पालवाल जिल्ह्यात ऑगस्टच्या सुरुवातीलाच नवीन कापूस दाखल झाला. त्यानंतर पंजाबमध्येही काही बाजारांमध्ये कापसाची आवक सुरू झाली. आता गुजरातमध्येही मोजक्या बाजारांमध्ये नवीन कापसाच्या लिलावाचा मुहुर्त पार पडलाय. गुजरातमधील अमरेली, गोंडल आणि राजकोटमध्ये नव्या हंगामातील कापसाची आवक सुरू झालीय. राजकोट बाजारात कापसाला प्रति क्विंटल १० हजार ते १२ हजार रुपये दर मिळाला. तर गोंडल बाजारात १० हजार ते १२ हजार ६०० रुपयाने व्यवहार झाले. तर जुन्या कापसालाही १२ हजार रुपयांचा दर मिळतोय. सध्या बाजारात आवक खूपच कमी आहे. सप्टेंबरच्या शेवटी बाजारातील आवक वाढेल. बाजारात आवकेचा दबाव वाढल्यानंतरच दर काय राहतील, याचा अंदाज येईल, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. पण यंदा कापूस लागवड वाढलेली असली तरी पिकाचं मोठं नुकसान होतंय. प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये पिकाला पावसाचा फटका बसलाय. तर गुलाबी बोंडअळीचाही प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे कापूस उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ होण्याची शक्यता नाही. या सगळ्या गोष्टींमुळे कापसाचे दर यंदा चढे राहण्याचा अंदाज आहे. कापसाला ९ हजार ते १० हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com